ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
स्टिक ऑन ब्रा चे प्रकार आणि कशी घ्याल काळजी

स्टिक ऑन ब्रा चे प्रकार आणि कशी घ्याल काळजी

बाजारात अनेक प्रकारच्या ब्रा उपलब्ध आहेत. पण तुम्हाला बॅकलेस ड्रेस घालायचा असेल तर विशिष्ट स्टिक ऑन ब्रा (Stick on Bra) वापरावी लागते. पण अनेक महिलांना स्टिक ऑन ब्रा बद्दल पूर्ण माहिती नाही. त्यांना वाटते की स्टिक ऑन ब्रा चा योग्य सपोर्ट स्तनांना मिळत नाही. तसंच आपल्या आकारानुसार आणि कपनुसार परफेक्ट स्टिक ऑन ब्रा शोधणेही कठीण असते. पण तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज, हॉल्टर टॉप्स, बॅकलेस ड्रेस घालयचे असतील तर स्टिक ऑन ब्रा किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे. तुम्हालाही याचा वापर करायचा असेल तर स्टिक ऑन ब्रा चे प्रकार (Stick on Bra types), त्याची कशी काळजी घ्यायची (how to care stick on bra) आणि मुळात ती कशी वापरायची (How to wear stick on bra) हे तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी काही खास टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे स्टिक ऑन ब्रा ची निवड करताना त्याच्या स्ट्रिप्स तुमच्या स्तनांना योग्य सपोर्ट करू शकतील की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजारात नक्की कशा प्रकारच्या आणि किती प्रकारच्या स्टिक ऑन ब्रा मिळतात ते जाणून घेऊया. पण त्याआधी स्टिक ऑन ब्रा म्हणजे काय ते समजून घ्या. 

स्टिक ऑन ब्रा म्हणजे काय?

नावावरूनच ज्या ब्रा ला स्टिक करता येईल अशी ब्रा म्हणजे स्टिक ऑन ब्रा हे आपल्याला समजते. ही ब्रा स्ट्रेपलेस असून ती स्तनांच्या बाजूच्या जागेला योग्य चिकटून राहाते. त्यामुळे पाठीवर कोणत्याही स्ट्रेप्स दिसत नाहीत. तसंच तुम्हाला यामध्ये अगदी व्यवस्थित राहता येतं. अधिकाधिक स्टिक ऑन ब्रा या सिलिकॉनने तयार होतात. पण काही स्टिक ऑन ब्रा या पॉलिथिन अथवा अन्य मटेरियलेनही तयार होतात. 

सिलिकॉन क्लासिक ब्रा

संपूर्ण बॅकलेस ड्रेस (backless dress) ज्या महिलांना घालायचा आहे त्यांच्यासाठी सिलिकॉन क्लासिक ब्रा (silicon classic bra) उपयोगी ठरते. कारण यासाठी जास्त सपोर्ट देण्याची गरज भासत नाही. ज्यांना स्तनांना जास्त लिफ्ट करायला आवडत नाही त्यांच्यासाठी या ब्रा चा उपयोग करून घेता येतो. 

वायर्ड कप्स

बॅकलेस ड्रेस घालायचा आहे पण ज्यांना सपोर्टही हवा असतो अशा महिलांसाठी वायर्ड कप्स ब्रा (wired cups bra) योग्य ठरतात. ही ब्रा स्टिक ऑन्समध्येही योग्य सपोर्ट देते. 

ADVERTISEMENT

लिफ्टिंग ब्रा

ज्या महिलांना किमान कव्हरेज हवं असतं पण त्यांना ऑफ शोल्डर घालायला आवडतं. ज्यांना क्लिव्हेज दिसूनही चालणार असतं. अशा महिलांना लिफ्टिंग ब्रा (Lifting Bra) चा वापर करावा. यामुळे तुमच्या स्तनांना बॅकलेस आणि ऑफ शोल्डर कपड्यांमध्ये उभारी मिळते. 

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)

पुश अप लिफ्ट

हा पुश अप ब्रा स्टिक ऑन फॉर्म आहे. यामुळे अधिक कव्हरेज मिळतं आणि या स्टिक ऑन ब्रा च्या कपचा एरियादेखील अधिक असतो. त्यामुळे स्तनांना व्यवस्थित आधार मिळतो. यामध्येच प्लंज ब्रा देखील असते जी व्ही आकाराच्या कपड्यांसाठी अधिक योग्य ठरते. 

पेस्टीज

तुम्हाला बॅकलेस ड्रेस सह साईड होल्स असणारे ड्रेस घालायचे असतील तर तुम्हाला पेस्टीज स्टिक ऑन ब्रा चा वापर करता येईल. कारण हे अत्यंत कमी कव्हरेज देते. ज्यांचे स्तन अधिक मोठे आहेत त्यांनी याचा वापर मात्र करू नये.

ADVERTISEMENT

स्टिक ऑन ब्रा चे फायदे (Benefits of Stick on Bra)

  • चुकीच्या आकाराच्या ब्रा या तुमच्या स्तनांमध्ये त्रासदायक ठरू शकतात. तसंच यामुळे तुमच्या स्तनांचा आकार चुकीचा वाढू शकतो. पण स्टिक ऑन ब्रा मध्ये अशी समस्या होत नाही 
  • ब्रा स्ट्रेप्समुळे होणाऱ्या पाठीच्या त्रासापासून सुटका मिळते 
  • ब्रेस्ट मसल्सना योग्य आधार मिळतो आणि तुम्ही त्याच त्याच आऊटफिट्स मध्ये कंटाळला असलात तर तुम्हाला वेगळा पर्यायही उपलब्ध होतो 
  • अति घाम आणि रॅशेसपासून सुटका मिळते 
  • स्टिक ऑन ब्रा मध्ये घट्टपणाचा त्रास होत नाही. श्वास घ्यायलाही त्रास होत नाही

बॅकलेस ड्रेससाठी कोणत्या ब्रा वापराव्या, 5 प्रकार

कशी स्वच्छ करावी स्टिक ऑन ब्रा

स्टिक ऑन ब्रा कशी स्वच्छ करायची आणि त्याची कशी काळजी घ्यायची हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इतर कपड्यांप्रमाणे वॉशिंग मशीनमध्ये धुणं योग्य नाही. जाणून घ्या कशी स्वच्छ करायची – 

  • दोन्ही ब्रा कप्स तुम्ही कोमट पाणी आणि थोडासा हँड सोप घेऊन स्वच्छ करू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही ही ब्रा घालाल त्यानंतर त्वरीत स्वच्छ करा. कारण शरीरातील तेल, घाम आणि घाण सर्व काही यामध्ये असते. त्यामुळे नियमित स्वच्छ करणे गरजेचे आहे
  • स्टिक ऑन ब्रा जिथून अंगाला चिकटवायची असते तिथून मळ व्यवस्थित स्वच्छ करा. अन्यथा त्याचा गम निघून जातो. जास्त काळ वापरण्यासाठी तुम्ही हे व्यवस्थित स्वच्छ करून घ्या 
  • लगेच लागोपाठ ही ब्रा घालू नका. धुतल्यानंतर किमान एक दिवस  तरी मध्ये जाऊ द्या. ही ब्रा व्यवस्थित सुकणेही महत्वाचे आहे

स्टिक ऑन ब्रा वापरताय, तर तुम्हाला हे माहीत हवं (Stick-On Bra In Marathi)

कशी वापरायची स्टिक ऑन ब्रा (How to use stick on bra)

काही महिलांना अजूनही स्टिक ऑन ब्रा कशी वापरायची ते माहीत नाही. तुम्ही या टिप्सचा वापर करा आणि स्टिक ऑन ब्रा नक्की घाला 

ADVERTISEMENT
  • स्टिक ऑन ब्रा घातल्यानंतर घाम येऊ देऊ नका 
  • कप्स एका पोझिशनवर चिकटवा. संपूर्ण ब्रा एकत्र चिकटविण्यापेक्षा तुम्ही दोन्ही कप्स वेगवेगळे लावा आणि मग क्लिप लावा. यामुळे स्टिक ऑन ब्रा पटकन घालून होईल आणि त्रासही होणार नाही. तसंच कव्हरेजही जास्त मिळेल
  • दोन्ही कप्स सरळ रेषेत येण्यासाठी तुम्ही थोडेसे अॅडजस्टही करू शकता 
  • क्लिप लावल्यानंतर तुमचे काम पूर्ण. स्टिक ऑन ब्रा व्यवस्थित राहते

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT