फॅशन

घरी कोणाचं लग्न आहे का,लग्नासाठी 5 बेस्ट वेडिंग ड्रेस

Leenal Gawade  |  Aug 21, 2021
लग्नासाठी आऊटफिट

घरात किंवा परिचयात एखादे लग्न असेल तर त्या लग्नासाठी खरेदी करण्याची मजा काही औरच असते. तुमच्याही घरी कोणाचे लग्न असेल आणि त्यासाठी तुम्हाला खास तयार व्हायचे असेल तर असे काही पॅटर्न निवडा जे तुम्हाला सहज घालता येतील आणि ट्रेंडीसुद्धा दिसतील. सध्याचा फॅशन ट्रेंड पाहता काही खास स्टाईल या प्रकर्षाने आपल्याला दिसतात. त्यापैकी नेमका कोणता प्रकार हा कम्फर्टेबल आहे आणि वेगळा आहे ते आता आपण जाणून घेऊया.

DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी करा 31 सोप्या हेअरस्टाईल्स (Simple Hairstyle In Marathi)

गरारा सूट

सध्या गरारा पँटस या चांगल्याच ट्रेंडमध्ये आहेत. खूप व्हरायटीमध्ये अशा गरारा पँटस तुम्हाला मिळतील. शॉर्ट किंवा नी लेंथ पर्यंतचा भरलेला टॉप आणि घेरदार गरारा पँटस असा हा पर्याय दिसायला इतका सुंदर दिसतो की, त्यामुळे नक्कीच तुम्ही काही इव्हेंट्समध्ये खूप छान उठून दिसता. भरलेला टॉप असे या ड्रेसची खासियत असल्यामुळे तुम्हाला एखाद्या लग्नात हा ड्रेस खूपच परफेक्ट दिसतो. गरारा सूट्समध्येही सध्या वेगवेगळ्या स्टाईल पाहायला मिळतात. यामध्ये तुम्हाला केमिसोल टॉप, त्यावर जॅकेट किंवा कुडत्यासारख्या टॉप असे अनेक पर्याय पाहायला मिळतात. जर तुम्हाला रेडिमेड पर्याय आवडला नसेल तर तुम्हाला असे ड्रेस शिवूनही घेता येईल. यासाठी तुम्हाला जॉर्जेट किंवा फ्लोई असे मटेरिअल लागतील

पेपलम टॉप विथ शरारा

पेपलम टॉप हे दिसायला खूपच क्युट असतात. या टॉपमध्ये चेस्ट लाईन खाली एक घेर असतो. त्यामुळेच हे टॉप दिसायला खूप सुंदर दिसतात. हे टॉप लहान आणि मोठ्या अशा दोन्ही लांबीमध्ये मिळतात. अशा टॉपखाली तुम्हाला शरारा आणि गरारा पँटस मिळतात. हे ड्रेस दिसायला क्युट आणि स्टायलिश दिसतात. या ड्रेसवर तुम्ही हेव्ही इयरिंग्ज किंवा बांगड्या घालून तुमचा लुक पूर्ण करु शकता. पेपलम टॉप हे हल्ली वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मिळतात. यामध्ये तुम्हाला ट्रान्सफरंट असा पर्याय देखील मिळतो. त्यामुळे ते अधिक सुंदर दिसतात.

विंग्स ड्रेस

जर तु्म्हाला लेहंगा असा पर्याय हवा असेल तर तुम्हाला हल्ली त्यामध्येही व्हरायटी पाहायला मिळते.  विंग्ज ड्रेस म्हणजे ओढणी ऐवजी तुम्हाला स्लिव्हजऐवजी त्या ठिकाणी विंग्ज लावलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला ओढणी लावण्याची काहीही गरज नसते. विंग्ज या ब्लाऊज किंवा स्लिव्हज ला लावलेल्या असतात. त्यामुळे हा ड्रेस नक्कीच वेगळा दिसतो.  विंग्ज ड्रेस हे वेगवेगळ्या पद्धतीचे मिळतात. 

रेडिमेड साडी

साडी हा पर्याय कधीच जुना आणि आऊटडेटेड फॅशन होऊ शकत नाही.हल्ली वेगेवेगळ्या पद्धतीच्या रेडिमेड साड्या मिळतात. या साड्या फॅन्सी असल्यामुळे त्या खूपच सुंदर दिसतात. यासाज्या तुम्हाला 5 हजारांपासून मिळतात. ज्या दिसायला फारच स्टायलिश असतात. त्यामुळे अशा साड्याही तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही.

लग्नसराईत नवा ट्रेंड ‘हटके’ फ्लोरल ज्वेलरीचा

लेहंगा चोळी

लग्नासाठी लेहंगा चोळी हा पर्याय आता काही नवा राहिलेला नाही. पण लेहंगा-चोळी हा पर्याय अगदी कुठेही मिळणारा आहे. लेहंगा चोळीमध्ये आता बरीच व्हरायची पाहायला मिळते. तुम्ही हा पर्याय नक्की ट्राय करायला हवा जर तुमचे बजेटमध्ये आणि वेगळा लेहंगा हवा असेल तर तुम्हाला हल्ली लेहंग्यामध्ये जॅकेट असा प्रकार पाहायला मिळते. 

आता तुम्हालाही लग्नात काहीतरी वेगळे काहीतरी घालायची इच्छा असेल तर तुम्ही हे काही पर्याय ट्राय करु शकता. 

नववधूसाठी परफेक्ट आहेत हे स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’ (Footwear For Bride In Marathi)

Read More From फॅशन