बऱ्याचदा पायाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे काही जणांना खूपच लाजिरवाणं होतं. पण तुम्हाला माहीत आहे का? पायाला नक्की दुर्गंधी का येते? तुम्हाला कदाचित वाटत असेल की, पायाला येणाऱ्या घामामुळेच पायाला दुर्गंधी येत असेल. पण हे जरी खरं असलं तरीही घामामध्ये जेव्हा बॅक्टेरिया येऊ लागतात तेव्हाच जास्त प्रमाणात दुर्गंधी पसरायला लागते. घामामध्ये अमीनो अॅसिड आणि प्रोटीन असतं जे बॅक्टेरियाचं एक प्रकारचं जेवण असतं. घामाला खरं तर कोणत्याही प्रकारचा वास नसतो. पण त्यामध्ये होणाऱ्या बॅक्टेरियाला वास असतो. घामामध्ये असणारे बॅक्टेरिया दुर्गंधी निर्माण करत असतात. पण कारण काहीही असलं तरीही घामाच्या दुर्गंधीमुळे लाजिरवाणं व्हायला होतं हे नक्की. त्यातही जर पायातून जास्त दुर्गंधी येत असेल तर अजून त्रास होतो. जाणून घेऊया यापासून नक्की कशी सुटका मिळवता येईल. आाम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही पायाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता.
1.शुद्ध व्हिनेगर
व्हिनेगरचा वापर केवळ स्वयंपाकघरात होतो असा नाही. तर तुमचे पाय स्वच्छ करण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. तुम्ही एका टबमध्ये व्हिनेगर घालून तुमचे पाय त्यामध्ये भिजवून ठेवले तर त्याच्या आजूबाजूला अॅसिडिक वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे पायामध्ये बॅक्टेरिया निर्माण होत नाहीत.
Step 1: एका टबमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये अर्धा कप व्हिनेगर घाला
Step 2: त्याच टबमध्ये आपले पाय साधारण 10-15 मिनिटांपर्यंत ठेऊन द्या
Step 3: आता त्यातून आपले पाय बाहेर काढा आणि मग साबणाने पाय धुऊन घ्या आणि मग टॉवेलने स्वच्छ करा
2. बेकिंग सोडा
जेव्हा तुम्हाला पाय स्वच्छ करायचे असतात तेव्हा बेकिंग सोड्यासारखा चांगला पर्याय नाही. तुमच्या पायावरील बॅक्टेरिया बेकिंग सोड्यामुळे मरतातच शिवाय, डेड स्किन काढून टाकण्यासही मदत होते आणि पायाची त्वचा बेकिंग सोड्यामुळे मऊ आणि मुलायम होते. तुम्हाला तुमच्या पायांमधून चांगला सुगंध यायला हवा असल्यास, यामध्ये तुम्ही लिंबूदेखील मिसळू शकता.
Step 1: एका टबमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यामध्ये ¼ कप बेकिंग सोडा मिसळा
Step 2: पाण्यामध्ये बेकिंग सोडा विरघळण्याची वाट पाहा आणि मग त्यामध्ये एक मोठा चमचा लिंबाचा रस मिसळा
Step 3: हे मिश्रण तुम्ही तुमच्या पायावर घाला आणि 15-20 मिनिट्स तसाच राहू द्या
Step 4: आता पाय टबामधून काढून टॉवेलने सुकवा
3. ब्लॅक टी (Black Tea)
टॅनिक अॅसिडयुक्त ब्लॅक टी पायांचा दुर्गंधीपासून लगेच सुटका मिळवून देतो. बॅक्टेरिया संपुष्टात आणून तुमच्या पायाच्या त्वचेला श्वास घेण्यासाठी याची चांगली मदत होते.
Step 1: आपल्या टबमध्ये 4 कप गरम पाणी घाला
Step 2: यामध्ये ब्लॅक टी च्या 3-4 बॅग टाका आणि 10 मिनिट्स तसंच राहू द्या
Step 3: या मिश्रणात नंतर 20 मिनिट्स तुमचे पाय ठेवा
Step 4: आता आपले पाय बाहेर काढून त्यावर लिक्विड सोप (soap) ने स्क्रब करा आणि नंतर धुऊन सुकवा
4. खसचे तेल (lavender oil)
खसच्या सुगंधी वासाने शरीराला खूपच बरं वाटतं आणि शरीरातील थकवा निघून जातो. त्यामुळे तुमच्या पायासाठीसुद्धा याचा खूपच चांगला उपयोग होतो.
Step 1: एका टबमध्ये पाणी गरम करून घ्या. अगदी भाजेल इतकं गरम नको आणि त्यामध्ये खसच्या तेलाचे काही थेंब मिसळा
Step 2: आता यात तुमचे पाय 15-20 मिनिट्स बुडवून ठेवा
Step 3: पायांमधून पाणी पूर्णपणे टॉवेलने सुकवून घ्या आणि मग त्यावर कोल्ड क्रिम अथवा मॉईस्चराईजर लावा
5. सैंधव
सैंधव हे सर्वांनाच माहीत असतं. पण त्याचा पायाची दुर्गंधी घालवण्यासाठी फायदा होतो हे कोणालाच माहीत नसेल. तुमच्या पायाला भेग्या पडल्या असतील तर त्यावरही सैंधव लाभदायक आहे.
Step 1: एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे सैंधव घाला
Step 2: आता त्यामध्ये तुमचे पाय घालून 15-20 मिनिट्स तसेच राहा
Step 3: त्यातून पाय काढल्यावर नीट टॉवेलने सुकवा आणि मग काही वेळांसाठी मोजे घालून राहा
फोटो सौजन्य – Shutterstock
हेदेखील वाचा –
उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी
नखांची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स
पायाच्या सौंदर्यासाठी पेडीक्युअरच्या ‘8’ सोप्या स्टेप्स