वेब विश्वात सक्रीय असलेल्या प्राइम फ्लिक्सने आता चित्रपट प्रस्तुतीमध्ये पदार्पण केलं आहे. ‘तत्ताड’ या चित्रपटाची प्राइम फ्लिक्सद्वारे निर्मिती करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी 2020ला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाद्वारे एका वादकाची कथा पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. पेंडिंग लव्ह, भाडखाऊ, ठरकीस्तान, घोस्ट लीला अशा वेब सीरिजची निर्मिती प्राइम प्लिक्सनं केली आहे. या वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही लाभला आहे. त्यामुळे आता एक पाऊल पुढे जात प्राइम फ्लिक्स चित्रपट निर्मिती क्षेत्रात दाखल होत आहे. मराठी चित्रपट हा सध्याचा ‘बझ वर्ड’ आहे. अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहेत, अनेक चित्रपट राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजत आहेत. अशा उत्तमोत्तम चित्रपटांना प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याचं काम प्राइम फ्लिक्सद्वारे केलं जाणार आहे.
(वाचा : सनी लियोनीचा बोल्ड अवतार, व्हिडीओ पाहून चाहत्यांना लागलं वेड)
अतिशय आगळंवेगळं नाव असलेला ‘तत्ताड’ हा प्राइम फ्लिक्स प्रस्तुत करत असलेला पहिला चित्रपट ठरणार आहे. 21 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यामुळे वेगळं नाव असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात आता प्राइम फ्लिक्सकडून हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार असल्याने हा दुग्धशर्करा योगच ठरणार आहे.
(वाचा :VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल)
टीझरमुळे सिनेमाबाबत उत्सुकता
सध्या मराठी सिनेसृष्टीत विविध विषय हाताळले जात असून या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 13 फेब्रुवारी रोजी ‘तत्ताड’ या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं होतं. तत्ताड चित्रपटाच्या टीझर पोस्टरमध्ये गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर हाती क्लॅरोनेट असलेला वादक पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी वादक असण्याची शक्यता आहे. मात्र, लक्षवेधी पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एण्टरटेन्मेंटच्या जीवन जाधव, प्रितम म्हेत्रे आणि डीके चेतन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमित माने चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रोहित नागभिडे, ऐश्वर्य मालगावे यांनी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, तर संजय नवगिरे, राहुल बेलापूरकर यांनी गीतलेखन केले आहे.
(वाचा :‘थलायवी’चा फर्स्ट लुक रिलीज, कंगना रणौत सोशल मीडियावर ट्रोल)
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade