ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
घरच्या घरी करा गोल्ड फेशिअल, फॉलो करा या स्टेप्स

घरच्या घरी करा गोल्ड फेशिअल, फॉलो करा या स्टेप्स

मेकअप केल्यामुळे चेहरा आकर्षक दिसतो. पण  तुम्ही काय चेहऱ्यावर मेकअप करू शकत नाही. यासाठी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो असणं गरजेचं आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर आतून ग्लो असेल तर कमी मेकअपमध्ये तुमचा चेहरा नैसर्गिक दिसू शकतो. नियमित फेशिअल, क्लिन अप केल्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होते. यासाठीच नैसर्गिक ग्लोसाठी महिन्यातून अथवा दोन महिन्यातून एकदा गोल्ड फेशिअल करायला हवे. सध्या कोरोनामुळे पार्लरमध्ये जाण्याची भीतीच मनात निर्माण झाली आहे. अशा काळात तुम्ही  तुमच्या घरातच काही सोप्या स्टेप्स वापरून गोल्ड फेशिअल करू शकता.गोल्ड फेशिअल हा अनेक महिलांमधील लोकप्रिय फेशिअलचा प्रकार आहे. साधारणपणे लग्नकार्य, सणसमारंभासाठी गोल्ड फेशिअल केलं जातं. कारण त्यामुळे चेहऱ्यावर सोनेरी ग्लो येतो असं म्हणतात. गोल्ड फेशिअलमुळे तुमच्या त्वचेचं रक्ताभिसरण सुधारतं, त्वचेचं प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षण होते आणि त्वचेवर छान ग्लो येतो. यासाठीच फॉलो करा गोल्ड फेशिअलच्या या स्टेप बाय स्टेप्स

गोल्ड फेशिअलसाठी फॉलो करा या स्टेप्स

आजकाल बाजारात गोल्ड फेशिअलचे किट मिळतात ते आणून तुम्ही घरीच गोल्ड फेशिअल करू शकता. मात्र जर तुमच्याजवळ गोल्ड फेशिअलचे किट नसेल तरी घरातील नैसर्गिक गोष्टी वापरून तुम्ही घरच्या घरी गोल्ड फेशिअल करू शकता. 

क्लिंझर –

कोणत्याही फेशिअलची पहिली स्टेप असते क्लिझिंग करणे. यासाठी फेशिअल किटमधील क्लिंझरने त्वचा स्वच्छ करा. जर तुमच्याकडे किट नसेल तर तुम्ही दूध अथवा काकडीचा रस यानेही तुमची त्वचा स्वच्छ करू शकता. त्वचेली क्लिंझर लावल्यावर कॉटन पॅड गुलाबपाण्यात भिजवून  त्वचा स्वच्छ करा.

स्क्रबिंग –

त्वचा स्वच्छ केल्यावर त्वचेवर स्क्रब वापरून तुम्ही तुमची त्वचा डीप क्लिन करू शकता. यासाठी किटमध्ये स्क्रबर असते ते वापरा आणि हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. पण जर किट नसेल तर लिंबू, साखर आणि मध एकत्र करून तुम्ही तुमच्या त्वचेला स्क्रब करू शकता. स्क्रब केल्यावर गुलाब पाण्यात कॉटन पॅड बुडवून त्वचा पुसून घ्या.

ADVERTISEMENT

फेस क्रिम –

स्क्रब केल्यामुळे त्वचेतील सर्व धुळ, माती, प्रदूषणाचे कण निघून  जातात. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील पोअर्स मोकळे होतात. यासाठीच त्वचेला योग्य पोषण मिळणं गरजेचं आहे. स्क्रब केल्यावर किटमधील फेशिअल क्रिमने त्वचेला मसाज करा. 

फेसपॅक –

मसाज केल्यावर त्वचेला आराम मिळावा यासाठी फेसपॅक लावा आणि काही मिनिटे शांत पडून राहा. जर तुमच्याकडे यासाठी किट नसेल तर  तुम्ही यासाठी नारळाचे तेल, दही, लिंबाचा रस आणि हळद, मध असे घटक एकत्र करून मिश्रण तयार करू शकता. हा एक उत्तम फेस पॅक आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर गोल्ड फेशिअलप्रमाणे ग्लो निर्माण होतो. पॅक चेहरा आणि मानेवर एकसमान लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने पुसून घ्या. 

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या स्टेप बाय स्टेप टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

फोटोसौजन्य – Pixels

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

फेशिअल आणि क्लिन अपमध्ये नेमका काय आहे फरक

पहिल्यांदाच फेशिअल करणाऱ्यांसाठी खास टिप्स

हायड्रेटिंग फेशिअल करेल तुमची त्वचा परफेक्ट (Hydrating Facial For Skin In Marathi)

14 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT