चविष्ट कचोरी कशी बनवायची हे जाणून घ्या (Kachori Recipes In Marathi)

Kachori Recipe In Marathi

कचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरी कचोरी आपण बरेचदा बाहेर बाजारातून आणून खातो. अनेकांना वाटतं की बाजारात जशी कचोरी बनते तशी कचोरी आपल्याला घरी बनवता येणारच नाही. मैद्याची कचोरी असो अथवा शेगाव कचोरी असो, खस्ता कचोरी ही नावं जरी घेतली तरी डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आणि तोंडावर त्याची आपोआपच चव येते. मग अशा कचोरी तुम्ही घरीही तयार करू शकता. कचोरी रेसिपी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मराठीत ही रेसिपी (kachori recipe in marathi) नक्की जाणून घ्या. कचोरी विविध प्रकाराने बनते. त्यामध्ये काय साहित्य वापरतात आणि कशा प्रकारे घरी बनवावी याची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही घरच्या घरी कचोरी रेसिपी नक्की ट्राय करा. 

Table of Contents

  शेगाव कचोरी रेसिपी मराठी (Shegaon Kachori Recipe In Marathi)

  Shegaon Kachori Recipe In Marathi

  शेगाव कचोरी (Shegaon Kachori Recipe In Marathi) ही सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. ही घरी बनवता येईल असं कोणालाही वाटत नाही. तसंच यामध्ये खास स्टफिंग असते. त्यामुळे हे कसे तयार करायचे जाणून घेऊया. 

  साहित्य 

  • 1 कप मैदा
  • 1 कप तेल
  • 1/2 कप बेसन
  • 1/2 टेबलस्पून लाल तिखट
  • 1/4 चमचा हळद
  • ½ चमचा आमचूर पावडर
  • 1 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा कसूरी मेथी
  • 1 चमचा मोहरी
  • 2 चमचा जिरे
  • 2-3 हिरव्या मिरच्या
  • 7-8 लसूण पाकळ्या
  • 1 इंच आल्याचा तुकडा
  • तळण्यासाठी तेल
  • 1 चमचा धने
  • 1 चमचा बडीशेप
  • चवीप्रमाणे मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी

  कृतीः 

  • सर्वात प्रथम एका बाऊल मध्ये मैदा घ्या आणि त्यात तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. पिठाचा जर मुटका बनत असेल तर समजायचं की आपण जेवढं तेल घातलं ते पिठाला पुरेसे आहे.आता मैद्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्या. हा तयार गोळा 15-20 मिनिट बाजूला झाकून ठेवा म्हणजे तो छान मऊ बनेल. मैदा तिंबू द्या 
  • पिठाचा गोळा मऊ होईपर्यंत आपण कचोरीचे स्टफिंग बनवून घ्या.
  • तुम्ही एक पॅन घ्या. त्यामध्ये धण्याचे दाणे, जिरे आणि बडीशेप घाला आणि हे तिन्ही व्यवस्थित भाजून घ्या. धने,जिरे आणि बडीशेप व्यवस्थित भाजून झाल्यावर एक छानसा सुगंध येतो. त्यानंतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची जाडसर पूड बनवून घ्या. 
  • आता पूड प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्याच भांड्यात हिरवी मिरचीचे तुकडे, लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या
  • आता पॅनमध्ये तुमच्या अंदाजानुसार तेल तुम्ही घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी  आणि जिरे घाला आणि व्यवस्थित तडतडू द्या. जिरे,मोहरी छान तडतडले की त्यात आले ,लसूण, मिरचीची पेस्ट घाला आणि छान तेलामध्ये परतून घ्या. याचा मस्त घमघमाट सुटतो. पेस्ट छान परतून झाली की त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कसूरी मेथी हातावर चुरडून घाला आणि सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्या.
  • मसाले छान परतून झाले की त्यात बेसन घाला आणि बेसन छान भाजेपर्यंत त्याला कमी गॅसवर परतत रहा. बेसनाचा छान सुगंध यायला लागला की समजायचं की आपल बेसन छान भाजले आहे. आता त्यावर थोडा थोडा पाण्याचा हबका मारा. बेसन छान ओले होईल एवढं पाणी घाला आणि परता 
  • आता चवीप्रमाणे मीठ घाला आणि बेसन 2-3 मिनिट्स झाकून ठेऊन कमी गॅसवर शिजवून घ्या. आपले कचोरीचे स्टफिंग तयार आहे. स्टफिंग थंड व्हायला ठेवा.
  • आता पिठाची कणीक घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवा. हाताने तुम्ही या पिठाचा पुरीचा आकार बनवा.  ही पुरी मध्ये जाड असायला हवी आणि त्याचे काठ पातळ असायला हवेत. आता त्यात तयार स्टफिंग घाला आणि स्टफिंग व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्या आणि कडा एकत्र करून वरचा जो पिठाचा भाग येतो तो तिथेच दाबून त्याला गोल गोल फिरवून घ्या.
  • आता पोळपाट वर ठेवून हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्या आणि अशाप्रकारे सर्व कचोरी तयार करून घ्या. आता कढईमध्ये तेल आला आणि ते गरम होऊ द्या..तेल गरम झाल्यावर त्यात कचोरी घालून मध्यम आचेवर कचोरी तळून घ्या. गरमागरम शेगाव कचोरी तयार आहे. तुम्ही हिरवी चटणी अथवा सॉससह खायला सर्व्ह करा.

  मूग डाळ कचोरी मराठीत रेसिपी (Moong Dal Kachori Recipe In Marathi)

  Moong Dal Kachori Recipe In Marathi

  मूगडाळ कचोरी ही आपण नेहमी बाजारातून लहान कचोरी आणून खातो त्यालाच मूगडाळ कचोरी (Moong Dal Kachori Recipe In Marathi) पण म्हणतात. गोड आणि तिखट अशा चवीची ही कचोरी अनेक दुकानांमध्ये मिळते. पण प्रत्येक ठिकाणी याची चव वेगळी असते. कचोरी ही सहसा मैद्याची बनविली जाते. मैद्याने अनेक रेसिपी तयार होत असतात याची नक्की रेसिपी काय आहे ते जाणून घेऊया. 

  साहित्य सारणासाठी 

  • (सारण) अर्धा कप मूग डाळ
  • अर्धा चमचा तूप
  • पाव चमचा हळद
  • अर्धा चमचा लालतिखट
  • अर्धा चमचा जिरेपूड
  • अर्धा चमचा सुंठ पावडर
  • 1 चमचा धणेपूड
  • 1 चमचा बडीशेप पूड
  • 1 चमचाआमचूर पावडर
  • मीठ चवीनुसार

  साहित्य आवरणासाठी 

  • दोन कप मैदा
  • अर्धा  कप पाणी
  • तूप किंवा तेल
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी

  कृतीः 

  • आधी एका वाडग्यात मैदा घेऊन त्यात तूप आणि चवीनुसार मीठ घाला.
  • पीठ मळून घ्यावे. त्यानंतर, थोडे पाणी मिसळून पुन्हा पीठ मळून घ्यावे.
  • कचोरीची कणीक ही अगदी घट्ट किंवा अगदी मऊ मळता कामा नये. आता हे पीठ ओलसर कापडाखाली झाकून ठेवावे.
   त्यानंतर, कचोरी आतील सारणाची तयारी करण्यास घ्यावी. दोन तास भिजवलेली मूगडाळ मिक्सरमध्ये हलकीशी बारीक करावी.
  • गरम पॅनमध्ये तूप घाला. तूप तापले की त्यात हळद, लाल तिखट पावडर, जिऱ्याची पूड, धणेपूड, बडीशेप पूड, आमचूर पावडर घालून सर्व एकत्र करा आणि व्यवस्थित परतून घ्या. 
  • त्यानंतर, त्यामध्ये वाटलेली मूग डाळ, मीठ आणि थोडे हिंग घालून पुन्हा एकदा मंद आचेवर परतून घ्या
  • तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचे लहान गोळे करा आणि ओलसर कपड्याखाली झाकून ठेवलेल्या मिश्रणाची हाताने लहान पुरी तयार करुन घ्या. या पुरीमध्ये तुम्ही सारण भरा. आवरण नीट बंद करा आणि अगदी हलक्या हाताने दाबून ते ठेवा
  • अशारितीने तयार केलेली कचोरीची पारी गरमागरम तेलात खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या.  
  • तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणी अथवा सॉससह कचोरी सर्व्ह कराव्या.

  मटार कचोरी रेसिपी मराठीत (Matar Kachori Recipe In Marathi)

  Matar Kachori Recipe In Marathi

  मटार कचोरी तुम्ही घरी बनवू शकता. ही कचोरी कडक नसते तर गरमागरम घरी लुसलुशीत खायला मजा येते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात मटार कचोरी (Matar Kachori Recipe In Marathi) चा स्वाद अप्रतिम लागतो. 

  पारी करिता साहित्य

  • 1 वाटी मैदा
  • 1/2 वाटी कणिक
  • 3 चमचा तूप
  • चिमूटभर मीठ

  सारणाकरिता साहित्य

  • 1 वाटी हिरवे मटार
  • 5-6 हिरव्या मिरच्या
  • 1/4 वाटी कोथिंबीर चिरलेली 
  • 6 लसणाच्या पाकळ्या
  • 1/2 इंच आलं
  • 1/2 चमचा जिरे
  • चवीनुसार मीठ
  • तळण्याकरता तेल

  कृतीः

  • पहिल्यांदा एका परातीमध्ये मैदा, कणीक घेऊन त्यात तूप चांगले मिक्स करून घ्या. त्यामुळे कचोरी छान खुसखुशीत होईल.आता त्यात थोडं मीठ तसेच पाणी घालून त्याचा छान घट्टसर गोळा तयार करा आणि 15 मिनिट्स झाकून ठेवून द्या
  • हे केल्यानंतर हिरव्या मिरच्या, लसूणाच्या पाकळ्या, आले आणि कोथिंबीर हे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे वाटून झाल्यावर हिरवे मटार पण मिक्सरमधून थोडी भरड पेस्ट होईल असे फिरवून घ्या.
  • आता एका कढईत तीन चमचे तेल घाला. तेल गरम झाले की, त्यात आधी जिरे नंतर मिरचीचे वाटण घालून दोन ते तीन मिनिटांपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. आता त्यात बारीक केलेले मटार घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या.
  • तयार सारण एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवून द्या. आता मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करा. तयार वाटीत थोडे सारण भरून ती वाटी बंद करून घ्या. आता पोळपाटावर हलक्या हाताने त्याची कचोरी लाटून घ्या
  • अशाप्रकारे सगळ्या कचोर्‍या तयार करा. तयार कचोऱ्या मध्यम आचेवर गरम गरम तेलातून तळून घ्या. गरमागरम कचोरी सॉसबरोबर खायला घ्या

  उपवासाची कचोरी रेसिपी (Upvasachi Kachori Recipe In Marathi)

  Upvasachi Kachori Recipe In Marathi

  उपवासाला नेहमीच्या पदार्थांपेक्षा काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही उपवास कचोरी (upvasachi kachori recipe in marathi) हा पर्याय निवडू शकता. उपवासासाठी अनेक रेसिपी बनवल्या जातात ही बनवायला सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते. 

  साहित्य 

  • 125 ग्रॅम भगर अर्थात वरी
  • 125 ग्रॅम किसलेले ओले खोबरे 
  • 1 उकडलेला बटाटा
  • 3-4 हिरवी मिरची
  • चवीनुसार मीठ
  • शेंगदाण्याचे कूट
  • तळण्यासाठी तेल
  • जिरे
  • तूप

  कृतीः

  • पहिल्यांदा वरी मिक्सरमधून वाटून बारीक करून घ्या
  • नंतर ओले खोबरे आणि मिरच्या एकत्र वाटून त्याचे मिक्स्चर करून घ्या 
  • आता बारीक करून घेतलेली भगर आणि उकडलेला बटाटा मिक्स करून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून मध्यम पीठ मळून घ्या.
  • या पिठाचा गोळा करून त्यात खोबरं आणि मिरचीचे केलेले सारण भरा आणि मग तो गोळा बंद करा 
  • ही कचोरी तेलात तळा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी अथवा चिंचेच्या चटणीसह खायला द्या 

  खस्ता कचोरी रेसिपी (Khasta Kachori Recipe In Marathi)

  Khasta Kachori Recipe In Marathi

  सकाळच्या नाश्त्याला बऱ्याचदा काय करायचं हा प्रश्न पडतो. उत्तर प्रदेश, दिल्ली या ठिकाणी प्रसिद्ध असणारा नाश्ता म्हणजे खस्ता कचोरी. आपल्याकडेही संध्याकाळच्या वेळात हा नाश्ता केला जातो. मग संध्याकाळी खाण्यासाठी खास काही करायचा विचार असेल तर नक्की करा खस्ता कचोरी. खस्ता कचोरी रेसिपी मराठीत (Khasta Kachori Recipe In Marathi). 

  साहित्य 

  • 2 कप मैदा
  • 1 चमचा रवा
  • 1 चमचा तेल मोहनासाठी
  • मीठ चवीनुसार
  • 1 चमचा ओवा

  सारणासाठी

  • 1 वाटी मूग डाळ
  • मीठ चवीनुसार
  • 2 चमचे काश्मिरी मिरची पावडर
  • 1 चमचा बडीशेप
  • 1 चमचा जिरे

  कृतीः

  • मैदा,रवा, मीठ, ओवा आणि तेल एकत्र करून घ्या. ते एकत्र लूप होईल असे मिक्स करा आणि मग पाणी घालून पीठ मळून घ्या आणि मग पीठ झाकून ठेवा
  • मूग डाळ किमान 2 तास भिजवून ठेवा. (रात्रभर भिजत घातली तर उत्तम) आता डाळ उपसून घ्या. त्यातील पाणी काढून टाका
  • पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात जिऱ्याची फोडणी करा आता त्यात हळद, लाल मिरची पूड टाका.जळू द्यायचे नाही आता त्यात बडीशेप घालून खमंग वास येईपर्यंत परता
  • आता त्यात मूग डाळ टाका. शिजेल इतके पाणी टाकून ती शिजून द्या
  • सारण कोरडे होऊ लागले की मीठ टाका. सारण कोरडे करून घ्या.
  • पिठाची पारी लाटून घ्या. त्यात सारण भरा आणि मग पोळपाटावर लाटा 
  • तेल एकदम कडकडीत गरम करून घ्या. आता तळताना आच कमी करून कचोऱ्या तळून घ्या. गरमागरम कचोरी घ्या. मधून फोडा. त्यात गोड आणि हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी घाला. वरून डाळिंबाचे दाणे, शेव, दही घालून मस्तपैकी सर्व्ह करा. तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही बटाट्याच्या रस्सा भाजीसह सर्व्ह करा

  ड्राय कचोरी रेसिपी (Dry Kachori Recipe In Marathi)

  Dry Kachori Recipe In Marathi

  बाजारात मिळणाऱ्या ड्राय अर्थात लहान आकाराच्या सुक्या कचोरी सर्वांनाच आवडतात. येता जाता तुम्हाला जर काही खायची सवय असेल तर ही कचोरी नक्कीच सर्वांना आवडते. याची रेसिपी जाणून घेऊया. 

  साहित्य 

  • 2 कप मैदा
  • 1 लहान चमचा ओवा
  • 2 मोठे चमचे तेल
  • मीठ स्वादानुसार

  सारणासाठी

  • 1 मोठा चमचा बडिशेप
  • 2 मोठे चमचे धने पावडर
  • 1/2 कप तिखट शेव भुजिया
  • 1 सुकी लाल मिरची
  • 2-3 काली मिरी पावडर
  • 1 छोटा चमचा सफेद तीळ
  • 1 छोटा चमचा चिंचेचा कोळ
  • 200 ग्रॅम तेल तळण्यासाठी 

  कृतीः 

  • सर्वात पहिले एका भांड्यात मैद्या घ्या. त्यात तेल, ओवा आणि मीठ घालून व्यवस्थित भिजवा आणि झाकून ठेऊन द्या
  • त्यानंतर सारणासाठी सर्व साहित्य एकत्र करा. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घाला आणि वाटून घ्या. सारण तयार आहे. त्यामध्ये एक चमचा चिंचेचा कोळ मिक्स करा. याचे लहान लहान गोळे करून घ्या
  • आता मैद्याचे गोळे बनवा आणि त्याच्या लहान गोल आकाराच्या लाट्या करा. त्यात वरील सारण भरा आणि व्यवस्थित बंद करा. बॉलच्या आकाराप्रमाणे हे गोळे तयार करा 
  • तेल गरम करून त्यात या कचोरी तळा. नंतर तुम्ही सॉस अथवा चटणीसह या कुरकुरीत कचोरी खाऊ शकता. या आठवडाभर टिकतात. त्यामुळे येताजाता तुम्ही कधीही खाऊ शकता

  कांदा कचोरी रेसिपी मराठीत (Kanda Kachori Recipe In Marathi)

  Kanda Kachori Recipe In Marathi

  सहसा राजस्थानमध्ये तयार होणारी ही कचोरी बाजारातूनच आणली जाते. पण तुम्हाला घरी बनवायची इच्छा असेल तुम्ही नक्कीच आम्ही दिलेली रेसिपी ट्राय करू शकता. 

  साहित्य 

  • 150 ग्रॅम मैदा
  • 1 चमचा जिरे
  • 3 चमचा गरम तेल
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी

  सारणासाठी 

  • 1 चमचा बडिशेप
  • 1 चमचा धने
  • 1 चमचा काळी मिरी
  • 1 चमचा हिंग
  • 6 ते 7 लसूण पाकळया
  • 2 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा मिरची पावडर
  • 1 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा धने पावडर
  • 2 बटाटे उकडलेले
  • 2 कांदे बारीक चिरलेले
  • 2 हिरवी मिरची तुकडे केलेले
  • 1 चमचा चिरलेली कोथिंबीर
  • तेल आवश्यकतेनुसार

  कृतीः 

  • पहिल्यांदा आपण एक भांडे घेऊन त्या मध्ये मैदा घालून घेणे व नंतर त्यामध्ये जिरे आणि थोडे तेल घालून मिक्स करणे. त्यात मग मीठ, पाणी घालून ते एकत्र मळून घेणे आणि 30 मिनिट्स ते झाकून ठेवणे.
  • त्यानंतर आपण एक पॅन घेऊन त्यामध्ये हिंग, बडिशेप आणि कुटलेले धने हे घालून ते एकत्र करुन घेणे. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि ठेचलेली लसूण घालून परतणे. त्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि वरून मीठ घालून ते मिश्रण एकत्र करुन घेणे.
  • हे करून झाल्यावर त्यात उकडलेले बटाटे मॅश करून ते घालणे आणि ते एकत्र करुन घेणे. थोडे शिजवून घेणे आणि नंतर थंड करत ठेवणे.
  • आपण मळलेले पीठ घ्या आणि त्याचे गोळे करा. एक गोळा घेऊन वाटी सारखा आकार देऊन त्यामध्ये तयार सारण भरुन घेणे. लाटून घेणे.
  • नंतर एक कढई घेऊन त्या मध्ये तेल तापत ठेवणे आणि कचोरी तळून घेणे. अशा प्रकारे कांदा कचोरी तयार आहे.

  दही कचोरी रेसिपी (Dahi Kachori Recipe In Marathi)

  Dahi Kachori Recipe In Marathi

  दही कचोरीमध्ये काही वेगळं नसतं. खस्ता कचोरीचा वापर करून त्यात दह्याचा जास्त वापर करण्यात येतो. तसंच यामध्ये चटणीचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. 

  साहित्य 

  • 2 कप मैदा
  • 1 चमचा रवा
  • 1 चमचा तेल मोहनासाठी
  • मीठ चवीनुसार
  • 1 चमचा ओवा

  सारणासाठी

  • 1 वाटी मूग डाळ
  • मीठ चवीनुसार
  • 2 चमचे काश्मिरी मिरची पावडर
  • 1 चमचा बडीशेप
  • 1 चमचा जिरे

  कृतीः

  • मैदा,रवा, मीठ, ओवा आणि तेल एकत्र करून घ्या. ते एकत्र लूप होईल असे मिक्स करा आणि मग पाणी घालून पीठ मळून घ्या आणि मग पीठ झाकून ठेवा
  • मूग डाळ किमान 2 तास भिजवून ठेवा. (रात्रभर भिजत घातली तर उत्तम) आता डाळ उपसून घ्या. त्यातील पाणी काढून टाका
  • पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात जिऱ्याची फोडणी करा आता त्यात हळद, लाल मिरची पूड टाका.जळू द्यायचे नाही आता त्यात बडीशेप घालून खमंग वास येईपर्यंत परता
  • आता त्यात मूग डाळ टाका. शिजेल इतके पाणी टाकून ती शिजून द्या
  • सारण कोरडे होऊ लागले की मीठ टाका. सारण कोरडे करून घ्या.
  • पिठाची पारी लाटून घ्या. त्यात सारण भरा आणि मग पोळपाटावर लाटा 
  • तेल एकदम कडकडीत गरम करून घ्या. आता तळताना आच कमी करून कचोऱ्या तळून घ्या. गरमागरम कचोरी घ्या. मधून फोडा. त्यात गोड आणि हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी घाला. वरून डाळिंबाचे दाणे, शेव, दही घालून मस्तपैकी सर्व्ह करा. दही जास्त प्रमाणात घाला. तसंच यावर चाट मसाला आणि चिरलेली कोथिंबीरदेखील वरून घाला. याची चव अधिक चांगली लागते. 

  गोड कचोरी रेसिपी (Sweet Kachori Recipe In Marathi)

  Sweet Kachori Recipe In Marathi

  सहसा गोड कचोरी ही उपवासासाठी बनविण्यात येते. याचे आवरण हे बटाट्यापासून तयार करण्यात येत आणि आतमध्ये ओल्या खोबऱ्याचे सारण असते. पाहूया रेसिपी 

  साहित्य सारणासाठी 

  • 1 कप ताजा खवलेला नारळ
  • अर्धा कप साखर किंवा चवीनुसार
  • 2 चमचे काजू तुकडा
  • 2 चमचे बेदाणे, बदाम 
  • पाव चमचा जिरे 
  • चवीनुसार मीठ 
  • 1 हिरवी मिरची बारीक चिरून 

  आवरणासाठी साहित्य 

  • 3 मध्यम बटाटे, उकडून सोललेले
  • 5-6 चमचे शिंगाडा पीठ
  • चिमूटभर मिठ
  • तूप कचोऱ्या तळण्यासाठी

  कृतीः 

  • बटाटा कुस्करून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नये. मीठ घालावे. मध्यम घट्ट गोळा होईल इतपत शिंगाडा पीठ घालावे. पीठ मळताना लागल्यास थोडेसे तूप घ्यावे. झाकून ठेवावे.
  • नारळ, साखर, काजू, बेदाणे, जिरे, चिमूटभर मिठ आणि बारीक चिरलेली मिरची असे सर्व मिक्स करावे.
  • मळलेल्या बटाटा-शिंगाडा पीठाचे गोळे करावे. लहान प्लास्टिकचा जाड पेपर घेउन त्याला तुपाचा हात लावावा.
  • तळव्यांनाही तूप लावावे. एक लहान गोळा घेऊन प्लास्टिकवर थापावा किंवा लाटण्याने अलगद लाटावा. लाटलेली पारी हातात घ्यावी. त्यात चमचाभर सारण घालावे. पारीच्या कडा एकत्र करून कचोरी तयार करावी. अशाप्रकारे कचोऱ्या तयार कराव्यात.
  • मध्यम आचेवर तुपात तळून घ्याव्यात. तयार कचोऱ्या गरम सर्व्ह कराव्यात. यांबरोबर गोड दही किंवा साखर घातलेले दही सर्व्ह करावे

  मसाला कचोरी (Masala Kachori Recipe In Marathi)

  Masala Kachori Recipe In Marathi

  मसाला कचोरीसाठी तुम्हाला बटाटा आणि गरम मसाला असणे आवश्यक आहे. तुम्ही घरच्या घरी ही चविष्ट कचोरी तयार करू शकता. 

  साहित्य पारीसाठी

  • 1 कप मैदा
  • 2 चमचा तेल
  • 1 चमचा मीठ

  बटाट्याच्या सारणासाठी

  • 5 उकडलेले बटाटे
  • 1 चमचा मिरचीची चटणी
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 चमचा आमचूर पावडर
  • 1 चमचा धनेपूड
  • 1 चमचा तिखट
  • 1/2 चमचा हळद
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा पिठीसाखर
  • 1 चमचा पुदिना
  • 1 चमचा कोथिंबीर
  • चवीपुरते मीठ

  कृतीः 

  • सर्वप्रथम मैद्यामध्ये तेलाचे मोहन व मीठ घालून घट्ट भिजवून घ्या व 15 मिनिट झाकून ठेवा.
  • सारणासाठी एका कढईत तेल गरम करा त्यात जिर, धने, सोप घाला मग त्यात मिरची, आले लसूण पेस्ट घाला.
  • त्यानंतर त्यात बटाटे घालून थोडे मिक्स करा मग सर्व मसाले व पुदिना, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता एका मैद्याचा लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन गोलाकारात पोळी लाटून घ्या. त्यानंतर मध्ये सारण भरून बंद करा आणि मध्यम आचेवर तळून घ्या. सॉस अथवा चटणीसह सर्व्ह करा.

  डाळ कचोरी रेसिपी मराठीत (Dal Kachori Recipe In Marathi)

  Dal Kachori Recipe In Marathi

  वेगवेगळ्या डाळीच्या कचोरी आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत. मूगडाळ कचोरी, तूरडाळ कचोरी, डाळ कचोरीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची डाळ वापरून करू शकता. शक्यतो कचोरीमध्ये मूगडाळीचाच वापर केला जातो. 

  साहित्य 

  • 200 ग्रॅम मैदा
  • 250 ग्रॅम तेल
  • 1 चमचा मीठ
  • 1 चमचा ओवा, जिरे पूड
  • 1 उकडलेला बटाटा
  • 1 कांदा चिरलेला
  • 1 टॉमेटो
  • 1 चमचा कोथींबीर
  • 20 ग्रॅम भिजवून शिजवलेले हरभरे
  • 20 ग्रॅम भिजून उकडलेले मूग
  • 100 ग्रॅम गोड दही
  • 50 ग्रॅम चिंचेची चटणी
  • 50 ग्रॅम शेव
  • 2 चमचा धने - जिरे पावडर
  • 1 चमचा चाट मसाला, लाल तिखट. मीठ
  • 100 ग्रॅम मूग डाळ भिजवलेली

  कृती 

  • प्रथम सर्व सामान एकत्र काढून घ्या. नंतर भिजवलेली मुगाची डाळ जाडसर वाटून घ्या आणि एका कढईत फोडणी करून त्यात सर्व मसाले टाका व थोडे डाळीचे पीठ परतून त्यात वाटलेली डाळ वाफवून घ्या
  • नंतर एका परातीत मैदा घ्या आणि त्यात ओवा, जिरे पावडर, मीठ आणि तेलाचे मोहन टाकून गोळा भिजवून घ्या. या गोळ्याच्या छोटया लाट्या करून त्यात डाळीचे सारण भरून लाटून घ्या आणि या कचोरी तेलात तळा
  • नंतर ती एका प्लेटमधे काढून ती वरच्या बाजूने फोडून त्यात कांदा, उकडलेला बटाटा, चिरलेला टॉमेटो बीट आणि मूग, हरभरा भिजवून मग परतून टाका.  तसेच त्यावर दही,, चिंचेची चटणी, बारीक शेव आणि कोथींबीर घाला. वरून चाट मसाला तसेच धने, जिरे पावडर, लाल तिखट टाकून खायला द्या

  खमंग कचोरी रेसिपी (Khamang Kachori Recipe In Marathi)

  Khamang Kachori Recipe In Marathi

  नावातच याचा स्वाद भरलेला आहे. खुसखुशीत आणि खमंग असणारी ही कचोरी आपल्या सर्वांनाच आवडते. याची रेसिपी जाणून घेऊया. 

  साहित्य 

  • एकवाटी मूग डाळ भिजलेली
  • 4 मिरी
  • 1 चमचा बडीशेप
  • 1/2 चमचा धने
  • 1 चमचा सुंठ पावडर
  • चवीनुसार मीठ
  • 1 चमचा तिखट
  • 1/4 चमचा हळद,मोहरी
  • चिमूटभर हिंग
  • 1 चमचा तेल फोडणीसाठी
  • 1 चमचा लिंबू रस
  • 1/4 चमचा गरम मसाला
  • थोडी कोथंबीर
  • दीड वाटी मैदा
  • चिमूटभर मीठ
  • 4 चमचे तूप
  • तळण्यासाठी तेल

  कृतीः 

  • पहिल्यांदा मीठ व तूप एकत्र करून पीठ भिजवून घ्यावे. मग डाळ सरबरीत वाटावी आणि धने, बडीशेप आणि मिरी हलकेच भाजून त्यात सुंठ पावडर,तिखट मीठ घालून बारीक करावे
  • एका कढईत तेल घेऊन फोडणी करून हिंग,मोहरी, मूगडाळ वाटण नंतर बडीशेप वाटण, हळद, मसाला, लिंबूरस घालून पाण्याचा हबका मारत मोकळं शिजवून त्यात कोथिंबीर मिक्स करावी
  • मग पिठाचे सम आकाराचे गोळे करून ते पुरी सारखे लाटावे आणि त्यात सारण भरून हाताने दाबून मध्यम आचेवर तळावे. खायला द्यावे. आवडत असल्यास तिखट गोड चटणी व दही शेव घालून खाता येते

  तूरडाळ कचोरी मराठीत रेसिपी (Turdal Kachori Recipe In Marathi)

  Turdal Kachori Recipe In Marathi

  तूरडाळीच्या कचोरीची चव ही वेगळीच लागते. त्यासाठी नक्की काय वापरावे लागते जाणून घेऊया. 

  साहित्य

  • 1 वाटी तुरीचे ओले दाणे सारण करण्यासाठी
  • दीड वाटी पातीचा कांदा चिरून
  • 1 कांदा बारीक चिरून
  • 7-8 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 चमचा तिखट किंवा चवीप्रमाणे
  • 1 चमचा हळद
  • 1 चमचा धने पावडर
  • 1/2 चमचा मसाला
  • चवीनुसार मीठ
  • 1 लिंबाचा रस
  • 1 चमचा साखर
  • 1 चमचा जीरे
  • 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  • 1/2 वाटी खोबऱ्याचा किस
  • 2 चमचा तेल
  • 2 वाटी मैदा
  • 2 चमचा तेल मोहन करिता
  • 1/4 चमचा मीठ
  • तळण्यासाठी तेल

  कृतीः 

  • तुरीचे दाणे निवडून धुवून 4-5 मिनट उकळून घ्यावे. कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
  • कचोरीचे आवरण तयार करण्यासाठी, मैदा चाळून घ्यावा. यामध्ये तेलाचं मोहन घालून तसंच मीठ टाकून हाताने चांगले मिक्स करा. नंतर पाण्याने भिजवुन घ्यावे. 15 मिनिट बाजूला झाकून ठेवावे.
  • तोपर्यंत कचोरीचे सारण तयार करून घ्या. उकळून घेतलेले दाणे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. आता गॅस सुरू करून त्यावर एका कढईत तेल टाकून नंतर त्यात जिरे, मिरची, पांढरा कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परतावे. आता त्यात पातीचा कांदा टाकून एकत्र करावे. तिखट, हळद, धणे पूड, मसाला, मीठ, आले लसूण पेस्ट टाकावी. एकत्र करून घ्या. त्यामध्ये तुम्ही बारीक केलेले तुरीचे दाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.
  • नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व खोबऱ्याचा किस घाला. आणि मिक्स करून घ्यावे. कचोरीचे सारण तयार आहे. आता झाकून ठेवलेला मैद्याचा गोळा चांगला मळून घ्यावा. त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे. तसेच सारणाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावेत.
  • मैद्याची पोळी लाटून त्यात कचोरी सारणाचा गोळा भरून, त्याचा मोदकासारखा गोळा तयार करून, हातानेच दाबून कचोरी तयार करावी. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या तयार करून घ्याव्यात. गॅस सुरू करा आणि त्यावर तुमची नेहमीची कढई घेऊन त्यात तेल टाकून गरम करावे. त्यात कचोऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्या.
  • कचोरी सोबत खाण्यास हिरव्या मिरच्या तळून घ्याव्यात. आता मस्तपैकी गरमागरम कचोरी दह्यासोबत किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सर्व्ह करा.

  तुम्हीही आम्ही दिलेल्या रेसिपी वापरून घरच्या घरी कचोरी नक्की करू शकता. तुम्हाला आम्ही दिलेल्या रेसिपी कशा वाटल्या नक्की आम्हाला सांगा.