ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
5 सवयी ज्या तुमच्या केसांची वाढ होण्यास करतात मदत

5 सवयी ज्या तुमच्या केसांची वाढ होण्यास करतात मदत

आपले केस सुंदर, मजबूत, घनदाट आणि अप्रतिम असावेत असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. पण प्रदूषण, ताण, सतत बदलती लाईफस्टाईल, वेळेवर न जेवणे, पुरेशी झोप न मिळणे या सगळ्यामुळे आपल्याला हवे तसे उत्तम केस मिळणे जरा कठीण झाले आहे. पण सध्या लॉकडाऊन आहे आणि गेल्या दोन वर्षात घराच्या बाहेर जास्त न गेल्यामुळे केसही अधिक चांगले होऊ लागले आहेत. सध्या मिळालेला वेळ तुम्ही केसांची काळजी करण्यात नक्कीच घालवू शकता. तुम्ही काही योग्य 5 सवयी स्वतःला जर लाऊन घेतल्यात तर तुम्हाला नक्कीच घनदाट, मजबूत केस मिळतील. या सवयी नक्की कोणत्या आहेत आणि त्याचा कसा आपण उपयोग करून घेऊ शकतो हे या लेखातून आपण जाणून घेऊया. आपल्या केसांसाठी काही सोप्या आणि योग्य टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. याचा नक्की वापर करा.

1. हॉट ऑईल मसाज (Hot Oil Massage)

हॉट ऑईल मसाज (Hot Oil Massage)

Freepik

केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी हॉट ऑईल मसाज हा एक उत्तम उपाय आहे. हॉट ऑईल मसाजमुळे स्काल्पला तुम्ही उत्तम मॉईस्चर, आवश्यक विटामिन्स आणि पोषण देऊ शकता. याशिवाय या मसाजमुळे तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह चांगला राखण्यास मदत मिळते. रक्तप्रवाह चांगला राहिला तर केसांची वाढ चांगली होण्यास फायदा होतो. त्यामुळेच तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हॉट ऑईल मसाज केसांना द्यावा. साध्या नारळाच्या तेलाचाही तुम्ही यासाठी वापर केलात तरी उत्तम. नारळाचे तेल केसांना उत्तम पोषण देते आणि केसांना अधिक मजबूत करण्यास मदत मिळते.

ADVERTISEMENT

केसांच्या वाढीसाठी मसाजचे फायदे मराठीत (Benefits Of Head Massage For Hair)

2. केस सतत धुऊ नका

केस सतत धुऊ नका

Shutterstock

केस चांगले राखायचे असतील तर तुम्ही सतत केस धुऊ नका. सध्या तुम्ही बाहेर जास्त जात नसाल तर तुमच्या केसांवर धूळ, प्रदूषण आणि माती या गोष्टी जास्त त्रासदायक ठरत नसतील. त्यामुळे तुम्हाला रोज केस धुवायची गरज नाही. एक अथवा दोन दिवस आड करून केसांवरून आंघोळ करा. आठवड्यातून तुम्ही दोन वेळा शँपू करा आणि तोदेखील अत्यंत सौम्य शँपूचा वापर करा. तसंच केसांची काळजी घेण्यासाठी केसांमध्ये पाणी राहू देऊ नका. आंघोळ झाल्यानंतर व्यवस्थित सुके करा.

ADVERTISEMENT

3. रिपेअर डॅमेज

तुम्ही बरेचदा पार्लरमध्ये जाऊन केसांना कलर करणे अथवा केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करताना वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करणे हे तर करतच असाल. पण त्यामुळे केसांची नीट काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अचानक केसांची वाढ थांबते अथवा केसगळती सुरू होते. केसांच्या या रिपेअर डॅमेजसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा हेअरमास्कचा नक्कीच वापर करणे आवश्यक आहेत. हेअरमास्क काही विशिष्ट घटकांपासून तयार होतात ज्यामुळे केसांना पोषण मिळते. यामुळे केसांना डीप हायड्रेशन मिळते. याचा वापर केल्याने केसांचे तुटणे कमी होते आणि केसांची इलास्टिसिटी वाढते आणि केस वाढण्याची प्रक्रिया अधिक जलद होते. त्यामुळे याचा वापर तुम्ही नक्कीच करून घ्यायला हवी. ही सवय तुम्ही स्वतःला लाऊन घ्या.

केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी उत्तम आहे अंड्याचा हेअर मास्क (Egg Hair Mask In Marathi)

4. स्काल्प स्क्रबचा वापर करा

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणेच स्काल्पवर धूळ, माती, तेल, घाम आणि उत्पादनांच्या वापरामुळे त्रास होतो. यामुळे हेअर फॉलिकल्स खराब होतात आणि केसांची वाढ थांबते. ही समस्या थांबविण्यासाठी अथवा या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही नियमित स्वरूपात स्काल्प स्क्रबचा वापर करू शकता. यामुळे केवळ स्काल्पवर जमा झालेली घाणच निघणार नाही तर तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह अधिक चांगला होण्यासही मदत मिळते आणि त्यामुळे केसांची वाढ होऊन केसांना अधिक मजबूती मिळते.

लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय (Home Remedies For Hair Growth In Marathi)

ADVERTISEMENT

5. हेल्दी जेवावे

हेल्दी जेवावे

Freepik

केसांची काळजी घेणे बाहेरून जसे गरजेचे आहे तसंच तुम्हाला केसांना आतूनही पोषण द्यायला हवे. त्यासाठी शरीराला आवश्यक जेवण खाणे गरजेचे आहे. त्यासाठी जेवणात ओमेगा – 3 फॅटी अॅसिड, बायोटिन आणि अन्य आवश्यक विटामिन्स आणि न्यूट्रिअंट्स समाविष्ट करून घ्यायला हवेत. यामुळे केसांची वाढ चांगली आणि मजबूत होण्यास मदत मिळते. तुम्ही अंडे, बेरीज, पालक, मासे, अवाकाडो याचा आपल्या जेवणात अर्थात डाएटमध्ये समावेश करून घ्यायला हवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
13 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT