ADVERTISEMENT
home / आरोग्य
कोविडमधून बरे झाल्यावर का लागू शकते फिजिओथेरपीची गरज

कोविडमधून बरे झाल्यावर का लागू शकते फिजिओथेरपीची गरज

भारतात सध्या कोविडची दुसरी लाट सुरू आहे. ज्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण सध्या कोरोना संक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाची निरनिराळी लक्षणे आढळून येत आहेत. ज्यामध्ये सर्दी, खोकला, ताप यासह श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा अशी लक्षणेही आहेत. कोरोनामुळे येणारा थकवा अथवा अशक्तपणा किती दिवस राहतो याबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. काही जणांना काही आठवड्यात बरं वाटतं तर काहीनां यासाठी महिना देखील लागू शकतो. कोरोनाचे संक्रमण कितपत झाले आहे यावर तुम्ही किती दिवसांत बरे होणार हे अवलंबून आहे. शिवाय जर कोरोनावर योग्य ते उपचार झाले नाहीत तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या शारीरिक क्रियांवर दिसू शकतो. ज्यामुळे दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करणं कठीण होऊन बसतं. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कोरोनातून बरे होण्यासाठी रूग्णांना फिजिओ थेरपी ची गरज लागू शकते. यासाठीच जाणून घेऊया अक्वासेट्रिंक थेरपी प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट डॉ. दिपा फार्तोडे यांचा सल्ला 

कोरोनातून बरे होताना कशी घ्यावी स्वतःची काळजी

कोरोनामुळे तुमच्या श्वसनमार्गाला संक्रमण झाल्यामुळे श्वसनमार्गाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच फुफ्फुसांचे आरोग्य राखले जाईल असे उपचार करायला हवेत. यासोबतच या काळात रुग्णांना गरज असू शकते. पल्मोनोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, फिजिओलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, डायटिशियन आणि सायकोलॉजिस्ट. जास्त संक्रमण झाले नसल्यास फक्त श्वसनाचा सराव आणि व्यायाम करून तु्म्ही पूर्ववत होऊ शकता. मात्र शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला इतर तज्ञ्जांचा सल्ला घेण्याची आवश्यक्ता लागू शकते. 

ADVERTISEMENT

या काळात फिजिओथेरिपिस्ट अथवा टेलि रिहॅबची मदत घेतल्यामुळे तुम्हाला कोरोनातून लवकर रिकव्हर होता येईल. शिवाय पुन्हा संक्रमण टाळण्यासाठी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी याचा नक्कीच फायदा  होईल. 

कोरोना रुग्णांना का असते टेलि रिहॅबची गरज

टेलि रिहॅबमध्ये रूग्णांना फोनवरून टेलि कन्सल्टेशन केले जाते. ज्यामध्ये थेरपिस्ट रुग्णांच्या सर्व लक्षणांचा अभ्यास करतात. या काळात कोणती औषधे घेतली, कोणत्या शारीरिक हालचाली झाल्या, कोणत्या अवयवाची मुळीच हालचाल झाली नाही हे बघतात. ऑक्सिजन लेव्हल, पल्स रेट आणि श्वासाची गती आणि शरीराचे  तापमान पाहिले जाते. ज्यामुळे रूग्णाची प्रगती कशी होत आहे याचा अंदाज तज्ञ्जांना मिळतो. हॉस्पिटलमध्ये खूप काळ घालवल्यामुळे किंवा होम आयसोलेशन मुळे रुग्णाची मानसिक स्थिती बिघडली असते. यासाठी अशा रूग्णांची संवाद साधत त्यांना नैराश्यातून बाहेर काढावे लागते. फुफ्फुसांचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी रुग्णांना सांगण्यात येणारे श्वसनाचे व्यायाम आणि टेकनिक नित्यनेमाने करायला हवेत. यासाठी रुग्णाला तज्ञ्जांच्या सेशनची आठवड्यातून कमीत कमी दोनदा गरज लागू शकते. 

कोरोना संक्रमण टाळण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करा, मास्क लावा, सोशल डिस्टसिंग पाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका, सॅनिटायझरचा वापर करा, स्वच्छता राखा. मात्र असं करूनही जर कोरोनाची लागण झालीच तर वेळीच उपचार घेऊन लवकर बरे व्हा. यासाठी आम्ही दिलेल्या टिप्स अवश्य लक्षात ठेवा. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडीज

घरात राहून कसं व्हाल कोरोनातून पूर्ण बरं,असे करा उपचार

ADVERTISEMENT

कोरोनातून बरं झाल्यावर का बदलावा टूथब्रश आणि टंग क्लिनर

27 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT