ADVERTISEMENT
home / कल्पित कथा
Annabhau Sathe Information In  Marathi

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi)

मराठी साहित्यिकांमध्ये अगदी आवर्जून नाव घेतले जाते, ते म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे. येत्या 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. शिवशाहीर म्हणून ओळखले जाणारे हे साहित्यसम्राट त्यांच्या साहित्यिक वारसामुळे आजही अजरामर आहेत. अण्णाभाऊ साठे कादंबरी , नाटक, लोकनाट्य, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा अनेक प्रकारात साहित्याची निर्मिती करणारे अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहेत. अशा लोकशाहीरांची आठवण येणार नाही असे मुळीच होत नाही. अण्णाभाऊ साठे जयंती आणि अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीला खास अण्णाभाऊ साठे यांचे कोट्स (annabhau sathe quotes), अण्णाभाऊ साठे कविता (annabhau sathe marathi kavita) ही शेअर केल्या जातात. आजच्या या काळात अण्णाभाऊ साठे कोण हे नाव साहित्यविश्वात कोणाला माहीत नाही, असं नाही. अशा अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Annabhau Sathe Information In Marathi) सगळ्यांना मिळावी यासाठी त्यांची इत्यंभूत माहिती जाणून घेणे फारच गरजेचे आहे. अण्णाभाऊ साठे जयंती च्या निमित्ताने त्यांच्या माहितीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे कादंबरी, अण्णाभाऊ साठे साहित्य याचा आढावा मराठीत घेणार आहोत. जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Annabhau Sathe Information In Marathi)

Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi

Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi

नाव: तुकाराम सिधोजी साठे उर्फ अण्णाभाऊ साठे
जन्मदिनांक : 1 ऑगस्ट 1920
जन्म स्थान: वाटेगाव
मृत्यू दिनांक: 18 जुलै 1969

ADVERTISEMENT

अण्णाभाऊ साठे हे मराठीतील ख्यातनाम साहित्यिक आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वालवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ सिधोजी साठे तर आईचे नाव वालबाई होते. दलित समाजात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण होऊ शकले नाही. पण त्यांना अक्षरज्ञान होते. त्या काळात वर्णभेद हा फार होता. त्या वर्णभेदाला कंटाळून त्यांनी शाळा सोडून दिली. चरितार्थासाठी त्यांच्या कुटुंबियांनी मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी कोळसा वेचण्यापासून ते अगदी झाडू काढण्यापर्यंत सगळी कामं केली. मुंबईतील जीवन अनुभवताना त्यांनी कष्टकरी लोकांवर होणारे अन्याय पाहिले आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. कामगारांचे कष्टप्रद जीवन पाहून आणि मोर्चे पाहून त्यांनाही काहीतरी काम करण्याची इच्छा झाली. त्यांनी कामगार नेते कॉ. श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. इथेच त्यांच्या राजकारणातील करीअरला सुरुवात झाली. पक्षाचे काम करत असताना कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची होती. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ते पुन्हा गावी परतले. चुलतभावाच्या तमाशात त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी काम करता करता त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळावी. त्यामुळे ते लोकशाहीर म्हणून नावारुपाला आले. अण्णाभाऊ साठे यांनी दोन लग्ने केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता साठे. त्यांना एकूण तीन अपत्ये होती. मधुकर, शांता आणि शंकुतला अशी त्यांची नावे होती. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद डांगे आणि कार्ल मार्क्स यांच्या विचाराचा प्रभाव होता. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय पोस्टाने 4 रुपयांच्या खास टपाल तिकीटावर त्यांचा फोटो ठेवला. 1 ऑगस्ट 2001 रोजी त्यांचे पहिले पोस्ट तिकीट आले. लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांचे नाव अनेक इमारतींनाही देण्यात आलेली आहेत. त्यांच्या नावाने साहित्य संमेलन देखील भरवले जाते. अण्णाभाऊ साठे यांची माहिती खास POPxoMarathi वाचकांसाठी देत आहोत. 

जाणून घ्या कुसुमाग्रज यांची माहिती

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य (Annabhau Sathe Books)

अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाच्या फडातून काम करताना त्यांचा त्याची गोडी लागली. साहित्यातही त्यांची रुची वाढत गेली. अण्णाभाऊ साठे कादंबरी अनेक आहेत. त्यांनी मराठी भाषेत एकूण 35 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या कादंबरी फारच गाजल्या. त्यांच्या निरीक्षणशक्तीवर आधारित अशा या कादंबरी असल्यामुळे वाचकांना त्यांच्या कादंबरी या फारच आवडत असे. त्यांनी लिहिलेल्या कादंबरी या वेगवेगळ्या विषयांवर आधारीत अशा होत्या. त्यांनी लिहिलेल्या कादंबरींमध्ये जिवंत, काडतूस,बरबाद्याकंजारी (1960), चिरानगरची भूतं (1978), वारणेचा वाघ ( 1968), चिखलातील कमळ, चित्रा (1945), फकिरा, वैजयंता (1961), टिळा लावते मी रक्ताचा (1969), अलगूज (1974), इनामदार (1958), मुरली मल्हारीयाची (1969)अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य यातून त्यांंची सूक्ष्म अशी निरिक्षणशक्ती दिसून येते. त्यांच्या लेखनशैलीमध्ये रांगडेपणा आणि कामगारांची तळमळ दिसून येते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये लावणी, पोवाडा,लोकगीते, नाट्यगीते यांचा देखील समावेश आहेत. महाराष्ट्राची परंपरा या नावाने त्यांनी लिहिलेला पोवाडा हा चांगलाच गाजला. याचे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग केले. त्यांनी काही लोकनाट्ये देखील लिहिली त्यामध्ये अकलेची गोष्ट (1945), देशभक्त घोटाळे (1946), शेटजींचे इलेक्शन (1946), बेकायदेशीर (1947), पुढारी मिळाला (1952), लोकमंत्र्यांचा दौरा (1952) याचा देखील समावेश होता. पारंपरिक तमाशा आधुनिक रुप देण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले.

लोकमान्य टिळकांची माहिती सविस्तरपणे जाणून घ्या

ADVERTISEMENT

अण्णाभाऊ साठे आणि राजकारण (Annabhau Sathe And Politics)

अण्णाभाऊ साठे यांचा राजकारणात सक्रिय असा सहभाग होता. अण्णाभाऊंवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा खोलवर परिणाम झाला होता. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावकरकरांपर्यंत त्यांनी सगळ्यांची भाषणे ऐकली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. दत्ता गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्यासोबत त्यांनी लालबावटा पथकाची निर्मिती केली. यापथकातून त्यांनी अनेक राजकीय निर्णयांना आव्हान देण्याचे काम केले. मुंबईच्या गिरणी कामगारांच्या लढयात, शेतकऱ्यांच्या लढ्यात, भूमिहिन लोकांच्या हितासाठी अण्णाभाऊ साठे यांनी काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीला अनुसरुन त्यांनी दलित कार्य करायला सुरुवात केली. दलित आणि कामगारांचे जीवन अधोरेखित करण्यासाठी त्यांनी कथांचा अधिकाधिक वापर केला. 1958 साली त्यांनी पहिल्या साहित्य संमेलनाचे उद्धघाटन करत भाषण केले त्यात त्यांनी काढलेले एक वाक्य चांगलेच गाजले. त्यांनी म्हटले की, ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे’ या सगळ्यातून त्यांनी समाजात चाललेला भेद लोकांना दाखवून दिला. 

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने किंवा स्मृतीदिनानिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांची माहिती आणि कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या साहित्याचा आनंद घ्यायला विसरु नका. 

04 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT