ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या शाही लग्नाची चर्चा अजून काही महिने सुरू राहीलच. ईशाच्या लग्नासाठी अंबानीचं मुंंबईतील निवासस्थान अँटीलिया अगदी स्वप्नवत सजवण्यात आलं होतं. ईशाने या शाही लग्नाला अजूनच खास बनवलं ते आपल्या आईच्या लग्नातील साडीपासून तयार केलेली ओढणी घेऊन. या शाही लग्नाला संपूर्ण बॉलीवूड. क्रीडा क्षेत्रातील दिग्गज, राजकारणी, उद्योगपती आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वं आली होती. एवढंच नाहीतर या शाही लग्नात किंग खान शाहरूख, आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांनी आलेल्या पाहूण्यांना जेवण वाढत खास पाहूणाचार ही केला. या लग्नासाठी हे तिघेही जण मुलीकडच्या म्हणजे ईशा अंबानीच्या बाजूने सामील झाले होते. सगळं कसं अगदी स्वप्नवत नाही का?
एवढंच नाहीतर या शाही लग्न सोहळ्यानंतर अंबानींनी नवविवाहीत ईशा-आनंदसाठी खास ग्रँड रिसेप्शनसुद्धा दिलं. ग्रँड रिसेप्शन यासाठी कारण हे रिसेप्शन मुंबईतल्या बीकेसीमधील जिओ गार्डन्स येथे ठेवण्यात आलं होतं. या रिसेप्शनसाठीही फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी आवर्जून हजेरी लावली.
या रिसेप्शनमध्ये अंबानींनी लग्नात राहिलेली एक हौसही पूर्ण केली. द ग्रेट ए.आर.रहमान यांचा खास परफॉर्मन्स.. अहा…खास कॉन्सर्ट यावेळी ठेवण्यात आलं होतं. या कॉन्सर्टमध्ये चित्रपट रंग दे बसंतीमधील खलबलीपासून ते गुरू चित्रपटातील दम दर दम या आपल्या खास गाण्यांनी ए.आर.रहमान यांनी ही संध्याकाळ अविस्मरणीय केली. आपल्या नेहमीच्या काळ्या पेहरावाला बाजूला ठेवून रहमान यांनी सिल्व्हर कलरचं जॅकेट घातलं होतं. ते ही या चमचमत्या रिसेप्शनला अगदी शोभेसं होतं.
गायक हर्षदीप कौर आणि अरमान मलिक यांनी ही रिसेप्शनमध्ये परफॉर्म केलं