फेसमास्कच्या अति वापरामुळे त्वचेवर होतात हे परिणाम, करु नका दुर्लक्ष

फेसमास्कच्या अति वापरामुळे त्वचेवर होतात हे परिणाम, करु नका दुर्लक्ष

चेहरा छान टवटवीत दिसावा म्हणून आपल्यापैकी अनेक जणी नक्कीच फेसमास्कचा वापर करत असतील. ब्युटी रेजिममध्ये आठवड्यातून किमान 2 वेळा फेसमास्क लावणे अगदी ठरलेले असते. पण मास्कच्या वापरामुळे त्वचा चांगली होते म्हणून त्याचा अति वापर करणेही चांगले नाही. फेसमास्कच्या अति वापराचे परिणाम नक्कीच त्वचेवर दिसून येतात. जर तुम्ही फेसमास्क लावत असाल आणि तुमच्या त्वचेवर होत असतील असे काही परिणाम तर तुम्ही त्याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. जाणून घेऊया अति फेसमास्क वापरण्याचे दुष्परिणाम

केसांची वाढ होईल दुपटीने, घरीच बनवा कडीपत्ता तेल

Instaram

पिंपल्स
फेसमास्क हे त्वचेच्या पोअर्समध्ये जाते. त्यामधील घटक हे त्वचेचे पोअर्स स्वच्छ करत असले आणि त्वचेला तजेला देण्याचे काम करत असले तरी देखील याच्या जास्त वापरामुळे त्वचेच्या पोअर्समध्ये फेसमास्कचे काही घटक राहण्याची शक्यता असते. काही जणांना अचानक पिंपल्स येत असतील तर त्यामागे तुमचा फेसमास्कचा अति वापरही कारणीभूत असू शकतो. जर अशापद्धतीने तुम्हाला त्वचेवर खूप पिंपल्स यायला अचानक सुरुवात झाली असेल तर तुम्ही आताच फेसमास्कचा प्रयोग थांबवा. त्यामुळे त्वचेचे होणारे अतिरिक्त नुकसान टळेल. 


चेहऱ्यावर रॅशेश उठणे
शरीराच्या इतर भागातील त्वचेच्या तुलनेत तुमची चेहऱ्यावरील त्वचा ही फारच नाजूक असते. अशा त्वचेला जरा काही खरचटलं तरी देखील रॅशेश येण्याची शक्यता असते. अनेकदा फेसमास्कमध्ये हे असे काही बारीक बारीक कण आणि वेगवेगळे घटक असतात. जे त्वचेवर रॅश येण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे जर तुम्हाला फेसमास्कच्या प्रयोगानंतर अशाप्रकारे रॅशेश येत असतील तर थोडे सावध राहा. त्वचेवर त्याचा वापर अजिबात करु नका.

उन्हाळ्यात शरीर कसे ठेवाल थंड, सोपे उपाय

चेहरा काळवंडणे
फेसमास्कच्या वापरानंतर सुंदर आणि छान त्वचा मिळेल अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. पण ज्यावेळी तुम्ही त्याचा अधिक वापर करण्यास सुरुवात करता. त्यावेळी त्यातील घटक तुमच्या त्वचेवर परिणाम करणे बंद करते. फेसमास्कच्या सतत वापरामुळे हे होते. अनेकदा तुम्ही वापरत असलेल्या चांगल्या फेसमास्कनंतरही असे झाले तर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. पण यासाठी कारणीभूत फेसमास्क नाही तर तुम्ही करत असलेला त्याचा वापर आहे. एखाद्या गोष्टीचा तुम्ही अति वापर केला तर त्याचे विपरित परिणाम असे होऊ लागतात. त्वचेच्या रंगापेक्षाही त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत असेल तर अशी त्वचा ही कायम फ्रेश दिसते. पण जर ऑक्सिजन कमी झाले तर चेहरा हा बुजलेला आणि खराब दिसू लागतो. 


चेहऱ्यावर अतिरिक्त तेल
खूप फेस मास्क हे नैसर्गिक घटकाने बनवलेले असतात. त्यांचा विपरित परिणाम हा चेहऱ्यावर होत नाही असे आपल्याला वाटत असले तरी देखील काही नैसर्गिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल असते. ओट्स, चिआ सीड्स, पपई, संत्री, गुलाबपाकळ्या असे काही घटक हे जरी तुम्हाला चांगले वाटत असले तरी देखील त्यांच्या अतिवापरामुळे चेहऱ्यावर सतत तेल येत राहते. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर फेसमास्कचा अतिरिक्त वापर टाळा. 


फेसमास्क हा फारतर आठवड्यातून अगदी एकच वेळा लावण्यासारखा आहे किंवा जर तुम्हाला अगदीच काही खास प्रसंगी बाहेर जायचे असेल अशावेळी तुम्ही किमान एक दिवस आधी फेसमास्क लावा. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही

कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा