ADVERTISEMENT
home / Recipes
Paneer Recipes In Marathi

पनीरपासून बनवा चटपटीत पदार्थ, पनीर रेसिपी मराठीमध्ये (Paneer Recipes In Marathi)

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आवडणारा भाजीतील पदार्थ म्हणजे पनीर. नासलेल्या दुधापासून बनविण्यात येणारा हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. पनीरचे अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये भाजीचे प्रकार अधिक असतात. चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो. अगदी स्टार्टरपासून ते भाजीपर्यंत अनेक पदार्थ पनीरपासून बनवता येतात. स्वादासह आरोग्यासाठीही पनीर फायदेशीर ठरते चटकदार, चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या अशा या पनीर रेसिपी मराठीमध्ये (Paneer Recipes in Marathi) आपण आज या लेखातून पाहू. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मटार पनीर, शाही पनीर, पनीर बुरजी असे अनेक भाज्यांचे प्रकार आपण खातो. पण हे पदार्थ आपण घरीही अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. त्यासाठी मटर पनीर रेसिपी मराठीमध्ये, शाही पनीर रेसिपी मराठीमध्ये आपण बरेचदा वाचली असेल तर आता ती करूनही पाहा. 

पालक पनीर रेसिपी (Palak Paneer Recipe In Marathi)

Palak Paneer Recipe In Marathi

Palak Paneer Recipe In Marathi

बऱ्याच मुलांना नुसती पालकाची भाजी खायला कंटाळा येतो. मग अशावेळी पालक पनीर ही चविष्ट आणि चमचमीत भाजी त्यांना तुम्ही घरच्या घरी करून देऊ शकता. पनीरचा शोध कसा लागला माहीत आहे का? पनीरच्या अनेक भाजी बनविता येतात. पालक पनीर बनविण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो आणि ही भाजी चवीलाही अत्यंत चमचमीत लागते. जाणून घेऊया याची रेसिपी. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • साधारण 1 ते 2 जुडी पालक
  • 1 बारकी चिरलेला कांदा
  • 1 बारकी चिरलेला टोमॅटो
  • 8-10 लसूण पाकळ्या (ठेचून घ्या)
  • 1 इंच आलं
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा कांदा लसूण मसाला
  • 1 चमचा लाल तिखट
  • चवीनुसार मीठ 
  • गरजेनुसार पाणी
  • 2 चमचे तेल
  • 100 ग्रॅम पनीर (आवडीनुसार अधिक घेतले तरी चालेल. त्याचे चौकोनी तुकडे करा)
  • अर्धा चमचा जिरे

कृतीः

  • पहिल्यांदा पालकाची पाने धुवा आणि  चिरून पाण्यात उकळून शिजवून घ्या. चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्याव्या. पनीरचे चौकोनी तुकडे करा
  • उकडलेला पालक थंड झाल्यावर त्यातले पाणी काढून टाका. पालक मिक्सरमध्ये बारीक करून त्याची जाडसर पेस्ट करून घ्या. पालक ज्यामध्ये उकळला ते पाणी तसेच ठेवावे आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, आलं, पाच ते सहा पाकळ्या लसूण, खोबरं हे सर्व पाणी घालून बारीक वाटून घ्यावे
  • एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यामध्ये जिरे आणि बारीक ठेचलेली लसूण आणि चिरलेला कांदा परतून घ्या.
  • वाटलेला मसाला त्यात घालून परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला (हा मसाला नको असेल तर गरम मसाला घाला) घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे.
  • पालकाची प्युरी त्यामध्ये घालावी. पालकाचे उकळलेले पाणी जे बाजूला ठेवले असेल ते त्यामध्ये घालावे. चवीनुसार मीठ घालून उकळू द्यावे. उकळत असताना त्यात पनीरचे तुकडे घाला आणि चांगले शिजू द्यावे. गरमागरम पालक पनीर सर्व्ह करावा. 

मटर पनीर रेसिपी मराठीत (Matar Paneer Recipe In Marathi)

Matar Paneer Recipe In Marathi

Matar Paneer Recipe In Marathi

ADVERTISEMENT

काही जणांना नुसत्या वाटाण्याची अर्थात हिरव्या मटरची भाजी खायला आवडत नाही. पण तीच भाजी पनीर घालून जरा पंजाबी मसाल्यांसह बनवली की, त्या भाजीला वेगळी चवही येते आणि खायला मजाही. 

साहित्य 

  • 10 ते 200 ग्रॅम पनीर
  • 100 ग्रॅम ग्रॅम मटर (हिरवा वाटाणा)
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 चिरलेला टोमॅटो
  • 5 ते 6 लसूण पाकळ्या
  • 1 इंच आल्याचा तुकडा
  • चिरलेली कोथिंबीर
  • 2 चमचे तिखट
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा गरम मसाला
  • तेल
  • चवीनुसार मीठ
  • गरजेनुसार पाणी 

कृतीः

  • पहिल्यांदा मटर पाण्यात वाफवून घ्या. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या 
  • आता याच्या ग्रेव्हीसाठी मसाला तयार करुन घ्यावा. त्यासाठी कांदा, टॉमेटो पहिल्यांदा कढईत तेल घालून परतून घ्यावे.
  • तेल सुटले की त्यात चिरलेले आले, लसूण घालून पुन्हा परतावे. हे मिश्रण शिजल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे 
  • आता पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरी तडतडू द्या. वरून मिक्सरमध्ये वाटलेला मसाला घाला. तेल सुटेपयर्यंत परतून घ्या. मग त्यावर हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला घालून परता. आता छान परतून झाल्यवर आवश्यक तेवढे पाणी घालून रस्सा तयार करुन घ्या. 
  • वरून चवीनुसार मीठ घाला आणि मग शिजलेले मटर आणि पनीरचे तुकडे त्यात घाला आणि 10 – 15 मिनिट्स त्यावर झाकण ठेऊन नीट शिजू द्या. तुमची भाजी तयार आहे. यावर चिरलेली कोथिंबीर पेरून त्याचा स्वाद वाढवा. 

पनीर भुर्जी रेसिपी मराठीत (Paneer Bhurji Recipe In Marathi)

Paneer Bhurji Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Paneer Bhurji Recipe In Marathi

अंड्याची भुर्जी तर सर्रास घरांमध्ये बनते. पण पनीरची भुर्जीदेखील तितकीच चविष्ट लागते. कुलचा, पराठा अथवा रोटीसह पनीर भुर्जी अप्रतिम लागते. घरच्या घरी कशी बनवाल पनीर भुर्जी जाणून घ्या. 

साहित्य

  • 200 ग्रॅम पनीर
  • 1 वाटी टोमॅटो बारीक चिरलेला
  • 1 वाटी चिरलेला बारीक कांदा 
  • 3 चमचे बटर (अमूल बटर)
  • 1/2 वाटी मटार (तुम्हाला हवे असल्यास, याव्यतिरिक्त तुम्ही किसलेल्या गाजराचाही वापर करू शकता)
  • 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 चमचा हळद पावडर
  • 1 चमचा जिरे
  • 1 चमचा लाल तिखट
  • 2 चमचे पावभाजी मसाला (नको असल्यास, बाजारातील तयार पनीर भुर्जी मसाला)
  • 1 चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ

कृतीः 

ADVERTISEMENT
  • एका कढईत बटर आणि तेल घाला. बटर वितळल्यावर त्यात जिरे आणि कांदा घालून चांगले परतून घ्या. कांदा चांगला ब्राऊन परतला की त्यात टोमॅटो घाला. दोन मिनिटात मटार घालून वाफवा आणि मग तेल सुटेपर्यंत कांदा, टोमॅटो, मटार चांगले परतून घ्या
  • कांदा, टोमॅटो दोन्ही व्यवस्थित भाजले आणि त्याला चांगले तेल सुटल्यावर त्यात हळद पावडर, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, पाव भाजी मसाला व कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घेणे मसाले चांगले परतल्यानंतर त्यात पनीर कुस्करून घालणे व चांगले मिक्स करून घेणे. तु
  • मची गरमागरम पनीर भुर्जी तयार. तुम्हाला हवं त्यावर कोथिंबीर चिरून घालणे आणि लिंबाचा रस पिळून ब्रेड गरम करून खाणे अथवा बटर रोटी, नानसह खाणे 

चिली पनीर (Paneer Chilli Recipe In Marathi)

Paneer Chilli Recipe In Marathi

Paneer Chilli Recipe In Marathi

हॉटेलमध्ये गेलो आणि स्टार्टरमध्ये चिली पनीर मागवलं नाही असं सहसा होत नाही. अनेकांना हा पदार्थ अत्यंत आवडतो. पण तुम्ही घरीही तितकाच चविष्ट चिली पनीर हा पदार्थ बनवू शकता. चिली पनीर रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी.  

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1 छोटा कोबी किसून 
  • 4-5 हिरव्या मिरच्या
  • 2 सिमला मिरची बारीक चौकोनी तुकडे  
  • 2 गाजर किसून 
  • 1 चौकोनी चिरलेला कांदा
  • तयार पनीर चिली मसाला पॅकेट
  • 2 चमचे आले लसूण पेस्ट
  • आवश्यकतेनुसार तेल
  • चिली सॉस
  • सोया सॉस 
  • चवीनुसार मीठ 
  • 1/2 कप पाणी

कृतीः 

  • कोबी, गाजर, सिमला मिरची स्वच्छ धुऊन बारीक कट करून घ्या. कांद्याचे आणि सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून घ्या. हिरव्या मिरच्या उभ्या चिरा. पनीरचे चौकोनी तुकडे करून थोड्या तेलावर भाजून घ्या
  • एका पॅनमध्ये थोडया तेलावर हिरव्या मिरच्या फोडणीला टाकून त्यात कांदा परता. गॅसची मध्येम आच ठेऊन त्यानंतर लगेच सर्व भाज्या परताव्यात. वरून आले लसूण पेस्ट, पनीर घालून पुन्हा परता.
  • वरून पनीर चिली मसाला घाला. एक एक चमचा चिली सॉस आणि सोया सॉस, मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर 1/2 कप पाणी घालावे, भाज्या जास्त शिजू देऊ नये. पाच मिनिट्सने वाफ आल्यावर उतरवून सर्व्ह करू शकता

पनीर टिक्का (Paneer Tikka Recipe In Marathi)

Paneer Tikka Recipe In Marathi

Paneer Tikka Recipe In Marathi

पनीर टिक्का मसाला ही भाजी तर सर्वांचीच आवडती आहे. बाहेरही सर्वात जास्त मागवली जाणारी हीच भाजी आहे. पण पनीर टिक्का स्टार्टरची चवच काही वेगळी आहे. तुम्हीही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पनीर टिक्का स्टार्टर्स म्हणून करू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. 

ADVERTISEMENT

साहित्य 

  • 100 – 150 ग्रॅम पनीर 
  • 2 लहान सिमला मिरची 
  • 2 लहान कांदे चौकोनी तुकडे करून 
  • 1/2 कप दही
  • 2 चमचे भाजलेले बेसन
  • ¼ चमचा लाल तिखट
  • पाव चमचा हळद पावडर
  • चवीनुसार मीठ
  • चिमूटभर हिंग
  • 1 मोठा चमचा तेल
  • 1 चमचा बटर

कृतीः 

  • कांदा, सिमला मिरची आणि पनीर यांचे चौकोनी तुकडे करून घ्या
  • दही, बेसन, लाल तिखट, हळद पावडर, हिंग, ओवा, मीठ एकत्र करून मॅरिनेशन तयार करून घ्या. त्यात पनीरचे तुकडे, सिमला मिरची आणि कांद्याचे चौकोनी तुकडे घालून मॅरीनेट करून घ्या. साधारण अर्धा तास ठेवा 
  • टूथपिकला क्रमाने सिमला मिरची, पनीरचा तुकडा आणि मग कांद्याचा तुकडा लावा. पॅन किंवा तव्यावर तेल आणि बटर घालून त्यावर ठेऊन चारी बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या
  • तयार पनीर टिक्का प्लेट मध्ये सर्व्ह करा. आवडत असल्यास टोमॅटो सॉस आणि चटणीसोबत सर्व्ह करावे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिरलेला कांदा, लिंबाचा रस यावर पिळून सर्व्ह करू शकता. 

पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)

Paneer Paratha Recipe In Marathi

Paneer Paratha Recipe In Marathi

ADVERTISEMENT

सकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा बरेचदा प्रश्न पडतो. पनीर पराठा हा उत्तम पर्याय आहे. यामुळे पोटही व्यवस्थित भरलेले राहाते आणि लवकर भूकही लागत नाही. याची रेसिपी जाणून घेऊया. 

साहित्य

  • पाव किलो पनीर
  • 1 कांदा बारीक चिरून 
  • 2 मिरच्या
  • 10-12 पुदीना पाने 
  • चिरलेली कोथिंबीर
  • 1 चमचा जिरे पावडर
  • 1 चमचा हळद पावडर
  • 1 वाटी गव्हाचे पीठ
  • मीठ चवीनुसार
  • पाणी
  • साजूक तूप अथवा बटर 

कृतीः 

  • पहिल्यांदा पनीर किसून घ्या. एका परातीत किसलेले पनीर मग त्यात कांदा, मिरच्या, कोथिंबीर, पुदीना बारीक चिरून, मीठ आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करा आणि गोळे करून घ्यावे
  • कणीक अर्धा तास आधी भिजवून ठेवा
  • पोळी लाटा आणि पनीरचा गोळा त्यात भरून व्यवस्थित बंद करून पुन्हा लाटा
  • तुपावर अथवा बटरवर भाजा आणि मस्तपैकी हिरव्या चटणी अथवा सॉसबरोबर गरमागरम पराठा खायला घ्या 

शाही पनीर रेसिपी मराठी (Shahi Paneer Recipe In Marathi)

Shahi Paneer Recipe In Marathi

ADVERTISEMENT

Shahi Paneer Recipe In Marathi

शाही पनीर आपण सहसा बाहेर हॉटेलमधून घरी काही कार्यक्रम असेल तर ऑर्डर करतो. पण तुम्हीही घरच्या कार्यक्रमासाठी घरच्या घरी शाही पनीर बनवू शकता. घरच्या शाही पनीरचा स्वाद काही वेगळाच आणि अप्रितम लागतो. 

साहित्य 

  • 200 ग्रॅम चीज
  • 2 मोठे टोमॅटो प्युरी
  • 1 कांदा प्युरी
  • 1/2 वाटी काजू पेस्ट
  • 7-8 बदाम पेस्ट
  • 1/2 वाटी दही
  • 1/2 वाटी मलई क्रीम
  • 1 तेजपत्ता
  • 1 मोठे चक्रीफूल
  • 3 लवंग
  • 1 मोठी वेलची
  • 3 हिरवी वेलची
  • पाव चमचा शहाजिरे 
  • 1 इंच दालचिनीचा तुकडा
  • 4 मिरीचे दाणे 
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 चमचा धणे पावडर
  • 1/2 चमचा मसाला
  • ½ चमचा हळद पावडर
  • 1 चमचा काश्मिरी लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 4 चमचे बटर / तूप
  • 1/2 कप दूध
  • 1 चमचा कसूरी मेथी
  • 1/2 चमचा साखर

कृतीः 

ADVERTISEMENT
  • पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या. कांदा, टोमॅटो, काजू आणि बदाम पेस्ट करून घ्यावी. दही घेऊन त्यात धणे पावडर टाकून चांगले मिक्स करून फेटून घ्या.
  • एका पॅनमध्ये बटर आणि तेल घाला. त्यात पनीर सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्या आणि काढून बाजूला ठेवा
    आता त्याच पॅनमध्ये, तेजपत्ता, वेलची, लवंग, शाहजिरे, मिरे, दालचिनी टाकून परतून घ्या आणि मग आता त्यात कांदा टाकून परतून घ्यावे. कांदा सोनेरी होऊ द्या
  • त्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट आणि काजू बदाम पेस्ट टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर चांगले परतल्यावर त्यात हळद पावडर आणि लाल तिखट टाकून एकत्र मिक्स करा. त्यात टोमॅटो प्युरी आणि मीठ घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून शिजू द्या
  • बाजूने तेल, बटर सुटल्यावर त्यात धणे पावडर मिश्रित दही टाकून चांगले मिक्स करून घ्या
  • त्यावर झाकण ठेवून शिजू द्या. 3-4 मिनिटानंतर झाकण काढून त्यात मलई क्रीम घालून चांगले मिक्स करून घ्या.
  • त्यावर तुम्हाला हवी असेल तर चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. पुन्हा झाकण ठेवून शिजू द्या. आता त्यात दूध टाकून एकत्र करावे आणि एक उकळी येऊ द्यावी.
  • आता त्यात कसुरी मेथी कुस्करून घाला. मसाला आणि साखर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात तळलेले पनीरचे तुकडे टाकून एकत्र करावे. शाही पनीर तयार आहे

कढई पनीर (Paneer Kadai Recipe In Marathi)

Paneer Kadai Recipe In Marathi

Paneer Kadai Recipe In Marathi

कढई पनीर अथवा कडाई पनीर हादेखील पनीरच्या भाजीमधील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. याची सहज सोपी रेसिपी आपण पाहूया. 

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 2 चमचे धने
  • 1 चमचे जिरे
  • 4-5 लाल सुक्या मिरच्या
  • 10 काळामिरी
  • 1/2 कप सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे
  • 1/2 कप कांद्याचे तुकडे
  • 200 ग्राम पनीर
  • 1 कप बारीक चिरलेला कांदा
  • 1 कप टोमॅटो प्युरी
  • दीड चमचे लाल मसाला (लाल तिखट पावडर)
  • 1/2 चमचा हळद पावडर
  • 1 चमचा किचन किंग मसाला
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 2 चमचे तेल
  • मीठ चवीनुसार

कृतीः 

  • एका पॅनमध्ये धने, जिरे, काळामिरी आणि मिरची भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड करा. हा आपला कढई पनीर मसाला तयार 
  • आता त्याच भांडयात तेल घाला आणि त्यात कांदा, सिमला मिरची टाकून थोडे फ्राय करा. मग त्यात पनीर तुम्ही टाका आणि थोडासा गोल्डन कलर आला की बाहेर काढून घ्या. आता त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा घाला आणि मग गोल्डन होईपर्यंत भाजा.
  • मग त्यात सगळे मसाले आणि 2 टीस्पून तयार कढई मसाला, पेस्ट ओता आणि छान परतवून त्यात टोमॅटो प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत परतवा. मग त्यात पनीर आणि मीठ दोन्ही आपल्या अंदाजानुसार घालून मिक्स करा आणि 5 मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. ग्रेव्ही हवी असेल तर 1/2 कप पाणी तुम्ही त्यात घालू शकता. शिजल्यावर तुम्ही नान, रोटी, पोळीबरोबर सर्व्ह करा.

पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala)

Paneer Butter Masala

Paneer Butter Masala

पनीर बटर मसाला हीदेखील सर्वांची आवडती रेसिपी आहे. विशेषतः पनीरच्या भोवतालचा मसाला कसा बनवायचा तो महत्त्वाचा असतो. याची फक्कड रेसिपी खास तुमच्यासाठी 

ADVERTISEMENT

साहित्य

  • 200 ग्राम पनीर
  • 2 चिरलेले कांदे
  • 4 टोमॅटोची प्युरी
  • 4-5 लसूण पाकळ्या
  • 1 तुकडा आले
  • 10-12 काजू किंवा काजूची पेस्ट 
  • 1 तेजपत्ता
  • 1 तुकडा दालचिनी
  • 2 लहान वेलची अथवा एक मोठी वेलची 
  • 2-3 लवंग
  • 3-4 काळिमीरी
  • 1 हिरवी मिरची
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा धणेपूड
  • 1/4 चमचा हळद पावडर
  • 1 चमचा काश्मिरी लाल तिखट
  • 1/2 चमचा कसुरी मेथी
  • बटर गरजेनुसार
  • मीठ चवीनुसार

कृतीः

  • पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटोचे मोठे तुकडे कट करून घ्या. 1 कांदा आणि 1 टोमॅटो बाजूला ठेवा. कढईत बटर गरम करून तेजपत्ता, लवंग, दालचिनी, काळिमीरी, वेलची, आले आणि लसूण, हिरवी मिरची, कांदा घालून परतावे. नंतर
  • काजू, लाल तिखट पावडर, धणेपूड, हळद घालून परतून घ्या
  • टोमॅटो घालून मिक्स करा. पाणी घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या अथवा टॉमेटो प्युरी त्यामध्ये अॅड करा
  • थंड झाल्यावर खडे मसाले काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे आणि हे वाटण काढून ठेवावे
  • बाजूला ठेवलेला एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत बटर गरम करून कांदा परतून घ्या. टोमॅटो घालून परता. त्यात काश्मिरी लाल तिखट, मीठ, कसुरी मेथी कुस्करून घाला. ते व्यवस्थित परता आणि मग वाटलेला मसाला घालून मिक्स करा.
  • ही ग्रेव्ही पाच मिनिट्स नीट शिजू द्या. त्यात पनीर घालून पुन्हा वाफ काढा. वरून चिरलेली कोथिंबीर घाला आणि मग सर्व्ह करा

पनीर कोल्हापुरी (Paneer Kolhapuri)

Paneer Kolhapuri

Paneer Kolhapuri

ADVERTISEMENT

 

पनीर बटर मसाला, पनीर टिक्का मसाला, पनीर माखनवाला आणि पनीर कोल्हापुरी ही नावे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. पनीर कोल्हापुरी ही झणझणीत भाजी तुम्ही घरी कशी बनवयाची जाणून घ्या. 

साहित्य 

  • 250 ग्रॅम पनीर
  • 2 मोठे कांदे
  • 2-3 टोमॅटो मोठे
  • 1 चमचा गरम मसाला
  • दीड चमचा लाल तिखट
  • 3-4 लवंगा
  • 2 हिरवी वेलची
  • 3-4 मिरी
  • 1 तमालपत्र
  • 1/2 इंच दालचिनी
  • 1 चमचा जिरे 
  • 1 चक्रीफुल
  • 3-4 चमचे तेल
  • 1 चमचा गाईचे तूप
  • मीठ चवीनुसार
  • 4 चमचे दही
  • 1/2 चमचा साखर
  • 1/2 चमचा कसुरी मेथी
  • पाणी 
  • दीड चमचे धणे जिरे पावडर
  • 1/2 चमचा हळद पावडर
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • तेल आवश्यकते नुसार (पनीर तळण्यासाठी)

कृतीः 

  • पहिल्यांदा सर्व साहित्याची तयारी करून घ्या आणि सगळे कोरडे साहित्य एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्या
    पनीरचे तुकडे करून तेलातून तळून घ्या आणि बाजूला ठेवा 
  • आता कढईत तेल आणि तूप (अथवा बटर) घालून घ्या. तेलात जिरे, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची, तमालपत्र सगळे खडे मसाले एकत्र घाला. त्यात चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट घाला आणि ते सगळे व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत शिजवा. त्यानंतर त्यात टोमॅटो चिरून घाला आणि तो व्यवस्थित मऊ होई पर्यंत फ्राय करा. (तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये फरसबी, गाजर, फ्लॉवर या तिन्ही भाज्या कापून घालून शकता)
  • त्यात एकत्र केलेला सर्व मसाला वरून घाला आणि दही घालून सर्व मिश्रण एकत्र करा 
  • आता ग्रेव्ही ला उकळी येऊ द्या आणि त्यात कसुरी मेथी हातावर चुरून घाला, नंतर ती मिक्स करून तळून घेतलेलं पनीर घाला
  • ते नीट ग्रेव्हीमध्ये मिक्स करा आणि 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पनीर कोल्हापुरी भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे

घरच्या घरी पनीरच्या रेसिपी करण्यासाठी तुम्ही या सोप्या पद्धती वापरू शकता. तसंच तुम्ही पनीरपासून गोड खीर रेसिपी मराठी सुद्धा बनवू शकता. तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा. शेअर करा.

11 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT