आरोग्य

Weight Loss Tips: 3 टिप्स करतील लग्नापूर्वी तुमचे वजन कमी

Dipali Naphade  |  Sep 27, 2021
3-top-fast-weight-loss-tips

आपल्या लग्नात सर्वांनी आपल्याकडेच पाहावं आणि आपण सर्वात सुंदर दिसावं असं प्रत्येक नवरीला वाटतं. डागविरहीत त्वचा, डिझाईनर कपडे आणि सुंदर दागिने हे सर्व तेव्हाच अधिक सुंदर दिसतं, जेव्हा तुम्हीदेखील फिट असाल. आजकाल जंक फूड, बदलती जीवनशैली आणि सतत बसून काम यामुळे शरीरात वाढणारी चरबी हे एक चिंतेचे कारण झाले आहे. वजन वाढू लागते त्याप्रमाणे आपल्या शरीराचा आकारही बेढब होत जातो. पण लग्नासाठी आपल्याला आपला लुक हा परफेक्ट हवा असतो. तुमचेदेखील लग्न लवकरच होणार असेल आणि तुम्हाला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर 3 सोप्या टिप्स नक्की तुम्ही वापरू शकता. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण या बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या तरीही तुम्ही खूपच कमी वेळात तुमचे वजन कमी करू शकता. काय आहेत या सोप्या टिप्स जाणून घेऊया. 

पोश्चर ठेवा नीट (Posture) 

केवळ वजन कमी केल्यामुळेच तुमचे शरीर आकारात येणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या शरीराचे पोश्चर व्यवस्थित ठेवता आले पाहिजे. शरीराचे पोश्चर व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या बसण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे. तुम्ही नियमित व्यवस्थित बसलात आणि चाललात तर तुम्ही उंच, बारीक आणि ग्रेसफुल दिसू शकता. लग्नात बारीक दिसण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायलाच हव्यात. तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुम्ही नेहमी पायावर पाय ठेऊन क्रॉस बसावे. यामुळे तुम्ही स्ट्रेट दिसू शकता. तसंच तुम्हाला योग्य चालीसाठी डोक्यावर पुस्तक घेऊन चालण्याचा सराव करायला हवा. यामुळे तुमची चालदेखील योग्य होते आणि शरीराला एक आकार मिळण्यास मदत होते. 

नेहमी सरळ बसा ज्यामुळे तुमची उंची दिसते. उभे राहिल्यानंतरही तुमची पाठ सरळ ठेवा आणि पोक काढू नका. यामुळे तुम्ही उंच दिसू शकता. तुम्ही ज्या दिवशी डोक्यावरील पुस्तक न पाडता चालणं शिकाल त्यादिवशी तुमच्या शरीराचे पोश्चर नीट झाले आहे असं समजा. दिवसातून तुम्ही 10 – 15 मिनिट्स या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे. 

व्यायाम करा (Exercise)

रोजची घाई असते त्यामुळे सहसा व्यायाम करणे टाळलं जातं. मात्र तुम्ही रोज सकाळी उठून किमान अर्धा तास तर जलद चाला. कोणत्याही बागेत अथवा तुमच्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये तुम्ही चाला. त्यानंतर सकाळच्या उन्हात किमान 15 मिनिट्स बसा आणि विटामिन डी तुमच्या शरीराला मिळू द्या. इतकंच नाही तर तुम्ही घरातल्या घरातदेखील हलका फुलका व्यायाम करायला विसरू नका. जमलं तर तुम्ही दोरीच्या उड्यांचा व्यायाम करा. व्यायाम करताना शरीरामधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे शरीरात जमलेली चरबी ही घामाद्वारे शरीराच्या बाहेर निघून जाते. तसंच घरातील लहान मोठी कामंदेखील तुम्ही करावीत, जेणेकरून तुमच्या कॅलरी तुम्ही जाळू शकता. विशेषतः घरातील साफसफाई अथवा कपडे धुणे. यामुळे शरीर अधिक अॅक्टिव्ह राहते. चालताना अथवा इमारतीत चढउतार करताना लिफ्टऐवजी तुम्ही शिड्यांची मदत घ्या. आसपास जायचे असेल तर कोणत्याही वाहनापेक्षा चाला. सकाळी पायी चालण्याचे फायदे अनेक आहेत. यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत मिळते. सूर्यनमस्कार केवळ 10 मिनिट्स करूनही तुम्ही फायदा मिळवू शकता. 

वेडिंग डाएट (Wedding Diet)

होणाऱ्या नवरीच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः योग्य वेळी जेवण्याची सवय लाऊन घ्यायला हवी. तसंच तुम्हाला लहान लहान मील्स (small meals) दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यायला हवेत. प्लेटमध्ये कमीत कमी खाणे आणि जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करून घ्यायला हवा. तसंच साखर, रिफाईंड ऑईल आणि कार्ब्सचे प्रमाणे तुम्हाला जेवणातून कमी करायला हवे. जितके जमेल तितके गरम पाणी प्यावे. गरम पाणी पिण्याचे फायदे होतात. तुमची भूक शांत करून मेटाबॉलिजम वाढविण्यास याची मदत मिळते. तुम्ही मांसाहारी असल्यास, डाएटमध्ये लाल मांसाऐवजी चिकन, मासे आणि टोफूचा समावेश करून घ्या. दर दोन दिवसांनी नारळ पाणी प्या. यामुळे तुमचे वजन कमी होईलच त्याशिवाय चेहऱ्यावर चमकदेखील येईल. 

वर सांगितलेल्या सर्व हेल्थ टिप्सवर तुम्ही नक्की काम करा आणि तुमचे वजन कमी करण्यास यामुळे मदत मिळेल आणि तुम्ही तुमच्या लग्नात योग्य आकारात आणि नक्कीच सुंदर दिसाल!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य