ADVERTISEMENT
home / Care
डोक्यात खूप खाज येत असेल तर वापरा हे हेअरमास्क

डोक्यात खूप खाज येत असेल तर वापरा हे हेअरमास्क

उन्हाळा असो अथवा कोणताही ऋतू असो, ज्यांना खूप घाम येतो त्यांना बरेचदा डोक्यात खूप खाजही येते. हेल्दी हेअर अर्थात केस (Healthy Hair) चांगले राखण्यासाठी चांगल्या आणि निरोगी हेअर मास्कचा (Hair Mask) उपयोग करून घ्यायला हवा. असे अजिबात गरजेचे नाही की, प्रत्येकवेळी बाजारातील वस्तू आणाव्यात. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील वस्तूंचा वापर करूनही तुम्ही हेअर मास्क बनवून केसांची काळजी घेऊ शकता. याचा वापर कसा करायचा आणि कोणत्या वस्तू उपयोगी पडतील हे तुम्हाला आम्ही या लेखातून सांगत आहोत. दालचिनी हा असा मसाला आहे ज्याचा आपण नेहमी पदार्थांमध्ये वापर करतो. पण केसांच्या सौंदर्यासाठीही याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी दुधामध्ये दालिचिनी मिक्स करून बरेच जण पितात. याचा वापर केल्याने कोरडी त्वचा, डोक्यात येणारी खाज, केसगळती या समस्या निघून जाण्यास मदत मिळते. दालचिनीपासून तयार करण्यात आलेले हे DIY आणि नक्की कोणते हेअर मास्क उपयोगी ठरतात आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते पाहूया. 

कोरड्या स्काल्पसाठी हेअरमास्क (Hair Mask for Dry Scalp)

कोरड्या स्काल्पसाठी हेअरमास्क (Hair Mask for Dry Scalp)

Freepik

साहित्य 

ADVERTISEMENT
  • नारळाचे तेल 3-4 चमचे
  • दालचिनी पावडर 2 चमचे 

वापरण्याची पद्धत 

  • दालचिनी पावडर अथवा दालचिनीच्या काड्या नारळाच्या तेलात घालून मिक्सरमधून ब्लेंड करून घ्या
  • आता हे मिश्रण तुम्ही भिजवून केसांच्या मुळापासून लावा आणि साधारण 5 मिनिट्स मसाज करा. लक्षात ठेवा मसाज हा सर्क्युलर मोशनमध्ये आणि अगदी हलक्या हाताने करावा 
  • मसाज केल्यानंतर साधारण 45 मिनिट्स अर्थात पाऊण तास हे तसंच राहू द्या. नंतर केस धुवा आणि परिणाम पाहा. तुम्हाला केस अधिक मऊ, मुलायम आणि चमकदार दिसून येतील
  • स्काल्प कोरडा राहात असेल तर तुम्ही या हेअरमास्कचा वापर आठवड्यातून एकदा नक्की करा 

केसांसाठी कडुलिंबाचे फायदे (Benefits Of Neem For Hair In Marathi)

केसांची वाढ होण्यासाठी (Hair Mask For Hair Growth)

केसांची वाढ होण्यासाठी (Hair Mask For Hair Growth)

Shutterstock

ADVERTISEMENT

साहित्य 

  • दालचिनी पावडर 2 चमचे 
  • कॅस्टर ऑईल 5-6 चमचे (केसांच्या लांबीनुसार)
  • रोझमेरी इनेन्शियल ऑईल 10 थेंब 

वापरण्याची पद्धत 

  • आता सर्व साहित्य तुम्ही व्यवस्थित मिक्स करा आणि स्कॅल्पला लावा. काहीवेळ तुम्ही व्यवस्थित मसाज करा आणि अर्धा तास तसंच राहू द्या
  • अर्धा तास झाल्यावर माईल्ड शँपू लावा आणि केस धुवा. त्यानंतर कंडिशनर लावा 
  • केसांची वाढ होत नसेल तर तुम्ही हा हेअर मास्क आठवड्यातून दोन वेळा लावा 
  • या हेअरमास्कच्या वापराने कोरडेपणा आणि खाजेची समस्या निघून जाते 

घनदाट केसांसाठी वापरा कांद्याचा हेअरमास्क

काळ्या आणि चमकदार केसांसाठी हेअरमास्क (Hair Mask for Black and Shiny hair)

काळ्या आणि चमकदार केसांसाठी हेअरमास्क (Hair Mask for Black and Shiny hair)

ADVERTISEMENT

Shutterstock

साहित्य 

  • हेअर कंडिशनर 2-3 चमचे (केसांच्या लांबीनुसार)
  • दालचिनी पावडर 1 चमचा 

वापरण्याची पद्धत 

  • तुम्ही तुमच्या केसांचा रंग गडद करू इच्छित असाल तर तुम्ही दालचिनीचा हेअरमास्क नक्की वापरून पाहा. यासाठी
  • तुम्ही तुमच्या आवडीच्या हेअर कंडिशनरमध्ये दालचिनी पावडर मिक्स करा आणि आपल्या पूर्ण केसांना लावा
  • लक्षात ठेवा की, हे स्काल्प अथवा केसांच्या मुळांना लागू नये. हेअर पॅक केसांना लावल्यावर शॉवर कॅप घाला आणि मग रात्रभर तसंच ठेवा 
  • दुसऱ्या दिवशी सकाळी माईल्ड शँपू अथवा आपल्या आवडीच्या, नेहमीच्या शँपूने केस धुवा. केसांना चमक येऊन उत्तम रंग येतो. 
  • हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की वापरू शकता

एका रात्रीत होईल केसांमध्ये फरक, वापरा हा हेअरमास्क

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

02 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT