ADVERTISEMENT
home / मेकअप
सोशल मीडियावरील नवा ब्युटी ट्रेंड, ब्रो सोपने करा भुवया सेट

सोशल मीडियावरील नवा ब्युटी ट्रेंड, ब्रो सोपने करा भुवया सेट

सोशल मीडिया ट्रेंड (Social Media Trend) नुसार फॅशन आणि ब्युटीमध्ये अनेक बदल होताना दिसतात.एखादा ब्युटी ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला की मग सर्वजण तो फॉलो करू लागतात.  सध्या सोशल मीडियावर ब्रो सोप वापरण्याचा ट्रेड दिसून येत आहे. कदाचित तुम्हाला या ट्रेंडबाबत आधीच सर्व काही माहीत असेल आणि तुम्ही तो नियमित वापरतही असाल. मात्र आजही अशा अनेक महिला आहेत ज्यांना या विषयी नक्कीच काही माहीत नसेल. यासाठीच आम्ही तुम्हाला ब्रो सोपविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पातळ भुवया सेट करून जाड आणि घनदाट करता येतील.

काय आहे ब्रो सोप (What is Brow Soap)

आजकाल तरूणींना जाड आणि घनदाट भुवया आवडतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे  बारीक कोरलेल्या  भुवयांचा सध्या ट्रेंड नाही. मात्र असं असलं तरी सर्वांच्या आयब्रोज नक्कीच दाट आणि घनदाट नसतात. अशा वेळी तुम्ही ब्रो सोपचा वापर करून तुमच्या आयब्रोज सेट करू शकता. सोशल मीडियावर हा ब्युटी ट्रेंड सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ब्रो साबणामध्ये ग्लिसरिन असते. ज्यामुळे ब्रो सोप लावल्यावर ग्लिसरिनचा कोट तुमच्या आयब्रोजच्या केसांवर पसरतो. भुवयांचे केस सेट होण्यासाठी आणि एकाच जागी राहण्यासाठी ग्लिसरीन फायदेशीर ठरते. शिवाय ब्रो सोप खूप स्ट्रॉंग असतो ज्यामुळे तुमच्या भुवया एकाच जागी सेट होतात. 

कसा तयार करावा घरी ब्रो सोप

बाजारात ब्रो सोप विकत मिळतात. मात्र तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी देखील ब्रो सोप बनवू शकता.

  • एक साबणाची वडी घ्या, शक्य असल्यास चांगला सुंगध आणि नॅचरल घटक असलेला साबण घ्या. ग्लिसरिनयुक्त साबण घेतल्यास अधिक चांगला परिणाम मिळू शकेल.
  • साबणाचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते वितळवून एका बाटलीत अथवा डबीत भरा. 
  • वितळवलेल्या साबणाची डबी फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा 
  • तुमचा ब्रो सोप तयार आहे

कसा वापराल ब्रो सोप

ब्रो सोपचा वापर करणे अतिशय सोपे आहे.

ADVERTISEMENT
  • एक स्पुली ब्रश घ्या आणि त्यावर गुलाब पाणी अथवा फेस मिस्ट स्प्रे करा
  • ब्रशला आता ब्रो सोप लावा ज्यामुळे ते एखाद्या जेलप्रमाणे तुमच्या भुवयांवर पसरेल
  • अतिशय थोडं प्रॉडक्ट वापरा जास्त घेण्याची गरज नाही
  • भुवयांवर स्पुली ब्रशने साबण सेट करा आणि तो सुकू द्या
  • गरज असल्यास आयब्रो पेन्सिल अथवा आयब्रो जेलने विरळ भाग भरून टाका
  • ब्रो सोप वापरताना काय माहीत असायला हवं 
  • जर तुमची त्वचा  संवेदनशील असेल आणि तुम्हाला ब्रो सोप लावल्यावर इटिटेशन होत असेल तर दिवसभर ब्रो सोप वापरू नका
  • शक्य असल्यास नैसर्गिक घटक असलेला साबण वापरा ज्यामुळे त्वचेचं नुकसान होणार नाही
  • पहिल्यांदा  वापरताना तुम्हाला हवा तसा परिणाम कदाचित मिळणार नाही मात्र सरावाने तुम्ही तुमच्या आयब्रोज छान सेट कराल
  • ब्रो सोपचा अती वापर त्वचेसाठी  हानिकारक असू  शकतो त्यामुळे गरज असेल तेव्हाच ब्रो सोप वापरा

 

आम्ही शेअर केलेल्या या ब्युटी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

लग्नानंतर चेहऱ्यावर तेज येण्यासाठी सोप्या टिप्स

फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

केसांसाठी कोणता कंगवा आहे फायदेशीर जाणून घ्या

19 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT