बॉलीवूड

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढामधील पहिले गाणे झाले रिलीज

Vaidehi Raje  |  Apr 28, 2022
laal singh chaddha

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आमिर खानचे चित्रपट कायम वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे असतात. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानच्या चित्रपटाची प्रेक्षकही अगदी आतुरतेने वाट बघत असतात. आता लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक अपडेट आले आहे. काही दिवसांपूर्वी आमिरने सांगितले होते की तो 28 एप्रिलला एक ‘कहाणी’ सांगणार आहे.एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली होती, जी ऐकून लोक गोंधळले होते की, ही नेमकी काय कहाणी असेल? आता या चित्रपटाचे ‘कहानी’ हे पहिले गाणे रिलीज करून आमिरने चाहत्यांना पडलेले कोडे सोडवले आहे. 

गाण्यात व्हिडिओच नाही 

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील ‘कहानी’ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. नेहेमी प्रेक्षकांना गाणे रिलीज झाले की त्याचा व्हिडीओ कसा असेल याची उत्सुकता असते कारण गाण्याच्या व्हिडिओमधून चित्रपट कसा असू शकेल याचा एक बऱ्यापैकी अंदाज लावता येतो. पण नुकत्याच रिलीझ झालेल्या कहानी गाण्यात मात्र कोणताही व्हिडीओ नाही, तर फक्त ऑडिओ ऐकायला मिळतो आहे आणि या गाण्याचे शब्द स्क्रीनवर लिहिलेले दिसत आहेत. चित्रपटाचे हे गाणे सुमारे साडेतीन मिनिटांचे आहे. हे गाणे म्युझिक कंपनी टी-सीरीजने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज केले आहे. यासोबतच आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसनेही कहाणी गाणे रिलीज झाल्याची माहिती दिली आहे.

अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताला प्रीतमचे संगीत 

लाल सिंह चड्ढा मधील कहानी हे गाणे प्रीतमने संगीतबद्ध केले आहे आणि ते शब्दबद्ध अमिताभ भट्टाचार्य यांनी केले  आहे. रेडिओ 93.5 एफएमवर त्याचे कहानी गाणे रिलीज करताना आमिर म्हणाला की, “’या गाण्यात मला आणि करीनाला पाहण्यापेक्षा हे गाणे ऐकण्यास अधिक पात्र आहे. लाल सिंह चड्ढाच्या टीमने ज्या संगीतात आपले मन आणि आत्मा ओतला आहे त्या संगीताला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटातील गाणी हा चित्रपटाचा आत्मा आहे, यावर माझा विश्वास आहे.” आमिर खान प्रॉडक्शनच्या सोशल मीडिया हँडलने हे गाणे शेअर करताना लिहिले: “#KyaHaiKahani साठी तुम्ही व्यक्त केलेले सर्व अंदाज आवडले 🙂 आता कहानी उघड करण्याची वेळ आली आहे! #LaalSinghCaddha मधील एक अतिशय खास गाणे #Kahani शेअर करताना आम्ही excited आहोत. आम्हाला आशा आहे की प्रीतम, अमिताभ, आणि मोहनची जादू तुमच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य आणेल!” 

हॉलिवूडच्या फॉरेस्ट गम्पचा रिमेक 

आमिर खानचा हा चित्रपट हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खान पहिल्यांदाच शीख व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री करीना कपूर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  आमिर आणि करीना यांची मोठ्या पडद्यावर एकत्र काम करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी हे दोघे ‘3 इडियट्स’ आणि ‘तलाश’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. 

आमिर खानला मोठ्या पडद्यावर दिसल्याला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता वाटते आहे. या चित्रपटात करीना कपूर खान बरोबर आणि नागा चैतन्य देखील आहे. या चित्रपटाद्वारे नागा चैतन्य हिंदीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे आणि आमिर खान प्रॉडक्शन, वायकॉम18 स्टुडिओ आणि पॅरामाउंट पिक्चर्सद्वारे निर्मित केला आहे. 

लाल सिंह चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड