ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
आईला समर्पित मदर्स डे स्पेशल बॉलीवूड गाणी

आईला समर्पित मदर्स डे स्पेशल बॉलीवूड गाणी

मदर्स डे च्या निमित्ताने आईसाठी शुभेच्छा देण्यासाठी या लेखात खास आईला समर्पित गाणी तुमच्यासाठी आणली आहेत. आईसाठी कविता करण जमणार नसेल किंवा आईसाठी सेलिब्रेशन करण्यासोबत अजून काही करत असेल तर बॉलीवूड तुमच्या मदतीला आलं आहे. 

बॉलीवूडमध्ये आईला समर्पित अनेक भूमिका आणि चित्रपट आले आहेत. जेवढे चित्रपट आले त्यांनी आईची वेगवेगळी रूप दाखवली. खऱ्या आयुष्याप्रमाणे चित्रपटाच्या पडद्यावरची आईसुद्धा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. त्यांना प्रत्येक संकटातून वाचवू शकते, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखू शकते आणि योग्य मार्गावर आणू शकते, असं दाखवलं जातं. आईचं मुलांवरील प्रेम दाखवणारी अनेक गाणी बॉलीवूड चित्रपटांचा भाग आहेत. अनेक बॉलीवूड संगीतकारांनी खास आईला समर्पित गाणीही केली आहेत. हिंदी सिनेमातील आईच्या ममतेला आणि प्रेमाला संगीत व शब्दांच्या माध्यमातून हुबेहुब सांगतात. ही गाणी तुम्ही येत्या मदर्स डे ला आपल्या आईला डेडीकेट करू शकता. आईजवळ असो किंवा लॉकडाऊनमुळे तिची भेट घेणं शक्य नसलं तरी या गाण्यांच्या माध्यमातून तुम्ही

राजा आणि रंक मधील ‘तू कितनी अच्छी है’

या गाण्याची सुरूवात होताच जणू काही अंगावर रोमांच उभे राहतं. नाही का? 1968 साली आलेल्या राजा आणि रंक या चित्रपटातलं तू कितनी अच्छी है गाणं फारचं सुंदर आहे. आईचं आपल्या मुलांवरील प्रेम सांगणार हे गाणं आहे. ज्याचे शब्द थेट मनाला भिडतात. लता मंगेशकर यांच्या आवाजाने सजलेलं हे गाणं लोकं आजही ऐकतात आणि हे गाणं ऐकल्यावर आपल्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

तारे जमीं पर मधील ‘माँ’

लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित सिनेमा म्हणजे तारें जमीं पर हा सिनेमा होय. आईवडिलांच्या दबावामुळे मुलांतील कलागुणांना वाव न मिळता त्याची कला कशी कोमजते. पण एका चांगल्या शिक्षकामुळे पुन्हा एकदा त्याला योग्य खतपाणी मिळते आणि ते मुलं बहरते, अशी या चित्रपटाची कथा आहे. चित्रपटातील माँ हे गाणं ऐकल्यावर कोणत्याही वयातील व्यक्ती इमोशनल होईल. या गाण्यात ज्या पद्धतीने मुलाच्या आपल्या आईबाबतच्या भावना जाहीर करण्यात आल्या आहेत त्या आपल्या मनाला स्पर्श करून जातात. हे गाणं खुपच सुंदररित्या चित्रितही करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

दसविदानिया चित्रपटातील ‘मम्मा’

https://youtube.com/watch?v=uAdfBo98kJA

गायक कैलाश खेर याच्या आवाजातील मम्मा हे गाणं खूपच सुंदर आहे. मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्या आईवरील त्यांचं प्रेम आणि आईचे मुलांवरील प्रेम कमी होताना दिसत नाही. अशा भावना चित्रपट दसविदानिया मधील मम्मा या गाण्यात जाहीर करण्यात आलं आहे.

ABCD2 मधील ‘माई तेरी चुनरिया’

बॉलीवूड अभिनेता वरूण धवनला आपण आत्तापर्यंत जास्तीतजास्त वेळा विनोदी भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण त्याच्या अभिनयाची भावनिक बाजू ABCD2 चित्रपटातील चुनर या गाण्यातून दिसून आली. या गाण्यातील वरूणचा परफॉर्मन्स पाहताना नकळत तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आईला गमावल्यानंतरच दुःख वरूणने या गाण्यात डान्सच्या माध्यमातून मांडलं आहे. वरूणचा या गाण्यावरील डान्समधून त्याच्या व्यक्तिरेखेच दुःख प्रेक्षकांच्या मनाला भिडतं, यात शंका नाही.

हम साथ साथ है चित्रपटातलं ‘ये तो सच है की भगवान है’

आईला ईश्वराचं रूप मानलं जातं, कारण आईसारखं प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही. हे सत्य आहे. हम साथ साथ है या कौटुंबिक चित्रपटातील हे गाणं फारच सुंदर आहे. हा संपूर्ण चित्रपट नातेसंबंधांवर आधारित असल्याने ये तो सच है की भगवान है हे गाणं या चित्रपटात चपखल बसलं आहे.

नीरजा चित्रपटातील ‘ऐसा क्यू माँ’

विमान अपहरणावरील नीरजा या चित्रपटातील सुनिधी चौहानच्या आवाजातील हे गाणं फार सुंदर आहे. सर्व जग तुझ्यासारखं का नाही आई हा प्रश्न विचारणारं हे गाणं प्रसून जोशी यांनी लिहीलं आहे. आपली मुलगी जवळ नसताना तिला आठवणारी आई आणि दुसरीकडे मृत्यूला समोर पाहून धीर एकटवणारी मुलगी या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

खुबसूरत चित्रपटातलं ‘माँ का फोन आया’

खरंतर नेहमी आईवरची गाणी ही मनाला स्पर्श करणारी आणि भावनिक असतात. पण हे गाणं मात्र सगळ्या गाण्यांपेक्षा वेगळं आणि मजेदार आहे. यंदा मदर्स डे ला हलकंफुलकं वातावरण हवा असेल, तर हे गाणं नक्की ऐका.

सिक्रेट सुपरस्टार चित्रपटातलं ‘मेरी प्यारी अम्मी’

सिक्रेट सुपरस्टार हा सांगितिक चित्रपट आहे. त्यातलं मेरी प्यारी अम्मी हे गाणं खूपच सुंदर आहे. एक मुलगी आपल्या आईच्या स्वभावाबाबत सांगणारं हे गाणं ऐकताना तुम्हालाही छान वाटेल. आपल्या मुलीला गायिका होण्यासाठी कुटुंबाविरोधात जाऊन पाठिंबा देणारी आई या चित्रपटात दाखवली आहे.

मासूम चित्रपटातलं ‘दो नैना और एक कहानी’

https://youtube.com/watch?v=T1NtFQHEZhQ%3Flist%3DPL4OqLl4qvLkd7B6gohGVWBsnMNhOMbFwf

आईची अंगाई ऐकल्याशिवाय मुलांना झोप लागणं तसं कठीणच नाही का? मासूम चित्रपटातलं ही अंगाई फारच गोड आहे. गुलजार यांच्या शब्दांनी आणि आर डी बर्मन संगीताने सजलेलं हे गाणं सदाबहार आहे. थोडा सा बादल थोडा सा पानी और एक कहानी असे शब्द असलेलं गाणं आजही ऐकायला छान वाटतं. तुम्ही या आधी ऐकलं नसेल तर या मदर्स डे ला नक्की ऐका.

लाडला चित्रपटातील ‘तेरी उंगली पकड के चला’

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या लाडला चित्रपटातील हे गाणं जास्त प्रसिद्ध नसलं तरी आईवरील सुंदर गाणं आहे. गीतकार समीर यांचे शब्द आणि आनंद-मिलींद यांच्या संगीताने सजलेलं हे गाणं नक्की ऐका.

06 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT