ADVERTISEMENT
home / आरोग्य
Chikungunya Symptoms In Marathi

जाणून घ्या चिकनगुनिया लक्षणे मराठीतून (Chikungunya Symptoms In Marathi)

चिकनगुनिया या आाजाराचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होतं. कारण चिकनगुनिया झाल्यावर त्याचा त्रास एक ते दोन वर्ष होतो असं म्हणतात. चिकनगुनियामध्ये विचित्र अंगदुखी आणि भयंकर तापामुळे माणूस हैराण होतो. 2016 साली तर चिकनगुनिया या विषाणूजन्य आजाराने महामारीचे गंभीर रूप धारण केलं होतं. चिकनगुनिया म्हणजेच CHIKV व्हायरस संक्रमित डास चावल्यामुळे हा आजार होतो. चिकनगुनिया हा विषाणूजन्य आजार असला तरी तो संसर्गजन्य नक्कीच नाही. पण जर या आजारापासून सुटका हवी असेल तर न घाबरता याचा सामना करायला हवा. शिवाय चिकनगुनियाची लक्षणे वेळीच ओळखता आणि योग्य उपचार घेतले तर यातून लवकर बरे देखील होता येते. कोणत्याही आजाराला दूर ठेवायचं असेल किंवा आजारपणातून पूर्ण बरे व्हायचे असेल तर तुम्हाला त्या आजाराबद्दल सर्व माहिती असायला हवी. चिकनगुनिया माहिती जाणून घेण्यासाठी चिकनगुनिया लक्षणे मराठीतून (Chikungunya Symptoms In Marathi) आणि चिकनगुनिया वर घरगुती उपाय (Chikungunya Treatment In Marathi) हे जरूर जाणून घ्या.

चिकनगुनिया लक्षणे मराठी (Chikungunya Symptoms In Marathi)

चिकनगुनिया गंभीर आजार असला तरी जर त्याची लक्षणे वेळीच ओळखता आली तर त्यातून पूर्ण आणि लवकर बरे होता येते. संक्रमित डास चावल्यानंतर एक ते दोन दिवसात या आजाराची लक्षणे दिसू लागतात. यासाठीच जाणून घ्या चिकनगुनिया लक्षणे (Chikungunya Symptoms In Marathi)

अचानक ताप येणे (High Fever)

चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला अचानक तीव्र ज्वर म्हणजेच ताप येतो. चिकनगुनियामध्ये एखाद्याला 102 डिग्री सेल्सिअस ते 104 डिग्री सेल्सिअस इतका ताप येऊ शकतो. काहींना या आजारात एक आठवडा तर काहींना त्यापेक्षा जास्त दिवस ताप येतो. त्यामुळे जर तुम्हाला खूप दिवसांपासून ताप येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या. 

ADVERTISEMENT

Fever

सांधे दुखी (Joint Pain)

चिकनगुनियाचे प्रमुख लक्षण (Chikungunya Symptoms In Marathi) आहे सांधेदुखी. या आजारपणात सांधेदुखी इतक्या तीव्र स्वरूपात असते की त्या व्यक्तीला त्याच्या  हात अथवा पायांची हालचाल करणंही शक्य होत नाही. अचानक हात आणि पाय जड होतात आणि चालणे, उठणे, बसणे कठीण होते. चिकनगुनियामधून बरं झाल्यावरही काही महिने अथवा वर्ष, दोन वर्ष सांधेदुखी जाणवू शकते. यासाठी करा सांधेदुखीवर घरगुती उपाय

डोकेदुखी (Headache)

चिकनगुनियामध्ये तापासोबत भयंकर डोकेदुखीचा त्रास जाणवतो. ज्यामुळे रुग्णाला तापासह डोकेदुखीच्या असह्य वेदना सहन कराव्या लागतात. जर ताप आल्यावर तुमचे प्रचंड डोकं दुखत असेल तर हे चिकनगुनिया  झाल्याचे हे एक प्रमुख लक्षण असू शकते. त्यामुळे असं जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय.

स्नायूंमध्ये वेदना जाणवणे (Muscle Pain)

चिकनगुनियामध्ये प्रामुख्याने अंगदुखी आणि शरीरातील प्रत्येक स्नायूंमध्ये असह्य वेदना जाणवतात. अचानक हात अथवा पायाचे स्नायू दुखू लागतात आणि कोणतीही हालचाल करणे कठीण जाते. जर तुम्हाला तापामुळे उठणे, बसणे  अथवा उभे राहण्यास त्रास होत असेल तर ते चिकनगुनिया लक्षण (Chikungunya Symptoms In Marathi) असू शकते. 

ADVERTISEMENT

Muscle Pain

पुरळ (Rash)

चिकनगुनियाचे आणखी एक प्रमुख लक्षण म्हणजे या आजारात शरीरावर कोणत्याही भागावर पुरळ उठू शकते. कधी कधी औषधांचा दुष्परिणाम म्हणून अंगावर पुरळ, चट्टे अथवा लालसरपणा दिसतो. साधारणपणे हे लाल पुरळ अथवा चट्टे हाताचे तळवे, चेहरा आणि मांड्यावर येतात. मात्र असे झाल्यास घाबरू नका कारण हे एक सामान्य चिकनगुनियाचे लक्षण आहे.  काही काळानंतर हे चट्टे आपोआप कमी होतात. जाणून घ्या पुरळ घरगुती उपाय, असे कमी करा अंगावरील रॅशेस.

सांध्यांना सूज येणे (Swelling Around The Joints)

सांधा हा  शरीरातील असा एक भाग असतो ज्याठिकाणी दोन हाडे एकमेकांमध्ये बसवलेली असतात. शरीरात हात, पाय, गुडघा, कोपरा, मनगट, कंबर, हातापायाची बोटे अशा अनेक ठिकाणी सांधे असतात. या सांध्यामुळे हालचाल करणे सोपे होते. मात्र चिकनगुनियामध्ये सांध्यामध्ये सूज येते ज्यामुळे हालचाल करण्यास मर्यादा येतात. 

आर्थ्राटीस (Arthritis)

चिकनगुनियामध्ये निर्माण झालेली सांधेदुखी लवकर बरी झाली नाही तर त्याचे स्वरूप आर्थ्राटीसमध्ये होण्याची शक्यता असते. आर्थ्राटीस हा गंभीर स्वरूपाच्या सांधेदुखीचा आजार आहे. आर्थ्राटीस झाल्यास रुग्णाला सांध्यांच्या दुखण्यामुळे दैनंदिन कामे करणे देखील कठीण होते. त्यामुळे अचानक जाणवणाऱ्या सांधेदुखीचे नेमके कारण शोधा आणि त्यावर योग्य उपचार करा.

ADVERTISEMENT

उलटी आणि मळमळ (Nausea And Vomiting)

चिकनगुनियामध्ये तापासह मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू शकतो. चिकनगुनिया झाल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे डोकेदुखीसह मळमळ आणि उलटी होण्याची शक्यता असते. यासाठीच अशा रुग्णांना सतत पाणी पिण्याचा आणि शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे जर तुम्हाला ताप, डोकेदुखीसह उलटीचा त्रास होत असेल तर ते चिकनगुनियाचे एक लक्षण नक्कीच असू शकते. 

चिकनगुनिया वर घरगुती उपाय (Chikungunya Gharguti Upay)

चिकनगुनिया संक्रमित डास चावल्यामुळे होतो त्यामुळे तो होऊ नये यासाठी घरात डासांचा प्रादुभाव होणार नाही याची काळजी घ्या. घरात स्वच्छता राखा. मात्र असं करूनही चिकनगुनिया झालाच तर याबाबत डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. चिकनगुनियाचे निदान रक्तचाचणीद्वारे करता येते. मात्र चिकनगुनियावर कोणतेही ठराविक वैद्यकीय औषध उपलब्ध नाही. रूग्णाच्या आरोग्य स्थितीनुसार चिकनगुनियावर डॉक्टर वैद्यकीय उपचार करतात. त्यामुळे चिकनगुनियाचे निदान झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही यावर घरीच उपचार करू शकता. 

भरपूर पाणी प्या

चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीच्या शरीरात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होते. यासाठी चिकनगुनिया झालेल्या लोकांनी सतत पाणी प्यायला हवे. शिवाय जलयुक्त पदार्थ आणि ज्युस प्यायला हवेत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होईल. जर चिकनगुनिया झालेल्या लोकांनी कमी पाणी सेवन केले तर त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

drink water

दूधाचे पदार्थ खा

चिकनगुनिया झालेल्या लोकांनी दूध आणि दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात खायला हवेत. कारण दुधाच्या पदार्थांमुळे चिकनगुनिययाच्या तापावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. शिवाय दुधाच्या पदार्थांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. याचा चांगला परिणाम शरीरातील हाडांच्या आरोग्यावर होतो. हाडांची झीज भरून काढण्यासाठी डेअरी प्रॉडक्ट अशा रुग्णांच्या आहारात असायला हवे. 

ओवा आहे उपयोगी

चिकनगुनिया झालेल्या लोकांना ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण ओव्यामध्ये थायमोल नावाचे तेल असते. ओवा एक नैसर्गिक एनेस्थिशियाप्रमाणे काम करतो. चिकनगुनियामध्ये रुग्णाला असह्य वेदना जाणवतात. मात्र जर त्याने ओव्याचे सेवन केले तर काही काळासाठी या वेदना कमी होतात आणि रुग्णाला आराम मिळतो. 

हळदीचे दूध आहे गुणकारी

कोणत्याही आजारपणात हळदीचे दूध हा एक रामबाण उपाय सांगण्यात येतो. कारण हळदीच्या दुधामुळे आतून शरीर निरोगी होते. यासाठीच अंगदुखीतून आराम मिळण्यासाठी अथवा शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी हळदीचे दूध चिकनगुनिया झालेल्या लोकांना पिण्याचा सल्ला दिला जातो.

ADVERTISEMENT

हळदीचे दूध

पपईच्या कोवळ्या पानांचा रस

चिकनगुनियावर ठराविक औषध नसले तरी अनेक नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरू शकतात. चिकनगुनियाच्या तापामुळे शरीरातील रक्तपेशी मोठ्या प्रमाणावर कमी होतात. अशा काळात या रक्तपेशी भरून काढण्यासाठी पपईच्या कोवळ्या पानांचा  रस पिणे फायद्याचे ठरते. यासाठी नियमित पपईच्या पानांचा रस दर दोन तासांनी तीन चमचे प्यावा. 

लसणाचे करा सेवन

अंगदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी लसणासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही. सांध्यावर आलेल्या सूजेवर लसणाचा रस तुम्ही लावू शकता. लसणाची पेस्ट अथवा रस लावण्यामुळे स्नायूंमधील रक्त प्रवाह सुधारल्यामुळे सांध्यांची सूज कमी होते आणि वेदनेतून हळहळू आराम मिळतो.

लसणाचे करा सेवन

ADVERTISEMENT

चिकनगुनियाबाबत मनात असलेले प्रश्न – FAQ’s

1. चिकनगुनियाचे संक्रमण तुमच्या शरीरात किती दिवस असू शकते ?

चिकनगुनिया हा एक संक्रमित डास चावल्याने होणारा आजार असून त्यामुळे आठ ते दहा दिवस रूग्णाला तीव्र ताप येतो आणि असह्य सांधेदुखीचा त्रास होतो. ताप जरी आठवड्यात कमी होत असला तरी रूग्णाच्या आरोग्य स्थितीनुसार अंगदुखी मात्र एक महिना ते वर्षभर जाणवू शकते.

2. चिकनगुनिया पूर्ण बरा होतो का ?

चिकनगुनियाची लक्षणे वेळीच समजली आणि योग्य चिकनगुनिया उपचार (chikungunya treatment in marathi) घेतले तर चिकनगुनिया इनफेक्शनपासून रूग्ण पूर्ण बरे होता येते. मात्र काही रूग्णांना यामुळे काही महिने अथवा वर्षभर सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

3. चिकनगुनिया झाल्यावर काय खाऊ नये ?

चिकनगुनिया झालेल्या लोकांनी घरातील पौष्टिक आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावे. तेलकट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे टाळावे. चिकनगुनिया झाल्यावर चुकूनही बाहेरचे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये.

10 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT