ADVERTISEMENT
home / सौंदर्य
एकच आयशॅडो पॅलेट वापरा निरनिराळ्या पद्धतीने

एकच आयशॅडो पॅलेट वापरा निरनिराळ्या पद्धतीने

मेकअप ही सध्या काळाची  गरज झाली आहे. त्यामुळे फक्त सणासुदीला अथवा एखाद्या खास फंक्शनलाच नाही तर तुम्ही डेली मेकअप करू शकता. मात्र मेकअपचे प्रॉडक्ट खूपच महाग आणि लवकर खराब होणारे असतात. त्यामुळे तुमच्या जवळ असलेले मेकअपचे साहित्य ते खराब होण्याआधी वापरायला हवं. मात्र होतं काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेकअपचे  साहित्य खरेदी करता आणि वर्षानूवर्ष ते तुमच्या मेकअप किटमध्ये  पडून राहतं. शेवटी एक्सपायरी डेट उलटल्यामुळे तुम्हाला ते चक्क फेकून द्यावं लागतं. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळ असलेलं मेकअपचे साहित्य किती दिवस टिकतं हे माहीत असायला हवं. शिवाय मेकअपमधील काही साहित्याचा वापर तुम्ही इतर गोष्टींसाठीदेखील करू शकता. मेकअपमधील साहित्य तुम्ही जर असं निरनिराळ्या गोष्टींसाठी वापरलं तर त्याचा वापरही होतो आणि ते वायाही जात नाही. यासाठीच  आम्ही तुम्हाला आज आयशॅडो पॅलेटचा निरनिराळ्या पद्धतीने कसा वापर करायचा हे सांगणार आहोत. यासाठी जाणून घ्या एकाच आयशॅडो पॅलेट तुम्हाला आणखी कसं उपयोगी पडू शकतं.

असा करा आयशॅडो पॅलेटचा वापर

आयशॅडो पॅलेट फक्त आय मेकअपसाठी नाही तर आणखी काही गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच वापरू शकता. जाणून घ्या निरनिराळे उपयोग

 

ब्लशसाठी –

आयशॅडो पॅलेटमध्ये विविध प्रकारचे शेड आणि रंग असतात. जर तुमच्या पॅलेटमध्ये पीच अथवा पिंक शेडच्या आयशॅडो असतील तर त्याचा वापर तुम्ही ब्लशसाठी करू शकता. कारण तुम्हाला ब्लशरसाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. या शेडमुळे तुमच्या गालावर छान ग्लो येईल आणि तुमचे आयशॅडो पॅलेट वाया जाणार नाही.

ADVERTISEMENT

हायलायटरसाठी –

ब्लशप्रमाणे मेकअपला ग्लो येतो जेव्हा तुम्ही परफेक्ट हायलायटरचा वापर करता. चीक बोन्स, भुवयांच्या वरील भाग, नाक असे चेहऱ्यावरील उठावदार भाग तुम्ही हायलायटरने हायलाईट करू शकता. यासाठीदेखील तुम्हाला तुमच्या आयशॅडो पॅलेटमधील शिमर लुकचे शेड वापरता येतील. ज्यामुळे तुमचा हायलायटरवरील विनाकारण  होणारा खर्च वाचेल. मेकअपमध्ये हायलायटर लावते चार चाँद, अशी करा निवड

कॉन्टरींगसाठी –

मेकअप परफेक्ट करायचा असेल तर तुम्हाला कान्टरिंगचं कौशल्य हस्तगत करायला हवं. कारम यामुळे तुमच्या चेहऱ्याचा शेप सुधारतो आणि मेकअप परफेक्ट दिसतो. कॉन्टरिंग करण्यासाठी  तुम्ही तुमच्या आयशॅडो पॅलेटमधील ब्राऊन शेडचा वापर करू शकता. तसंच कलरफुल आयलायनर लावताना लक्षात ठेवा या गोष्टी

 

नेलपॉलिशसाठी –

आयशॅडोपेक्षा जास्त वापर तुम्ही नेलपॉलिशचा करत असता. त्यामुळे जर तुमचे आयशॅडो पॅलेट बऱ्याच दिवसांपासून पडून असेल तर त्यातील रंग तुम्ही नेलपॉलिश बनवण्यासाठी वापरा. ज्यामुळे तुमच्या नखांचे सौंदर्य वाढेल. शिवाय बाहेरील केमिकलयुक्त नेलपॉलिशपेक्षा घरी तयार केलेली ही नेलपॉलिश तुमच्या नखांसाठी चांगली असेल. तुमच्या आवडीचे शेड तुम्ही नेलपॉलिश बनवण्यासाठी वापरू शकता. घरच्या घरीच असा तयार करा तुमचा फेव्हरेट नेलपेंट शेड

ADVERTISEMENT

आयलायनरसाठी

सध्या कलरफुल आयलायनरचा जमाना आहे. पण यासाठी  प्रत्येकवेळी तुम्हाला निरनिराळ्या कलरचे आयलायनर खरेदी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमचं  आयशॅडो पॅलेटदेखील आयलायनरप्रमाणे वापरू शकता. यातील मॅट शेड नेहमीसाठी आणि ग्लिटरी शेड तुम्ही एथनिक लुकसाठी वापरू शकता. ज्यामुळे तुम्हाला हवा तेव्हा हवा तसा लुक करता येईल. DIY: आयशॅडोपासून तयार करा कलर आयलायनर, फॉलो करा या स्टेप्स

अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं एकच आयशॅडो पॅलेट निरनिराळ्या पद्धतीने वापरता येईल आणि तुमचा मेकअपवरील खर्च वाचेल.

फोटोसौजन्य – पिक्सेल

 

17 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT