मेष- सर्जनशीलतेला वाव मिळेल
कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये सर्जनशीलतेला खूप महत्त्व असतं. सर्जनशीलता नहमी मनाला आवडणारी व कार्याला नवीन दिशा देणारी असते. आज आपल्या कल्पतेला व सर्जनशीलतेला वाव मिळणार आहे. त्यातून आपल्या कार्याला नवीन दिशा प्राप्त होऊ शकते. कार्यात नाविन्यता साधता येऊ शकते. मात्र हे करीत असताना छोटे नुकसान होण्याचीही संभावना आहे. भविष्यात मोठा लाभ मिळणार असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलेले कधीही चांगलं. कारण भविष्यात मोठा लाभ मिळणार असेल तर ते नुकसान नसून अधिक लाभासाठी केलेली गुंतवणूक ठरेल. अधिकारी वर्गाच्या हातात एखादे काम अडकून पडलेले असेल तर तेही आज पूर्ण होऊ शकते. त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करायला हरकत नाही.
कुंभ- नाविन्य जपणारा दिवस
कुंभ राशीचे लोक हे मूळातच बौद्धिक दृष्ट्या प्रगल्भ असतात. त्यात त्यांना नाविन्याचीही आवड असते. कल्पना शक्तीला वाव मिळाल्यास, नाविन्य जपता आल्यास त्यांना अधिक आनंद प्राप्त होत असतो. याची अनुभूती आज आपल्याला मिळू शकते. कारण आज आपल्या कल्पक व सर्जनशील वृत्तीला प्रोत्साहन मिळून नाविन्यता जपता येईल व कार्यातही प्रगती होईल. कुटुंबात आज सामंजस्य दाखवावे लागेल. कोणताही निर्णय धैर्याने घ्या त्याचे स्वागतच होईल. आज नवीन ओळखीही होऊ शकतात. त्यातून भविष्यात लाभ होऊ शकतो.
मीन- आत्मबल कमी होईल
प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी कधी परिश्रम करुनही उचित लाभ होत नसल्यास किंवा काम पूर्ण होत नसल्यास आत्मबळ कमी होण्याचा धोका निर्माण होतो. हे आज आपल्यासोबत आज होऊ शकतं. आज काम पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. धैर्याने प्रयत्न करीत राहा. विद्यार्थ्यांचे आज अभ्यासात मन रमणार नाही. ते अभ्यास टाळ्याचा प्रयत्न करतील. एखाद्याविषयी गैरसमजही होण्याचा धोका आहे. कोणाविषयी ठराविक मत बनवितांना खूप विचार करा किंवा मतच बनवू नका. हेच तुमच्या फायद्याचे राहिल.
वृषभ- प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा
आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो मात्र यश मिळत नसल्याने ती अर्धवट सोडून देतो. नंतर लक्षात येतं की अजून थोडे प्रयत्न केले असते तर कदाचित काम पूर्ण झाले असतं. अशी पश्चातापाची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आज प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. हातात घेतलेलं एखादं अपूर्ण काम पूर्ण करण्यावर भर द्या. तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. महत्त्वपूर्ण कामासाठी प्रयत्न वाढवा. अति आत्मविश्वास घातक असतो म्हणून त्याला वेळीच आवर घाला. आज शक्यतोवर वाहने सावकाश चालवा. तातडीने कुठे पोहचायचे असेल तर वेळेच्या थोडं आधी निघा.
मिथुन- खर्चावर लक्ष ठेवा
बऱ्याचदा आपल्याला काही अनावश्यक खर्च करावे लागत असतात. आपण जितकं कमवतो तितकं खर्च करण्याचे प्रयोजन आपोआप तयार होत असतं. अनेकदा इच्छा नसतानाही खर्च करावा लागतो. पण खर्च करीत असताना आपल उत्पन्न किती बघायला हवं. हेच शिकविणारा आजचा दिवस आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ आज बसवावा लागेल. अनावश्यक खर्च शक्यतोवर टाळावा लागेल. आज कार्यात व्यस्त राहण्याचा तुमचा दिवस आहे. वाहन मात्र सावकाश चालवा. घाई असेल तर थोडं वेळेच्या आधी निघा. खर्चाकडे लक्ष ठेवावं लागेल. कार्यात व्यस्त राहाल. वाहने सावकाश चालवा. एखाद्या कामाला जास्त वेळही लागू शकतो.
कर्क- कल्पकेतला वाव मिळेल
कल्पकता वापरुन केलेला नाविन्यपूर्ण कामांचा आविष्कार नेहमीच स्वागतार्ह असतो. अशा कामांचे सर्वत्र कौतुक होत असते. यातून आपल्या कार्याला नवीन दिशा प्राप्त होत असते. मनाला आनंद मिळत असतो. हे सर्व आज आपल्या सोबत घडू शकतं. कारण आज आपली कल्पक आणि सर्जनशील कार्यात प्रगती होणार आहे. फक्त आत्मविश्वासपूर्वक चिकाटी कायम ठेवा. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. प्रयत्न केल्यास आज यश तुमचे आहे. आज तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत. मात्र प्रवासात नुकसान होण्याची शक्यता आहे. आज प्रवास टाळलेलाच बरा. संततीकडून सुर्वाता कानी पडतील. घरात आनंदी आनंद राहिल.
सिंह- आत्मविश्वास वाढेल
प्रत्येक दिवस हा चांगल्या वाईट अनुभवांसह आपल्याला काहीतरी शिकविणारा असतो. कधी आत्मविश्वास वाढविणाऱ्या तर कधी आत्मविश्वास कमी करणा-या घटना आपल्या सोबत घडत असतात. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. तुम्ही दैवावर विश्वास ठेवत असाल तर आज तुम्हाला मनशांतीचाही अनुभव प्राप्त होऊ शकतो. ईश्वराचे आशीर्वाद आपल्यासोबत असल्याच्या भावनेने आज अंतकरण दाटून येईल. त्यामुळे दैवावरचा, ईश्वरावाराचा विश्वास अजूनच दृढ होईल. एखाद्याबद्दल गैरसमजही होऊ शकतो. सावध राहा.
कन्या- समजुदारपणा दाखवाल
जीवन जगत असताना समजूतदारपणा दाखवावाच लागतो. कारण प्रत्येकवेळी घाईने निर्णय घेऊन चालत नाही. विशेषतः कुटुंबातील निर्णय घेत असताना समजूतदारपणा दाखवून सर्वांचा विचार करुन विचारपुर्वक निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येकवेळी आपण का हे करावं? असा विचार मनात डोकावू शकतो. मात्र कुणाला तरी करावंच लागणार आहे, मग आपण का नाही? ही बाब लक्षात घेऊन आज कुटुंबातील कोणताही निर्णय धैर्याने समजुतदारपणा दाखवून तुम्ही घ्याल. काही कामांमध्ये अडचणी येण्याचे योग आहेत. शक्यतोवर बाहेरील जंक फूड खाणे टाळावे. तुमच्या प्रकृतीला ते मानवणार नाहीत. समजुतदारपणा दाखविल्याने ओळखीच्या व्यक्तींबरोबर सामंजस्य वाढेल.
तुळ- आनंददायी दिवस
जीवन अनमोल आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे. आनंदाचा असा एकही क्षण आपल्या हातून निसटून जायला नको. आपल्याला जीवनाचं हे तत्त्व समजविणारा आजचा दिवस आहे. आज जोडीदारासोबत प्रवासाचे योग आहेत. आज आनंदी आनंद असेल. आज कलाकारांना यश मिळू शकतं. भुतकाळात घडून गेलेल्या आनंददायी घटना आज पुन्हा नव्याने आनंद प्रदान करु शकतात. या घटनांचा स्विकार करण्यासाठी तयार राहा. प्रियकरांसाठीही आजचा दिवस लाभदायक असून प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे. थोडक्यात आजचा दिवस आनंददायी असून त्याचा परिपूर्ण लाभ घ्या.
वृश्चिक- अतिआत्मविश्वास घातक
जीवन आत्मविश्वासाने जगणं ही एक चांगली बाब आहे किंबहूना ती एक आवश्यक गोष्टही आहे. मात्र अतिआत्मविश्वास घातक असतो. यामुळे व्यक्ती एकतर गाफील राहते किंवा स्वतःबद्दल गैरसमज करवून घेते. हेच आपल्याला शिकविणारा आजचा दिवस आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. मात्र त्याचा अतिरेक व्हायला नको. त्याला वेळीच आवर घाला नाहीतर नुकसान होऊ शकते. कारण आज सासरच्या मंडळींशी वाद होण्याचे योग आहेत. त्यामुळे वादापासूनही दूर राहा. विद्यार्थी आज संपूर्ण लक्ष अभ्यासात देतील. वादापासून दूर राहिल्यास आज घरात शांतीचे वातावरण असेल.
धनु- वडिलांकडून मार्गदर्शन मिळेल
आपण कितीही ज्ञानी असलो तरी जेष्ठांच्या अनुभवापुढे आपले ज्ञान प्रत्येकवेळी तोकडेच असते. नेहमी जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कार्यरत राहिले पाहिजे. अशाने निर्णय चुकत नाहीत किंवा चुकले तरी आपण एकटे पडत नाही. आज तुम्हाला वडीलांकडून अनमोल असे मार्गदर्शन मिळेल. त्याचा योग्य लाभ करवून घ्या. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून चिकाटीने काम करा. हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. स्त्रियांना मात्र आज मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मनस्थिती भंग करणारी गोष्ट शक्यतोवर टाळ्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी आवडतात त्यात मन रमविण्याचा प्रयत्न करा.
मकर- परिश्रम वाढवा
केलेले प्रयत्न, घेतलेले परिश्रम हे कधीच वाया जात नाहीत. कधी कधी त्यांचं उचित असं फळ मिळतंच. म्हणून ते करायला कधीही चुकू नये. याचं महत्त्व आपल्याला पटवून देणारा आजचा दिवस आहे. एखादं महत्त्वपूर्ण कार्य अपूर्ण राहिलेलं असेल तर त्याला पूर्ण कराण्याची आज तुम्ही प्रयत्न करण्यामध्ये कमी पडायला नको. प्रयत्न व परिश्रम वाढविल्याच नक्कीच लाभ मिळू शकतो. सरकारी कर्मचारी आज गोंधळात पडू शकतात. म्हणून आपलं चित्त विचलित होऊ देऊ नका. हातून चुकीचं काम होऊ शकतं. व्यापार व व्यवसायासाठी आजचा दिवस सुखद आहे. एखाद्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. सावध राहा.
Read More From भविष्य
100+ नागपचंमी शुभेच्छा | Nag Panchami Wishes In Marathi | Nag Panchami Shubhechha In Marathi
Trupti Paradkar
ऑगस्ट महिन्यात चार ग्रह करणार राशी परिवर्तन, कोणत्या राशींना होणार फायदा
Vaidehi Raje