सनस्क्रिनचा करू नका अति वापर, होईल त्वचेचे नुकसान जाणून घ्या

सनस्क्रिनचा करू नका अति वापर, होईल त्वचेचे नुकसान जाणून घ्या

खरं तर सनस्क्रिन (sunscreen) लावण्याचा सल्ला प्रत्येक ऋतूमध्ये देण्यात येतो. पण उन्हाळ्याच्या दिवसात तर याचा आवर्जून वापर करायला हवा. आपण नेहमीच सनस्क्रिनचा वापर आणि त्यामुळे होणारे फायदे वाचत आलो आहेत. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेला संरक्षण देण्यासाठी नक्ची याचा उपयोग होतो. इतकंच नाही तर त्वचेवर येणारे काळे डाग, पिगमेंटेशन आणि स्किन टोन खराब झाल्यास त्यापासूनही सनस्क्रिनमुळे संरक्षण मिळते. पण जर सनस्क्रिनचा अधिक वापर केला आणि त्याचा योग्य वापर झाला नाही तर नक्की काय होते याबाबतही तुम्हाला माहिती असण्याची गरज आहे. सनस्क्रिनमुळे नक्की काय नुकसान होऊ शकतात हे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

त्वचेवर होते अलर्जिक रिअॅक्शन

Shutterstock

सनस्क्रिनमध्ये अनेक तऱ्हेच्या केमिकल्सचा वापर करण्यात येतो. यामुळे तुमच्या त्वचेवर अलर्जी निर्माण होते. लालपणा, खाज, सूज आणि चेहऱ्यावर चट्टे येणे या गोष्टीचे संकेत देतात की तुमच्या सनस्क्रिनमुळे तुम्हाला अलर्जी येत आहे. तसंच यामुळे तुमची त्वचा अधिक संवेदनशील होते. काही सनस्क्रिनमध्ये वापरण्यात येणाऱ्या PABA अर्थात पॅरा अमिनो बेंजॉईक अॅसिडमुळे तुम्हाला ही अलर्जी येऊ शकते. त्यामुळे सनस्क्रिनचा वापर करताना हा योग्य प्रमाणात करायला हवा. 

कसे वाचाल

सनस्क्रिन घेताना त्यामध्ये कोणते घटक आहेत याची शहानिशा करून घ्यावे. तसंच हायपोलेर्गेनिक लेबल असणारे सनस्क्रिन तुम्ही खरेदी करा. याशिवाय तुम्ही 24 तासाची एक पॅच टेस्टही करून पाहू शकता. यामुळे सनस्क्रिनचा तुमच्या त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होत नाहीये हे तुम्हाला कळेल आणि वापरणं सहज शक्य होईल.

डोळ्यांमध्ये जळजळ होणे

Shutterstock

सनस्क्रिनच्या अतिवापरामुळे डोळ्यांनाही त्रास होतो. डोळे हा अत्यंत कोमल भाग आहे. सनस्क्रिन चुकूनही डोळ्याच्या आत गेलं तरीही डोळ्यांची जळजळ होऊन तुम्हाला डोळ्यांचा त्रास सुरू होऊ शकतो. तसंच यामुळे डोळ्यांची संवेदनशीलता कमी होऊ शकते. त्यामुळे याचा वापर अति करू नका. 

कसे वाचाल

चेहऱ्यावर सनस्क्रिन लावताना आपल्या डोळ्यांच्या खाली अथवा डोळ्यांच्या आजूबाजूला लाऊ नका. या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. 

5 मेकअप उत्पादने जे घेतात तुमच्या त्वचेची काळजी, वापरणे योग्य

अॅक्नेची समस्या

Shutterstock

तुम्हाला जर अॅक्नेची समस्या (acne problem) असेल तर सनस्क्रिन लावल्यानंतर तुमच्या त्वचेची ही समस्या अधिक वाढीला लागते. जर तुम्ही ऑईल बेस्ड सनस्क्रिनचा (oil based sunscreen) वापर करत असाल तर ही समस्या अधिक वाढते. सनस्क्रिनमध्ये असणारे केमिकल्स तुमच्या त्वचेला हानिकारक ठरू शकतात आणि अॅक्नेशिवाय लालपणा, खाज आणि सूज येण्यासही कारणीभूत ठरू शकते. 

कसे वाचाल

साधारणतः अॅक्नेची समस्या वाढण्याचे कारणच सनस्क्रिन ठरू शकते. त्यामुळे तुम्ही अशा सनस्क्रिनचा वापर करा जे तुमच्या त्वचेच्या टाईपला योग्य ठरते. नॉन ग्रीसी आणि नॉन कॉमेडोजेनिक सनस्क्रिन हे तुमच्या त्वचेसाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. याशिवाय तुमच्या चेहऱ्यावर वापरण्यात येणारे सनस्क्रिन हे शरीरासाठी असणाऱ्या सनस्क्रिनपेक्षा वेगळे असते हे लक्षात घ्या. 

कोरड्या त्वचेला म्हणा Bye… करा असे 6 घरगुती उपाय

संवेदनशील त्वचेला त्रासदायक ठरू शकते

Beauty

GLOW Iridescent Brightening Moisturising Cream

INR 1,595 AT MyGlamm

तसं तर सनस्क्रिनचा वापर हा प्रत्येक महिलेने करायला हवा. जेणेकरून त्वचेची योग्य काळजी घेता येईल. पण तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तुम्हाला कोणते सनस्क्रिन वापरत आहात याची योग्य पद्धतीने खात्री करून घेता यायला हवी. सनस्क्रिनमधील घटक हे संवेदनशील त्वचेवर (sensitive skin) नेहमी त्रासदायक ठरतात. त्वचेला कोरडेपणा, खाज आणि सूज तसंच जळजळ निर्माण करण्यासारख्या समस्या यामुळे निर्माण होतात. 

कसे वाचाल 

सनस्क्रिन खरेदी करण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करून घ्या. विशेषतः तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही हा मार्ग स्वीकारायला हवा. जर सनस्क्रिन तुमच्या त्वचेला त्रासदायक ठरत असेल तर लगेच चेहरा धुवा. 

टॅन व्हायचं नसेल तर असं लावा सनस्क्रिन, जाणून घ्या योग्य पद्धत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक