ADVERTISEMENT
home / आरोग्य
कोरोना टेस्ट निगेटिव्ह असूनही दिसत असतील लक्षणं, तर करा हे उपाय

कोरोना टेस्ट निगेटिव्ह असूनही दिसत असतील लक्षणं, तर करा हे उपाय

मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना व्हायरस भारतात आला आणि त्याचा थैमान आजही सुरूच आहे. सध्या तर कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आहे. सहाजिकच पहिल्या वेळेपेक्षा दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण जास्त सावध राहणं गरजेचं आहे. कारण कोरोना व्हायरस कधीही सक्रिय होऊ शकतो हेच यातून दिसून आलं आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळी अनेक लोकांमध्ये निरनिराळी लक्षणं दिसत आहेत. काही लोकांना कोरोनाची सर्व लक्षणं दिसूनही त्यांची RT-PCR टेस्ट मात्र चक्क निगेटिव्ह आलेली आहे. यासाठीच जाणून घ्या अशा वेळी नेमकं काय केलं पाहिजे.

कारण समजा एखाद्या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आणि ती व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर योग्य ट्रिटमेंट न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचे आयुष्य आणि त्याच्या संपर्कात  आलेल्या इतर लोकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. यासाठीच जर तुम्हाला  कोरोनाची लक्षणे दिसत असतील पण तुमची टेस्ट निगेटिव्ह असेल तर खाली दिलेल्या गोष्टी अवश्य करा. 

कोरोना निगेटिव्ह असाल तरी करा या गोष्टी

कोरोना संक्रमित असूनही काही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत यासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आल्यावर त्वरीत करा या गोष्टी

स्वतःला आयसोलेट करा –

कोरोना संक्रमणानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट करायला हवी ती म्हणजे सेल्फ आयसोलेशन. जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसत असतील तर लगेच स्वतःला आयसोलेट करा. ज्यामुळे तुमच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होणार नाही. स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. 

ADVERTISEMENT

पुन्हा कोरोनाची टेस्ट करा –

कोरोनाची लक्षणे असूनही तुमची टेस्ट निगेटिव्ह आली असेल तर तुम्हाला परत कोरोनाची टेस्ट करण्याची गरज आहे. कारण कधी कधी एखादा चुकीचा रिपोर्ट तुम्हाला मिळण्याची शक्यता असते. शिवाय कोरोनाची लक्षणे असतील तर पुन्हा टेस्ट करण्यास काहीच हरकत नाही. तेव्हा परत कोरोना टेस्ट करण्याची टाळाटाळ करू नका.

तुमच्या शारीरिक लक्षणांकडे लक्ष द्या –

कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर लगेच बिनधास्त होऊ नका. कारण जर तुम्हाला  सर्व शारीरिक लक्षणं जाणवत असतील तर थोडं सावध राहण्याची  गरज आहे. त्यामुळे एक ते दोन दिवस तुमची  सर्व शारीरिक लक्षणं नोंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. दिवसभरात तीन ते चार वेळा तुमचे तापमान, ऑक्सिजन लेवल, ब्लड प्रेश आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी चेक करा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या –

कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर स्वतःच तर्क वितर्क करत बसू नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण डॉक्टरांनी अनेक रूग्णांचा आजवर अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे या सर्व अनुभवातून ते तुम्हाला योग्य असा सल्ला देतील. यासाठी तुम्हाला कोणत्या टेस्ट करण्याची गरज आहे याबद्दल तुमच्या डॉक्टरांची सल्ला मसलत करा.

सिटी स्कॅन करणं आहे गरजेचे –

अशा परिस्थितीच वैद्यकीय सल्ला असा दिला जातो की अशा रूग्णांना त्वरीत सिटी स्कॅन करून घ्यावा. कारण या टेस्टमुळे तुम्हाला कोरोनाबाबत खरा रिपोर्ट मिळू शकतो. छातीत इनफेक्शन झालं आहे का हे पाहून तुम्हाला तुमच्या कोरोना इनफेक्शनबाबत योग्य माहिती नक्कीच मिळू शकते. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – 

अधिक वाचा –

कोरोनातून बरं झाल्यावर का बदलावा टूथब्रश आणि टंग क्लिनर

कोरोनाच्या काळात गृहनिर्माण संस्थांना ‘या’ गोष्टी माहित असायला हव्या

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात नियमित प्या काकडीचे पाणी

16 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT