ADVERTISEMENT
home / Care
कुरळ्या केसांसाठी हेअर केअर रूटीन, नक्की घ्या जाणून

कुरळ्या केसांसाठी हेअर केअर रूटीन, नक्की घ्या जाणून

कुरळे केस असणाऱ्या महिलांचे दुःखच वेगळे असते. विशेषतः केस धुतल्यावर केसात होणारा गुंता आणि त्यानंतर करावी लागणारी कसरत काही वेगळीच असते. कारण हे काम अत्यंत थकवणारे असते. त्यामुळे ज्या महिलांचे केस कुरळे (Curly hair) आहेत त्यांनी नियमित हेअर केअर रूटिन (hair care routine) पाळायला हवं. पण म्हणजे नक्की काय असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. तर केसांची काळजी घेणाऱ्या उत्पादनांचा योग्य प्रमाणात उपयोग करा. यामुळे तुमचे कुरळे केस नक्कीच चांगले राहतील आणि निरोगीही. आम्ही दिलेल्या काही टिप्स आणि हेअर केअर रूटिन तुम्ही जर फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळेल. जाणून घ्या काय आहे कुरळ्या केसांसाठी नियमित हेअर केअर रूटिन (hair care routine for curly hair).

केस धुण्यापूर्वी करा हायड्रेट (Hydrate your hair before wash)

केस धुण्यापूर्वी त्यामध्ये तेल अथवा मास्कचा उपयोग करणे गरजेचे आहे. यामुळे केस हायड्रेट (hydrate) होतात. असे केल्याने शँपू केल्यानंतर तुमचे कुरळे केस कोरडे राहात नाहीत. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हेअरमास्कचा उपयोग करा. यामध्ये असणारे केरेटिन आणि मारूला तेल हे कुरळ्या केसांना पोषण देते आणि अधिक काळ चमकदार राहण्यास मदत करते. तसंच कुरळ्या केसातील गुंता सोडविण्यासाठीही याची मदत होते आणि केस धुतल्यानंतर सहजपणे सांभाळणे शक्य होते. 

कुरळ्या केसांची काळजी घेणं आता अजिबात कठीण नाही, जाणून घ्या टिप्स

स्काल्पवर करा लक्ष केंद्रित (need to care about scalp)

स्काल्पवर करा लक्ष केंद्रित (need to care about scalp)

ADVERTISEMENT

Shutterstock

अनेक कुरळ्या केस असणाऱ्या मुली आहेत ज्यांनी को – वॉशिंग (Co-washing) ची पद्धत आता अंगवळणी पाडून घेतली आहे. यामध्ये तुम्हाला केसांना अजिबात शँपू करावा लागत नाही. केवळ कंडिशनरचा उपयोग करायचा असतो. अर्थात असं पूर्णतः करणे तर शक्य नाही. तसंत तुम्ही नुसता कंडिशनर वापरलात तर स्काल्पमधून दुर्गंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच तुम्हाला डोक्यात खाजही येऊ शकते. त्यामुळे तुम्ही केस कोरडे केल्याशिवाय आपल्या स्काल्पला स्वच्छ करण्यासाठी माईल्ड शँपूचा उपयोग करून घ्या. यामुळे तुमच्या केसांना हानी पोहचत नाही. यामध्ये पॅराबेन अथवा सिलिकॉन अथवा डाय केमिकल्स नसतात. तसंच तुम्ही तुमच्या कुरळ्या केसांवरील चिकटपणा काढण्यासाठी आणि कंडिशन करण्यासाठी ऑर्गन ऑईल आणि लव्हेंडरचे गुण असणारे शँपू वापरा. यामुळे केस अधिक चांगले राहतात आणि स्काल्पही व्यवस्थित राखण्यास मदत मिळते. 

कुरळ्या केसांची अशी घ्या काळजी, वापरा हे उपाय

कंडिशनरचा वापर (Use conditioner)

कंडिशनरचा वापर (Use conditioner)

ADVERTISEMENT

Freepik

कंडिशनर तुमच्या कुरळ्या केसांचा सर्वात जवळचा मित्र आहे असं समजा. तुमच्या हेअर केअर रूटिनमध्ये तुम्ही याचा समावेश करून घ्यायलाच हवा. कुरळ्या केसांना अतिरिक्त कंडिशनरची आवश्यकता भासते. त्यासाठी घाबरून जाण्याची अथवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या केसांच्या उंचीनुसार तुम्ही कंडिशनर वापरा. तसंच सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही ज्या कंपनीचा शँपू वापरणार आहात त्याच कंपनीचा कंडिशनरदेखील तुम्ही वापरा. दोन्ही वेगवेगळे वापरू नका. केसांच्या चांगल्या परिणामासाठी आणि अधिक पोषणासाठी तुम्ही हे हेअर केअर रूटिन नक्की पाळा. 

केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)

हेअर सीरमची गरज (Need good Hair serum)

जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर येता तेव्हा अतिरिक्त पाणी सुकवण्यासाठी तुम्ही सुती टी – शर्ट अथवा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा. त्यानंतर तुम्ही आपल्या वॉश डे चे रूटिन पूर्ण केल्यानंतर केसांवर सीरम लावा. हे तुमच्या केसांना प्रोटेक्टिव्ह लेअर देते जे सूर्याच्या किरणांपासून तुमच्या केसांना वाचविण्यास मदत करते. अनेक सीरममध्ये केरेटिन आणि कॅमेलिया ऑईल असते जे केसांना पोषण देण्यास फायदेशीर ठरते. तसंच हे लावल्यानंतर तुमचे केस त्वरीत चकमदार दिसतात. त्यामुळे याचा कुरळ्या केसांसाठी हेअर केअर रूटिनमध्ये उपयोग करून घ्या. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक 

 

16 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT