ADVERTISEMENT
home / Recipes
Pizza Recipes In Marathi

होममेड पिझ्झा रेसिपी मराठीतून (Pizza Recipes In Marathi)

 

पिझ्झाचं नाव ऐकताच अथवा टिव्हीवर पिझ्झाची जाहिरात पाहतात तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. पिझ्झाचे विविध प्रकार बाजारात मिळतात. निरनिराळा बेस असलेले आणि निरनिराळ्या टॉपिंगचे पिझ्झा तुमचं मन वेधून घेतात. मात्र सध्या कोरोनाच्या काळात जर तुम्हाला बाजारातील पिझ्झा नको असेल तर तुम्ही घरच्या घरी स्वतःच्या हाताने विविध प्रकारचे पिझ्झा तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पिझ्झा कसा करायचा हे माहीत असायला हवं. वास्तविक पिझ्झा घरच्या घरी तयार करणं अतिशय सोपं काम आहे. यासाठी जाणून घ्या या पिझ्झा रेसिपी मराठीतून (pizza recipe in marathi.)

ब्रेड पिझ्झा (Bread Pizza Recipe In Marathi)

Bread Pizza Recipe In Marathi

Bread Pizza Recipe In Marathi

 

पिझ्झा बनवण्याचा सर्वात सोपा आणि झटपट प्रकार म्हणजे ब्रेड पिझ्झा. यासाठी तुम्हाला पिझ्झा बेस विकत आणण्याची अथवा पिझ्झा बेस बनवण्याची गरज नाही. शिवाय प्रत्येकाच्या घरी नाश्तासाठी ब्रेड असतोच. त्यामुळे पिझ्झाचा हा प्रकार अतिशय सोपा आणि कधीही करण्यासारखा आहे. तेव्हा जाणून घ्या झटपट होणारी पिझ्झा रेसिपी मराठीतून.
साहित्य –

  • ब्रेडचे स्लाईज अंदाजे चार
  • एक चमचा बटर
  • एक चिरलेला कांदा 
  • एक चिरलेला टोमॅटो
  • एक चिरलेली सिमला मिरची
  • बेबी कॉर्न
  • चिरलेले मशरूम
  • पिझ्झा सॉस
  • टोमॅटो सॉस
  • चमचा ऑरेगॅनो 
  • एक चमचा चिली फ्लेक्स
  • किसलेले मोझेरोला चीझ
  • चवीपुरतं मीठ

 पिझ्झा बनवण्याची कृती –

ADVERTISEMENT
  • एका पॅनमध्ये थोड्या बटरवर कांदा, टॉमेटो आणि सिमला मिरची परतून घ्या. 
  • त्यामध्ये आवडत असेल या अंदाजाने पिझ्झा सॉस, ऑरगॅनो, चिली फ्लेक्स मिक्स करा आणि पॅनखालील गॅस बंद करा. 
  • वरून मीठ घालून मिश्रण मिक्स करा.
  • तव्यावर ब्रेडचे स्लाईज बटर लावून एकाबाजून शेकवा. 
  • दुसऱ्या बाजूने शेकत ठेवा आणि वरच्या  बाजून पिझ्झाचे मिश्रण अथवा टॉपिंग ब्रेडला लावा.
  • वरून मस्त हवं तेवढं मोझेरेला चीझ पेरा.
  • चीझ मेल्ट झालं की वरून ऑरॅगेनो, चिली फ्लेक्स आणि सॉस टाकून सर्व्ह करा.

पनीर पिझ्झा (Paneer Pizza Recipe In Marathi)

Paneer Pizza Recipe In Marathi

Paneer Pizza Recipe In Marathi

 

पनीर हा पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. शिवाय रोजच्या भाजी,स्नॅक्ससाठी लागत असल्यामुळे तो घरात नेहमीच असतो. पिझ्झा बेस विकत आणलेला असेल तर घरीच पिझ्झा करणं काहीच कठीण नाही. त्यामुळे मनसोक्त पनीर खाण्यासाठी ट्राय करा ही पिझ्झा रेसिपी मराठीतून 
साहित्य –

  • पिझ्झा बेस
  • एक चिरलेला कांदा
  • एक चिरलेला टॉमॅटो
  • एक चिरलेली सिमला मिरची
  • अर्धी वाटी पनीर 
  • मोझेरेला चीझ
  • पिझ्झा सॉस
  • टोमॅटो सॉस
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • बटर
  • चवीपुरतं मीठ

पिझ्झा बनवण्याची कृती –

  • पिझ्झा बेसला बटर लावा.
  • त्यावर पिझ्झा सॉस आणि टॉमेटो सॉस पिझ्झा बेसला नीट लावा.
  • वरून टॉपिंगसाठी चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची, पनीर, चीझ लावून घ्या
  • तयार पिझ्झा बेस पाच मिनीटे ओव्हनमध्ये ठेवा.
  • ओव्हन नसेल तर झाकण असलेल्या पॅनमध्ये तुम्ही तो गरम करू शकता.
  • वरून सॉस, काळीमिरी, चिली फ्लॅक्स, मीठ टाकून सर्व्ह करा.

मैद्याचे पदार्थ रेसिपी (Maida Recipes In Marathi) 

ADVERTISEMENT

व्हेज पिझ्झा (Veg Pizza Recipe In Marathi)

Veg Pizza Recipe In Marathi

Veg Pizza Recipe In Marathi

 

पिझ्झा बनवण्याची आणि खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा पिझ्झा बेस स्वतः घरी तयार केलेला असतो. यासाठीच या पिझ्झासाठी आम्ही तुम्हाला पिझ्झा बेस तयार करण्यापासून पिझ्झा कसा करायचा हे सांगणार आहोत
साहित्य –

  • गव्हाचे आणि मैद्याचे पीठ प्रत्येकी अडीच कप
  • इस्ट
  • तेल दोन चमचे
  • चीज आवडीनुसार
  • चिरलेला टोमॅटो
  • चिरलेला कांदा
  • चिरलेली सिमला मिरची
  • चीझ
  • चवीपुरते मीठ
  • कोमट पाणी
  • इटालियन मसाला
  • अर्धा चमचा साखर

पिझ्झा बनवण्याची कृती – 

  • सर्वात आधी पीठ आणि मैदा चाळून घ्या. त्यात बटर अथवा तेल, मीठ. इटालिअन मसाला टाका आणि चांगले मिक्स करा. 
  • कणकेच्या मध्यभागी खड्डा करून त्यात साखर  आणि कोमट पाण्यात इस्ट अॅक्टिव्हेट करा. यीस्ट अॅक्टिव्हेट झाल्यावर पीठ मऊसर मळून घ्यावे.  पीठाला लवचिकता येईल इतपत ते मळून घ्या. पीठाच्या गोळ्याला तेल लावून ते एका भांड्यात वरून ओला फडका ठेवून पाच ते  सहा मिनीटे ठेवा. उबदार ठिकाणी ठेवल्यास पीठ लवकर फुगेल.
  • ओव्हन प्रीहिट करून घ्या आणि पिझ्झा बेक करण्यासाठी ट्रे तयार करा
  • ट्रेला ऑयलिंग आणि डस्टिंग करून घ्या
  • मळलेल्या पीठाला बेसप्रमाणे आकार द्या आणि तो ट्रेमध्ये ठेवा वरून काट्याने टोचे मारा.
  • साधारपणे २५० सेल्सिअसवर सहा ते सात मिनिटे पिझ्झा बेस बेक करा
  • बेक केलेल्या बेसवर बटर, सॉस, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मीठ, चिली फ्लेक्स टाका आणि पिझ्झा आणखी पाच मिनीटे बेक करा. 

चिकन स्टाटर्स रेसिपी

ADVERTISEMENT

चपाती पिझ्झा (Chapati Pizza Recipe In Marathi)

Chapati Pizza Recipe In Marathi

Chapati Pizza Recipe In Marathi

 

पिझ्झा बेस घरात नसेल आणि  बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही चक्क घरात उरलेल्या चपाती पासून मस्त पोळी पिझ्झा (poli pizza recipe in marathi )तयार करू शकता. कारण पिझ्झाचा बेसही मैदा आणि गव्हापासून तयार केलेला असतो. 
साहित्य –

  • उरलेल्या पोळ्या अथवा चपाती
  • पिझ्झा सॉस
  • एक चिरलेला कांदा
  • एक चिरलेला टोमॅटो
  • एक चिरलेली हिरवी मिरची
  • एक चिरलेली सिमला मिरची
  • एक चमचा ऑरेगॅनो
  • एक ते दोन चमचे चिली फ्लेक्स
  • एक बाऊल मोझेरेला चीझ
  • बटर
  • चवीपुरतं मीठ

पिझ्झा बनवण्याची कृती –

  • एका प्लेटमध्ये चपाती घ्या.
  • चपातीला बटर आणि सॉस लावा.
  • कांदा, टॉमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची आणि मीठ एकत्र करा चपातीवर पसरवून घ्या.
  • वरून चीझ, ऑरगेनो, चिली फ्लेक्स पसरवा.
  • तव्यावर चपाती ठेवा आणि चीझ विरघळेपर्यंत गरम करा.
  • गरमा गरम पिझ्झाचा आनंद घ्या. 

नक्की ट्राय करा या सोप्या बेकिंग रेसिपीज.

ADVERTISEMENT

रवा पिझ्झा (Rava Pizza Recipe In Marathi)

Rava Pizza Recipe In Marathi

Rava Pizza Recipe In Marathi

 

पिझ्झा नेहमी मैद्यापासून बनवला जातो. मात्र तुम्हाला मैद्याच्या पदार्थामुळे त्रास होत असेल तर तुम्ही हा रव्याचा पिझ्झाही करून पाहू शकता. घरात असलेल्या पदार्थापासून केला जाणारी ही एक छान पिझ्झा रेसिपी मराठीतून आहे.
साहित्य –

  • एक कप रवा
  • चवीपुरतं मीठ
  • एक कप ताक
  • चिमुटभर फ्रूट सॉल्ट
  • पिझ्झासाठी सॉस
  • तेल
  • मोझेरेला चीझ
  • चिरलेला कांदा
  • चिरलेला टॉमेटो
  • चिरलेली सिमला मिरची
  • बेबी कॉर्न
  • आवडीनुसार हर्ब्स 

पिझ्झा बनवण्याची कृती –

  • सर्वात आधी एका भांड्यात रवा आणि मीठ घ्या त्यात एक कप ताक टाकून घट्ट बॅटर तययार करा 
  • पंधरा मिनीटे झाकून ठेवा आणि पुन्हा ते एकजीव करा
  • वरून चिमूटभर फ्रूट सॉल्ट टाता आणि तवा गरम करून त्यावर पॅन केक तयार करा
  • एकाा बाजूने खरपूस झाल्यावर ते पलटून घ्या
  • वरून सॉस, चीझ, कांदा, टॉमॅटो, सिमला मिरचीने सजवा
  • चीझ वितळू लागल्यावर पॅनमधून ताटामध्ये घ्या 
  • वरून चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकून पिझ्झाचा आनंद लुटा. 

रव्याचे पदार्थ (Rava Recipes In Marathi) 

ADVERTISEMENT

पॅन पिझ्झा (Pan Pizza Recipe In Marathi)

Pan Pizza Recipe In Marathi

Pan Pizza Recipe In Marathi

 

रव्याप्रमाणेच तुम्ही निरनिरळ्या बॅटरचे पिझ्झा तयार करू शकता. त्यासोबतच जाणून घ्या ही एक हटके पॅन पिझ्झा रेसिपी मराठीतून.
साहित्य – 

  • एक वाटी गव्हाचे पीठ
  • एक वाटी ताक
  • एक चिमूट बेकिंग सोडा
  • एक चिरलेला कांदा
  • एक चिरलेला टोमॅटो
  • एक चिरलेली सिमला मिरची
  • पिझ्झा सॉस
  • मोझेरेला चीझ
  • ऑरेगेनो
  • बटर
  • चिली फ्लेक्स
  • चवीपुरते मीठ

पिझ्झा बनवण्याची कृती –

  • पीठात बेकिंग सोडा आणि एक चमचा बटर टाकून पीठ मळून घ्या.
  • पंधरा मिनीटांनी पीठाची पोळी लाटून त्याला चमच्याने टोचे मारा.
  • एका पॅनमध्ये वाळू अथवा मीठ ठेवा तापल्यावर वरती ताटात पिझ्झा बेस ठेवून बेक करा.
  • दहा मिनीटांनी पिझ्झा बेस बाहेर काढा.
  • वरून बटर, सॉस, कांदा, टोमॅटो, चिली फ्लेक्स, ऑरगेनो, मीठ आणि सॉसची टॉपिंग तयार करा.
  • एका पॅनमध्ये तो गरम  करा आणि सर्व्ह करा.

चीझ पिझ्झा (Cheese Pizza Recipe In Marathi)

Cheese Pizza Recipe In Marathi

Cheese Pizza Recipe In Marathi

ADVERTISEMENT

 

पिझ्झा खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा पिझ्झावर भरपूर चीझ टाकलेलं असेल. जर तुम्ही चीझ वेडे असाल तर ही चीझ पिझ्झा रेसिपी नक्कीच ट्राय करा.
साहित्य –

  • पिझ्झा बेस
  • चिरलेला कांदा
  • चिरलेला टॉमॅटो
  • चिरलेली सिमला मिरची
  • टॉमेटो सॉस
  • चिली फ्लेक्स
  • ऑरगेनो
  • प्रोसेड चीज
  • दोन चमचे मेयॉनीज
  • बटर
  • चवीपुरतं मीठ

पिझ्झा तयार करण्याची कृती –

  • पिझ्झा बेसला बटर, मेयॉनीज आणि सॉस लावा.
  • वरून कांदा, टोमॅटो, सिमला मिरचीचे टॉपिंग द्या.
  • वरून हवं तेवढं चीझ, चिली फ्लेक्स, मीठ पेरा.
  • दहा मिनीटे पिझ्झा गरम करा.
  • गरमा गरम चीझ पिझ्झा  सर्व्ह करा. 

कॉर्न पिझ्झा (Corn Pizza Recipe In Marathi)

Corn Pizza Recipe In Marathi

Corn Pizza Recipe In Marathi

 

चीझप्रमाणेच बेबी कॉर्न अथवा कॉर्न हा लहान मुलांचं पिझ्झामधील आवडतं टॉपिंग असतं. यासाठीच या कॉर्नने असा बनवा पिझ्झा
साहित्य –

ADVERTISEMENT
  • पिझ्झा  बेस
  • एक कप चीझ
  • एक कप स्वीट कॉर्न अथवा बेबी कॉर्न
  • बटर
  • टॉमेटो सॉस
  • पिझ्झा सॉस
  • एक चमचा ऑरेगेनो
  • एक चमचा चिली फ्लेक्स
  • चवीपुरतं मीठ

पिझ्झा बनवण्याची कृती –

  • पिझ्झा बेसला बटर, टॉमेटो सॉस, पिझ्झा सॉस लावा.
  • वरून कॉर्न लावून घ्या आणि त्यावर चीझ आणि मीठ टाका. 
  • पिझ्झा ओव्हनमध्ये पाच मिनीटे गरम करा
  • वरून ऑरेगेनो, चिली फ्लेक्स टाकून सर्व्ह करा. 

वाचा – Patti Samosa Recipe In Marathi

चिकन पिझ्झा (Chicken Pizza Recipe In Marathi)

Chicken Pizza Recipe In Marathi

Chicken Pizza Recipe In Marathi

 

तुम्ही नॉन व्हेज खाणारे असाल तर तुमच्यासाठी नॉन व्हेज पिझ्झा (non veg pizza recipe in marathi) चा हा प्रकारही अतिशय उत्तम ठरेल. संडे स्पेशल हा पिझ्झा ट्राय करा आणि कुटुंबासोबत घरच्या घरी पार्टी करा.
साहित्य –

ADVERTISEMENT
  • पिझ्झा बेस
  • पाव किलो बोनलेस चिकन
  • एक चमचा आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
  • एक चमचा तंदुरी मसाला
  • चिरलेला कांदा
  • एक चमचा चिकन मसाला
  • चार ते पाच पानेपुदिना
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • एक हिरवी मिरची
  • चार पाकळ्या लसूण 
  • एक चमचा लिंबू साखर 
  • बटर
  • चीझ
  • टोमॅटो सॉस
  • मीठ चवीपुरते

बनवण्याची कृती –

  • चिकन स्वच्छ धुवून घ्या.
  • त्याचे छोटे छोटे तुकडे करा..
  • तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या.
  • त्यात आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका.
  • तंदूर मसाला आणि चिकन मसाला, मीठ टाका.
  • चिकनचे तुकडे  परतून घ्या.
  • अर्धा कप पाणी टाकून चिकन शिजू द्या.
  • पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, लिंबू साखर मीठ टाकून चटणी बनवा.
  • पिझ्झा बेसवर बटर, सॉस, चटणी लावा.
  • त्यावर चिकनचे तुकडे, चीझ लावून घ्या.
  • पंधरा मिनीटे पिझ्झा गरम  करा आणि सर्व्ह करा.

मार्गरिटा पिझ्झा (Margherita Pizza Recipe In Marathi)

Margherita Pizza Recipe In Marathi

Margherita Pizza Recipe In Marathi

 

मार्गारिटा पिझ्झा हा पिझ्झाचा इटालियन प्रकार आहे. भारतातही हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे घरच्या घरी पिझ्झा करण्यासाठी तुम्ही ही पिझ्झा रेसिपी मराठीतून नक्कीच करू शकता. 
साहित्य –

  • अर्धा किलो मैदा
  • चवीपुरतं मीठ
  • तीन कप कोमट पाणी
  • चार ते पाच चमचे ऑलिव्ह ऑईल
  • अर्धा चमचा साखर
  • एक कप मोजेरेला चीझ
  • बेझल अथवा तुळशीची पाने
  • काळी मिरी
  • पास्ता सॉस

पिझ्झा बनवण्याची कृती –

ADVERTISEMENT
  • मैदा चाळून घ्या आणि मीठ, साखर आणि यीस्ट एकत्र करूनअक्टिव्हेट करा.
  • सात ते आठ मिनीटे यीस्ट अॅक्टिव्हेट झाल्यावर मैद्यामध्ये ते मिसळा.
  • ऑलिव्ह ऑईल लावून पीठ मळून घ्या.
  • तयार पीठाचा गोळा दहा मिनीटे बाजूला झाकून ठेवा.
  • दहा मिनीटांनी पीठाला तेल लावून पाऊण तास कव्हर करून ठेवा.
  • पाऊण तासाने पीठाची मैदा लावून पोळी लाटा.
  • ओव्हन प्री हिट करा.
  • बेकींग ट्रेला बटर आणि मैदा लावा.
  • त्यावर पिझ्झा बेस ठेवा आणि त्याला इटालिअन सॉस लावा.
  • वरून मोजेरेला चीझ आणि बेझलची पाने लावा.
  • दहा ते वीस मिनीटे बेक करा.
  • ऑलिव्ह ऑईल लावून पिझ्झा सर्व्ह करा. 

पिझ्झा करण्यासाठी फार तयारी आणि वेळ खर्च करण्याची गरज नाही. कमीत कमी वेळात तुम्ही तुमच्या आवडीच्या टॉपिंगचे खास पिझ्झा घरीच बनवू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला या होममेड पिझ्झा रेसिपी मराठीतून ट्राय करायला हव्या.

14 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT