लाईफस्टाईल

२०१९ हे नववर्ष सगळ्यांसाठी प्रगतीचं

Jyotish Bhaskar  |  Dec 31, 2018
२०१९ हे नववर्ष सगळ्यांसाठी प्रगतीचं

हेडींग वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. मात्र ही आश्चर्याची बाब नसून खरं आहे. हो. २०१९ हे येणारं वर्ष सर्वांसाठी प्रगतीचं असणार आहे. या सर्वांमध्ये तुम्हीही असू शकता, जर या वर्षात आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य? या दोन प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचे असेल तर सविस्तर वाचा.

नववर्ष म्हणजे नवी स्वप्नं, नवी उद्दिष्ट्यं, नवी ध्येयं आणि ती साध्य करण्यासाठी नवा हर्ष, नवा उल्हास, नवी ऊर्जा यांनी आपण भारलेले असतो. असं प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला होतं. प्रत्येक नवीन वर्षी आपण नवीन काहीतरी ठरवतो आणि ते साध्य करण्यासाठी वर्षभर परिश्रम घेतो. अनेकदा ते साध्यही होतं तर काही वेळेला साध्य होत नाही,असं सुरुच राहतं. कदाचित यालाच आयुष्य असं म्हणतात.

ज्योतिषशास्त्रानुसार आपले आयुष्य हे ग्रहांनुसार चालत असते. एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा ‘सध्या माझे ग्रह चांगले आहेत’ किंवा वाईट गोष्ट घडल्यास ‘सध्या माझे ग्रह चांगले नाहीत’ असं आपण सहज बोलून जातो. एखाद्या कालखंडात आपले ग्रह चांगले आहेत की वाईट? हे आधीच जाणून घेतले तर कित्येक गोष्टी आपण चांगल्या घडवून शकतो किंवा वाईट गोष्टींपासून स्वत:चा बचाव करु शकतो. २०१९ या नव्या वर्षात सर्वजण नक्कीच प्रगती करु शकतील. त्यासाठी तुमची मदत करेल ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र हे दिशादर्शक शास्त्र आहे. आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आपण काय केले पाहिजे, काय केले नाही पाहिजे, याविषयी मार्गदर्शनाचे काम ज्योतिषशास्त्र करतं. ज्योतिषशास्त्र जे महान तपस्वीमुनींनी कठोर परिश्रम आणि अभ्यासाने समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी हजारो वर्षांपूर्वी निर्मिलेलं आहे. जे आजच्या काळातही परिणामकारक आहे. ज्योतिषशास्त्र म्हणजे आपल्या पूर्वजांनी, आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला अनमोल असा वारसा आहे.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

स्त्री – पुरुष, व्यावसायिक – नोकरदार, तरुण – तरुणी, विवाहित – अविवाहित, विद्यार्थी – नोकरीसाठी धडपडणारे अशा सर्वांसाठीच २०१९ हे नववर्ष प्रगतीशील ठरणार आहे. जे आपलं स्वप्न असेल, जी ध्येयं, उद्दिष्ट्य आपण स्वत:साठी येणा-या वर्षभरामध्ये ठरवलेंली असतील ती ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण नक्की पूर्ण करु शकता. मात्र त्याआधी गरज आहे, नववर्षाच्या संकल्पाची! स्वत:साठी, परिवारासाठी काहीतरी ठरविण्याची. आपण स्वप्न बघत असू तरच ती पूर्ण होऊ शकतात. आता काहीतरी करायचे म्हणजे काय करायचे? एक फार सुंदर विचार आहे, की “भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या राबवा म्हणजे यश तुमचंच आहे.’ मात्र बेभान होऊन परिश्रम करीत असतांना आपले ग्रहमान काय आहेत? आपल्यासाठी काय अनुकूल व काय प्रतिकूल आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ज्योतिषशास्त्र नक्कीच मार्गदर्शन करु शकतं.

राशीनुसार हे वर्ष आपल्यासाठी कसं राहीलं हे स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक राशीचं सविस्तर वार्षिक राशी भविष्य घेऊन येत आहोत. जे आपल्याला नववर्षाचा संकल्प करण्यास, नवी उद्दिष्ट्यं ठरवण्यात, नववर्षातील आपली दिशा दरवण्यास उपयुक्त पडेल.

चला तर मग नववर्षाचा नवसंकल्प करुया.. सारे मिळून प्रगती करुया..!

नववर्षाच्या आपणांस पुनश्च मन:पूर्वक शुभेच्छा!

Read More From लाईफस्टाईल