फिरायची हौस कोणाला नसते? आपल्याकडे भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपण फिरून त्याचे वैशिष्ट्य जाणून घेऊ शकतो. विशेषतः आपल्याकडे असणाऱ्या ऐतिहासिक लेण्या (Caves). या लेण्यांची कलाकुसर, त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांचे रहस्य जाणून घेण्यात एक वेगळीच मजा आहे. तुम्हालाही फिरण्याची आवड असेल तर तुम्हाला अशा काही रहस्यमयी लेण्यांमध्ये जाणून घ्यायला आवडेल का? एकतर फिरणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडते. या लेखातून तुम्हाला आम्ही अशाच काही ऐतिहासिक रहस्यमयी लेण्यांबद्दल (Mysterious Caves) सांगणार आहोत. तुम्हालाही नक्कीच उत्सुकता वाटत असेल तर तुम्ही नक्की वाचा. भारतात अशा कोणत्या लेण्या आहेत ज्या आजही अनेक रहस्य स्वतःकडे लपवून आहेत.
एलिफंटा लेणी (Elephanta Caves)
मुंबईपासून जवळ असणाऱ्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणी आजही आपल्या सगळ्यांना खूपच सुंदर वाटते. 7 व्या शतकात राष्ट्रकूट राजाद्वारे निर्माण करण्यात आलेली ही लेणी खरंच रहस्यमयी आहे. घारापुरी लेणी असंही याला म्हटलं जातं. घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ही महाराष्ट्रामधील मुंबईपासून 6-7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात ही लेणी आहेत. ही लेणी भव्य आकाराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आली होती. 1987 साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापुरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस समुद्रात किनार्यापासून 10 कि.मी. दूर आहेत.ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही. हे कसे बांधले हेच मुळात रहस्य आहे.
वाचा – Marathi Bhay Katha Kadambari
एलोरा लेण्या (Ellora Caves)
एलोरा अर्थात वेरूळची लेणी. युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला.कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अदभुत आहे, राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा (प्रथम) (757-783) मध्ये बांधण्यात आले होते. इथे संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेला आहे, तर द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद, हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी, खडकातून सुमारे 40 हजार टन दगड काढला गेला असे सांगण्यात येते. पण हे सगळे कसे केले गेले असेल याची उत्सुकता आजही तशीच आहे. पहिला भाग त्याच्या बांधकामासाठी वेगळे करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल तीन बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. एलोरा लेणीच्या खाली एक रहस्यमयी शहर असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
भीमबेटका गुफा (लेणी) (Bhimbetka Gufa)
भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे भोपाळ पासून 45 किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे.[१][२] यांपैकी तेथील पाषाणयुगीन गुहेतील चित्रकारी इसवी सनपूर्व 30,000 वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते.[३] ही भित्तिचित्रे भारतातली सर्वात प्राचीन भित्तिचित्रे समजली जातात. भीमबेटकाच्या सभोवताली अजून सुमारे पाचशे शैलगृहे आहेत, जिथे अशी प्रागैतिहासिक भित्तिचित्रे असली तरी तेथे पोहोचता येत नाही या गुहांपर्यंत जायला रस्ते नाहीत. महाभारताशी याचा संबंध जोडला जातो. या ठिकाणी भीम बसत होता असं सांगण्यात येतं. भीमाची बैठक याचा अपभ्रंश होऊन याचं नाव भीमबेटका असं झालं आहे. मध्यप्रदेशमधील महत्वाचे पर्यटन स्थळ असून आजही याचे रहस्य तसंच आहे.
फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील पर्यटन स्थळे – Places To Visit In Konkan
कुटुमसर गुफा (Kutumsar Caves)
जमिनीच्या खाली खोदलेली अशी ही रहस्यमयी गुफा. छत्तीसगडच्या () बस्तर जिल्ह्यातील कांकेर घाटातील राष्ट्रीय उद्यानात ही गुफा आहे. भारतातील ही सर्वात खोल गुफा मानली जाते. 60-120 फूट खोल ही गुफा असून याची लांबी 4500 फूट आहे. 1950 मध्ये या गुफेचा शोध लागला. कुटुमसर गावाजवळ असल्याने या गुफेला याच नावाने ओळखण्यात येते. इतक्या खोल गुफेमध्ये रंगबेरंगी मासे मिळतात. प्राचीन काळात याचे निर्माण करण्यात आले असून, वादळ आणि पावसापासून संरक्षणासाठीच याचे निर्माण करण्यात आले असावा असा कयास बांधला जातो. पण नक्की माहिती आजही रहस्यच आहे. इथे कोण राहात होतं अथवा अधिक माहिती काय आहे हे आजतागायत रहस्यच आहे.
बोरा लेणी (Borra Caves)
विशाखापट्टणमध्ये असणारी ही लेणी 10 लाख वर्षापूर्वीची आहे असे मानले जाते. समुद्रापासून साधारण 1400 फूट वर असणारी लेणी म्हणजे आजही एक रहस्य आहे. बोरा म्हणजे तेलुगू भाषेत मेंदू. 1807 मध्ये विल्यम किंग जॉर्जने या लेणीचा शोध लावला. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याचे निर्माण कोणी कधी केले याचा काहीही ठावठिकाणा नाही. ते एक रहस्यच आहे. तशीच ही एक लेणी आहे. इथे शंकराची पिंडीही दिसून येते. त्यामुळे हिंदूचे वास्तव्य इथे असावे असे मानण्यात येते.
पावसाळ्यात फिरण्यासाठी भारतातील अप्रतिम ठिकाणं (Places To Visit In Monsoon In Marathi)
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक