ADVERTISEMENT
home / Recipes
पावसाळ्यात हमखास ताव मारायला हवा या पदार्थांवर

पावसाळ्यात हमखास ताव मारायला हवा या पदार्थांवर

प्रत्येक सीझनची एक खासियत असते. उन्हाळा आले की, आंबे, फणस खायलाच हवे. पावसाळा म्हटलं की, भजी, चिकन आणि सगळे गरम गरम पदार्थ, थंडी म्हटले की, सणवाराचे दिवस त्यामुळे लाडू, कंरज्या, शंकरपाळ्या असे काही गोडधोड पदार्थ खाणे आले. सध्या मस्त पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. मान्सूनही योग्य वेळेत आल्यामुळे वातावरणात मस्त थंडावा आला आहे. आता या अशा वातावरणात काही पदार्थांचा आस्वाद हा घ्यायलाच हवा. तसा अलिखित नियमचं आहे. तुम्ही काही खास पदार्थ चाखायचे या दिवसात विसरला असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पदार्थांची यादी तयार केली आहे. तुम्ही हे पदार्थ या पावसाळ्यात कराच

चिकन खायची इच्छा होत असेल तर असे करा मस्त ग्रीन सुकं चिकन

चटपटा कॉर्न

चटपटा कॉर्न

Instagram

ADVERTISEMENT

कांद्याची भजी आपण नेहमीच खातो. पण कधी तुम्ही चटपटा कॉर्न खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर घरच्या घरी मका आणून तुम्ही अशी मस्त कार्न रेसिपी करु शकता. जी करायला फारच सोपी आहे. 

साहित्य: 1 ते 2 वाटी ओले कॉर्नचे दाणे, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, कोथिंबीर, लिंबू ,तेल
कृती:

  • एका भांड्यात कॉर्नचे दाणे घ्या. त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून ते छान घोळवून घ्या. एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवलेले कॉर्न तळून घ्या. टिश्यू पेपरवर हे कॉर्न काढून घ्या.
  • एका बाऊलमध्ये हे दाणे घेऊन त्यामध्ये चाट मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर, हिरव्या मिरचीचे तुकडे, लिंबू आणि वरुन मस्त कोथिंबीर भुरभुरा. तुमचे चटपटा कॉर्न तयार. मस्त कॉफी आणि चहासोबत कॉर्न एन्जॉय करु शकता. 

3 सोप्या ट्रिक्सने बनवा सुटसुटीत भात, करून पाहा सोप्या हॅक्स

चिकन सूप

चिकन सूप

ADVERTISEMENT

Instagram

मृग नक्षत्र आले की, या दिवसात चिकनचा बेत खूप जणांकडे केला जातो. कोंबडी वडे करण्याची पद्धत खूप जणांकडे असते. पण तुम्हाला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही मस्त चिकन सूप करु शकता. या चिकन सूपमुळे तुम्हाला मस्त एनर्जी तर मिळूच शकते. शिवाय हे सूप तुमचा मूड चांगला करु शकेल. 

साहित्य: 1 गावठी कोंबडी, आलं-लसूण पेस्ट, लाल मसाला, हिरवी मिरची, काळीमिरी पूड, मीठ, लिंबू , तेल, कांदा,
कृती:

  • एका कुकरमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, काळीमिरी घालून त्याची चांगली फोडणी करुन घ्या.
  • गावठी कोंबडी चांगली स्वच्छ करुन घ्या. ती या फोडणीत घालून मीठ, लाल तिखट, गरम मसाला घालून पाणी घाला. (तिखट खात असाल तर हिरवी मिरची जरा जास्त घाला)
  • कुकरचे झाकण लावून चांगल्या दोन ते चार शिट्ट्या काढून घ्या. गरमा गरम हे सूप प्या. त्यावर लिंबू पिळल्यावर हे सूप मस्तच लागते. 

विभिन्न प्रकारच्या आमटी रेसिपी मराठीतून (Amti Recipe In Marathi)

ADVERTISEMENT

मुंगडाळ भजी

Instagram

पावसाळा आहे आणि भजीचा एकदाही बेत नाही असे होणारच नाही. त्यामुळे तुम्ही या दिवसात नुसतीच कांदा भजी किंवा बटाट भजी न करता जर तुम्ही मस्त मुंगडाळ भजी केली तर तुम्हाला काहीतरी वेगळे खाण्याचा आनंद नक्कीच मिळेल.

 साहित्य: साधारण 4 तास भिजवलेली मुंगडाळ, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण, कोथिंबीर, तेल,कडिपत्ता चिंच-गुळाची चटणी, तिखट चटणी 

ADVERTISEMENT

कृती: 

  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुंगडाळ घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं-लसूण. कडिपत्ता पेस्ट, कोथिंबीर घालून त्याची एक दरदरीत पेस्ट करुन घ्या. 
  • कढईत तेल गरम करुन त्यामध्ये थोडे थोडे भजीचे पीठ सोडा. सोनेरी रंगावर तळून  मस्त चटणीसोबत सर्व्ह करा.

आता या तीन मस्त रेसिपी तुम्ही नक्की करा.

09 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT