ADVERTISEMENT
home / Care
केसांचा गुंता सोडविण्यासाठी 5 सोप्या टिप्स, केस नाही तुटणार

केसांचा गुंता सोडविण्यासाठी 5 सोप्या टिप्स, केस नाही तुटणार

केस धुतल्यानंतर अथवा झोपेतून उठल्यानंतर सर्वात पहिली त्रासदायक गोष्ट म्हणजे केसांचा होणार गुंता. त्यातही केस जर मोठे असतील तर हा गुंता सोडविणे म्हणजे एक सर्वात मोठा टास्क आहे असंच म्हणायला हवं. केसांचा एकदा गुंता झाला की, तो सोडविणे हे महाकठीण काम. त्यातही केस कुरळे असतील तर मग दमछाक होणे नक्कीच. पण तुम्ही केस धुतल्यानंतर अथवा झोपतून उठल्यानंतर अगदी सहजरित्या हा केसांचा गुंता सोडवू शकता. केसांचा गुंता सोडविण्यासाठी आम्ही तुम्हाला 5 सोप्या टिप्स देत आहोत. तुम्ही याचा वापर करून सहजपणे केसांचा गुंता आता सोडवा. यामुळे तुमचे केसही तुटणार नाहीत आणि केसांची काळजी व्यवस्थित घेतली जाईल हे निश्चित. काय आहेत हे सोपे उपाय जाणून घेऊया. 

स्टेप 1 – कंडिशनर

स्टेप 1 - कंडिशनर

आपण शँपू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावतोच. जर तुम्ही लावत नसाल तर आताच सुरू करा. कारण कंडिशनर केसांना केवळ पोषणच देत नाही तर केसांचा गुंता सोडविण्यासाठी ही सर्वात पहिली स्टेप अर्थात सर्वात पहिली पायरी आहे. तुम्ही केसांमध्ये शँपू लावल्यानंतर केसांना कंडिशनर लावा. मुळापासून कंडिशनर कधीही लाऊ नये. केवळ केसांना वरून कंडिशनर लावावे. त्यानंतर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की, केस धुतल्यानंतर गुंता व्हायला नको असेल तर कंडिशनर लावल्यावरच तुम्ही केसांमधून जाड दातांचा कंगवा फिरवा. वरून खाली केस विंचरा. कंडिशनर तुम्ही साधारण 3-4 मिनिट्स तसंच राहू द्या. त्यानंतर तुम्ही तुमचे केस पाण्याने स्वच्छ धुवा. तसंच सर्वात महत्त्वाचे म्हणजे केस धुताना अधिक गरम पाण्याचा वापर करू नका. 

स्टेप 2 – टॉवेलने सुकवणे

स्टेप 2 - टॉवेलने सुकवणे

ADVERTISEMENT

Shutterstock

केस धुऊन झाल्यावर पहिले टॉवेलने पाणी तुम्ही टिपून घ्या. मग केसातील पाणी झाडून टाका आणि मग केस टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. 5-10 मिनिट्स केस टॉवेलमध्ये तसेच राहू द्या. पण लक्षात ठेवा केस टॉवेलमध्ये अधिक घट्ट बांधू नका. त्यामुळे केस तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे केस बांधताना व्यवस्थित तुम्ही अगदी हलक्या हाताने बांधा. टॉवेल घट्ट बांधून घेऊ नका. अन्यथा ओल्या केसांमुळे डोकं दुखण्याची शक्यता निर्माण होते. 

ओले केस पुसण्यासाठी मायक्रो फायबर टॉवेल वापरण्याचे हे आहेत फायदे

स्टेप 3 – लिव्ह इन कंडिशनर

जेव्हा केसांचा गुंता सोडविण्याची बाब असते तेव्हा तुम्ही एक लाईटवेट कंडिशनर वापरावे. कोणत्याही सीरमपेक्षा अधिक योग्य लिव्ह इन कंडिशनर असते. यासाठी तुम्ही तुम्हाला आवडेल ते लिव्ह इन कंडिशनर घ्या. हे केसांना तुटण्यापासून वाचविण्यासाठी मदत करते. तसंच ओल्या केसात लावल्याने केसांचा गुंता पटकन सोडविण्यासही मदत मिळते. त्याशिवाय लिव्ह इन कंडिशनर लावल्याने केसांना अधिक चांगली चमकही मिळते. मात्र त्वरीत तुम्ही घरच्या बाहेर जाऊ नका. कारण यावर पटकन धूळ आणि माती चिकटून बसते. त्यामुळे थोडा वेळ वाट पाहूनच तुम्ही बाहेर जा. 

ADVERTISEMENT

केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)

स्टेप 4 – केसांना विभागा

स्टेप 4 - केसांना विभागा

केसांचा गुंता सोडविण्यासाठी तुम्ही कंगव्याने एकत्र केस विंचरू नका. कारण हे चुकीचे आहे. यामुळे केसांचा गुंता अधिक वाढतो. केस तुम्ही विभागून घ्या आणि मगच विंचरा. केसांना मध्ये भांग पाडा आणि मग केस विंचरले की, गुंता सोडविणे सोपे होते. तसंच केस खेचले जात नाहीत आणि तुटतही नाहीत. 

केसांचा भांग बदलणे आहे गरजेचे, का ते जाणून घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 5 – मोठ्या दातांचा कंगवा वापरा

स्टेप 5 - मोठ्या दातांचा कंगवा वापरा

Shutterstock

केसांचा गुंता सोडविण्यासाठी तुम्ही मोठ्या दातांचा कंगवा वापरा. केसांसाठी नेहमीच मोठ्या दातांचा कंगवा योग्य ठरतो. यामध्ये केस अडकून पडत नाहीत आणि गुंता पटकन सोडवला जातो. केस खालून विंचरायला पहिले सुरूवात करा आणि मग वरच्या बाजूला विंचरा. सर्व केसांचा गुंता सोडवून झाला की, पुन्हा एकदा सर्व केस व्यवस्थित विंचरून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
14 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT