ADVERTISEMENT
home / आरोग्य
जाणून घ्या फ्रीजमध्ये  ठेवलेलं अन्न किती वेळ असते फ्रेश

जाणून घ्या फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न किती वेळ असते फ्रेश

आजकालच्या धावपळीच्या काळात जीवनशैलीमध्ये काही बदल नकळत घडत जाताना दिसत आहेत. ज्यामध्ये काही गोष्टी या आता आपोआप जीवनावश्यक झाल्या आहेत. जसं की फ्रीज, पूर्वी फ्रीज फक्त आरामदायक आयुष्य जगण्यासाठी लागणारी एक सुखसुविधा होती. मात्र आता प्रत्येकाला फ्रीजची गरज लागते. जे लोक नोकरी  करतात त्यांच्यासाठी अन्न टिकवण्यासाठी फ्रीज अतिशय गरजेची वस्तू आहे. सहाजिकच आता भाज्या, फळं, दूध ठेवण्यासोबत फ्रीजमध्ये आपण उरलेले अन्नदेखील सहज ठेवतो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न नेमकं किती तास फ्रेश राहतं आणि किती वेळानंतर ते मुळीच खाऊ नये.  या शंकेचं निरसन करण्यासाठी पुढील माहिती जरूर वाचा.

फ्रिजमधील अन्न किती काळानंतर खाऊ नये –

अन्नपदार्थ उरले की आपण ते सहज फ्रीजमध्ये ठकलून देतो. आपल्याला वाटतं की फ्रीजमध्ये अन्न कधीच खराब होत नाही. मात्र प्रत्येक पदार्थ खराब होण्याची एक विशिष्ठ वेळ असते. त्यामुळे असे पदार्थ फ्रीजमध्येही खराब होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या या काही महत्त्वाच्या गोष्टी

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ बाहेर काढल्यावर गरम न करता खाऊ नका. शिवाय गरम करण्यासाठी ते फ्रीजमधून थेट गॅसवर ठेवू नका. पंधरा ते वीस मिनीटे ते सामान्य तापमानाला आल्यावर गरम करा. 
  • जर तुम्हाला गव्हाची पोळी, पराठा फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर तो एका दिवसाच्या आत खाल्ला  पाहिजे. एका दिवसापेक्षा जास्त वेळ गव्हापासून बनवलेली पोळी अथवा पराठा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक मुल्यै खराब होतात. ज्यामुळे तुम्हाला पोटांच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. 
  • डाळ आणि कडधान्यांची उसळ जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली असेल तर ती देखील दोन दिवसांच्या आत खावी. कारण दोन दिवसानंतर डाळ आणि भाज्यांमध्ये गॅस निर्माण होतो ज्यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्या होऊ शकतात.
  • फ्रीजमध्ये जर तुम्ही शिळा भात ठेवला असेल तर तो कमीत कमी दोन दिवसांच्या आत संपवा. कारण  त्यानंतर तो भात खाणं तुमच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. 
  • कापलेली  अथवा चिरलेली फळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ती काही तासांमध्ये संपवा. कारण फळ कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे लवकर खराब होते. पपई, सफरचंद तर फ्रीजमध्ये जास्त काळ मुळीच स्टोअर करू नये. एका दिवसाच्या आत चिरलेली फळं खाणं हाच यावर एक योग्य उपाय आहे.
  • जर तुम्हाला फ्रीजमध्टे ठेवलेले अन्नपदार्थ, फळं आणि भाज्या जास्त काळ फ्रेश राहाव्या असं वाटत  असेल तर कच्च्या फळ अथवा भाज्यांसोबत शिजवलेल्या भाज्या, दूध असे पदार्थ ठेवू नका. कारण कच्च्या फळ आणि भाज्यांवरील जंतू तुमच्या शिजलेल्या पदार्थांना दूषित करू शकतात. 
  • फ्रीजमध्ये फळं आणि भाज्या देखील एका ठराविक काळासाठीच स्टोअर करून ठेवा. कारण प्रत्येक फळ आणि भाजीचा टिकण्याचा एक ठराविक कालावधी असतो. त्यानंतर असे पदार्थ खराब होतात आणि इतर पदार्थ अथवा वस्तूंना दूषित करतात. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित

भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवण्यासाठी सोप्या टिप्स

सुकामेवा जास्त दिवस टिकण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स

20 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT