त्वचा टवटवीत आणि चांगली दिसायची असेल तर त्वचेची काळजी घेणे फारच गरजेचे असते. चेहऱ्यासाठी तुम्ही फेशिअल मिस्टचा उपयोग करण्याचा विचार करत असाल तर चांगल्या दर्जाचे फेशिअल मिस्ट तुम्ही वापरायला हवे. त्वचेच्या प्रकारानुसार फेशिअल मिस्ट निवडणे गरजेचे असते. फेशिअल मिस्ट म्हणजे काय? आणि तुमच्यासाठी फेशिअल मिस्ट हवे असेल तर आम्ही तुमच्यासाठी 5 बेस्ट फेशिअल मिस्ट शोधले आहे. हे फेशिअल मिस्ट तुमच्या त्वचेला ग्लो देऊन तुमच्या त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत करेल.
मास्कमुळे पिंपल्सचा होतोय त्रास, तर अशी घ्या काळजी
फेस मिस्ट म्हणजे काय?
freepik
फेस मिस्ट हा त्वचेचा स्प्रे असून त्याचा उपयोग त्वचा टवटवीत दिसण्यासाठी केला जातो. फेस मिस्ट हे पातळ असते. त्यामध्ये वेगवेगळ्या फेशिअल ऑईल्सचा वापर केला जातो. त्वचेच्या वेगवेगळ्या तक्रारीनुसार यामध्ये घटक घातले जातात. फेशिअल मिस्ट हे चेहरा धुतल्यानंतर किंवा प्रवासात असताना पटकन फ्रेश दिसण्यासाठी चेहऱ्यावर स्प्रे करण्यात येते. फेस मिस्टमध्ये गुलाबपाणी, लेमन स्प्रे, ऑरेंज स्प्रे असे प्रकार मिळतात.
डार्क सर्कल्स नको असतील तर आय मेकअप करताना घ्या ही काळजी
तुम्ही नक्की ट्राय करायला हवे 5 फेस मिस्ट
आम्ही तुमच्यासाठी फेस मिस्ट निवडले आहेत ते तुमच्या त्वचेनुसार तुम्ही निवडू शकता.
Vitamin C Energising Face Mist (100ml)
बॉडी मिस्टमध्ये व्हिटॅमिन C शोधत असाल तर तुमच्यासाठी बॉडी शॉपचे हे फेशिअल मिस्ट एकदम परफेक्ट आहे. हा स्प्रे लाईट असून त्याचा वापर केल्यानंतर चेहऱ्यावर एक छान चमक येते. व्हिटॅमिन C चे मिस्ट कोणालाही चालू शकते. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त याचा वापर करु शकता.
अशी घ्याल त्वचेची काळजी तर त्वचा कायम दिसेल तुकतुकीत
Facial Tonic Mist Pure Rosewater
गुलाबपाणी हे चेहऱ्यासाठी फारच चांगले आहे. गुलाबपाणी चेहऱ्याला लावण्याचा विचार करत असाल तर फॉरेस्ट इन्सेशिअलचे हे फेसमिस्ट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुमची त्वचा कोरडी असेल किंवा तेलकट असेल तुम्ही हे फेस मिस्ट आरामात वापरु शकता.
Chia seeds Hydro mist
चिआ सीड्सचे फायदे पाहता अनेक जण आहारात चिआ सीड्सचा उपयोग केला जातो. चिआर सीड्सचा उपयोग ब्युटी ट्रिटमेंट्समध्येही केला जातो. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुमच्यासाठी चिआ सीड्सचा उपयोग हा फार फायदेशीर ठरेल. याच्या नित्य उपयोगाने तुमची त्वचा सुंदर दिसू लागते.
SUKIN HYDRATING MIST TONER
गुलाबपाणी आणि कॅमोमाईल ऑईल असे कॉम्बिनेशन असलेला हा फेस मिस्ट त्वचा मॉईश्चराईज करुन हायड्रेट करण्याचे काम करतो. चेहरा धुतल्यानंतर किंवा रात्री झोपताना तुम्ही हे मिस्ट लावू शकता. तुम्हाला याचा फायदा नक्की मिळेल.
SUN FLUID Tender Coconut Water with Turmeric & Basil Leaf SPF
जर तुम्हाला नारळ पाण्याचे घटक हवे असतील त्याचा टेंडरनेस चेहऱ्यावर यावा असे वाटत असेल तर तुम्ही हळद आणि कोकोनट वॉटर असलेले फेस मिस्ट वापरु शकता. यामुळे तुमच्या त्वचेवर तजेला येईल.
फेस मिस्ट वापरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या फेशिअल मिस्टचा उपयोग करु शकता.
Read More From Skin Care Products
चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम | Best Cream For Pigmentation In Marathi
Trupti Paradkar
उन्हाळ्यात वापरा नैसर्गिक सनस्क्रिन, मिळवा फायदे
Vaidehi Raje