ADVERTISEMENT
home / Jewellery
लग्नानंतर घालायची असेल ‘जोडवी’, तर जाणून घ्या ट्रेंडिंग डिझाईन्स

लग्नानंतर घालायची असेल ‘जोडवी’, तर जाणून घ्या ट्रेंडिंग डिझाईन्स

लग्नानंतर पायात घालणारी जोडवी ही नेहमीच आपल्या आकर्षणाचा एक भाग असतो. जोडवी नक्की का घालायची तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक शरीरातील उष्णता शोषून घेण्यासाठी ही चांदीची जोडवी पायात लग्नानंतर घातली जातात. तसंच लग्न झालेल्या स्त्री साठी हे अत्यंत शुभ मानले जाते. आजकाल या जोडवी केवळ एकाच डिझाईन्सच्या नाहीत तर अगदी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आणि ट्रेंडिंग स्टाईल्सच्या असतात. लग्नानंतर त्यामुळे तुम्हाला जर पायात जोडवी घालयची असतील तर तुमच्याकडे आता अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. तुम्ही चांदीच्या वापरणार असलात तर चांदीच्या अथवा वेगवेगळ्या धातूच्या आणि डिझाईन्सच्या जोडवीही आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. लग्न झालेल्या स्त्री साठी जसं नवरीचे मराठी उखाणे घेणं हे कंपल्सरी असतं. तसंच जोडवी हेसुद्धा सुवासिनीचं प्रतीक मानलं जाते. त्यामुळे टिकली, साडी यासाह जोडवीही घातली जाते. बदलत्या फॅशनसह जोडव्यांची फॅशनही बदलली आहे. स्टायलिश आणि ट्रेंडी डिझाईन्सची जोडवी आता तुम्ही जीन्स, स्कर्ट अशा आधुनिक आणि फॅशनेबद कपड्यांसह घालू शकता. पाहूया कोणकोणती वेगवेगळी जोडवी डिझाईन्स आहेत. 

स्टोन्सची जोडवी

 

बऱ्याच मुलींना लग्नानंतर जोडवी घालायला आवडतात. पण अगदी पारंपरिक जोडव्यांपेक्षा वेगवेगळ्या फॅशन्सची जोडवी आता सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यापैकी स्टोन्सच्या जोडव्यांना सध्या जास्त मागणी आहे. स्टोन्सच्या जोडव्यांमध्येही वेगवेगळ्या रंगाचे आणि तुमच्या आवडीनुसार स्टोन्स तुम्हाला जोडव्यांमध्ये दिसून येतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निवड करून चांदीमध्ये स्टोन्स लाऊून घेऊ शकता अथवा तुम्हाला हवं असल्यास, ऑक्सिडाईज्ड जोडवीही मिळतात. 

सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह ट्रेंडिंग आहे पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी (Jewellery Trends In Marathi)

ट्रेडिशनल अर्थात पारंपरिक डिझाईन्सची जोडवी

भारतात अजूनही अनेक ठिकाणी विशेषतः गावागावांमध्ये लग्न झाल्यानंतर पायात जोडवी घालण्याची परंपरा कायम आहे. पारंपरिक जोडव्यांना अजूनही मागणी आहे. फुलांच्या डिझाईन्सच्या जोडवी आजही जास्त प्रमाणात घेतल्या जातात. पायांमध्ये या जोडवी अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसतात. लग्नाच्या आधी नेहमीच मुली जोडवी खरेदी करताना अशा जोडव्यांना आजही प्राधान्य देताना दिसतात. या जोडव्या कोणत्याही फॅशनवर आकर्षकच दिसतात.

ADVERTISEMENT

टेम्पल ज्वेलरीचा साज भारी, लग्नामध्ये वाढतोय दागिन्यांचा ट्रेंड

स्टायलिश जोडवी

तुम्हाला पारंपरिक जोडवी नको असतील तर तुम्ही त्याऐवजी स्टायलिश जोडवी घाला. बाजारामध्ये अनेक रिंग टाईप जोडवी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. वेगवेगळी डिझाईन्स असणारी जोडवी ही तुमच्या पायांची शोभा अधिक वाढवते. तुम्हाला कोणालाही लग्नामध्ये गिफ्ट द्यायचं असेल तर ही जोडव्या देण्याची कल्पना अधिक चांगली आहे. अशी नवी स्टायलिश जोडवी देऊन तुम्हाला आणि समोरच्या व्यक्तीलाही तितकाच आनंद होईल हे नक्की. 

सिलव्हर जरीच्या साड्या आणि ज्वेलरी आहेत सध्याचा फेस्टिव्ह ट्रेंड, नक्की ट्राय करा

सिंपल डिझाईन जोडवी

काही महिलांना स्टायलिश अथवा अगदी पारंपरिक जोडवीही आवडत नाहीत. मग अशा महिलांसाठी बाजारामध्ये अगदी साध्या डिझाईन असणाऱ्या जोडवीही उपलब्ध असतात. तुम्हाला परंपरा आणि आधुनिकता असा दोन्हीचा मेळ जपायचा असेल तर तुम्ही अशा जोडवी नक्की घाला. ऑफिसमध्ये जाण्यासाठीही अशा जोडवीचा उपयोग करून घेता येतो. 

ADVERTISEMENT

नववधूकरिता नऊवारी साडी प्रकार आणि खास डिझाईन्स

रिंग डिझाईन

 

आजकाल रिंग डिझाईन जोडव्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषतः ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला अशा डिझाईन्सच्या जोडवी घालणं अधिक पसंत करतात. तुम्हालाही अगदी साधा लुक हवा असेल आणि त्रासदायक जोडवी नको असतील तर तुम्ही या रिंग डिझाईनची निवड करू शकता.

जाणून घ्या पैंजण घालण्यामुळे होणारे आश्चर्यकारक फायदे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
16 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT