बॉलीवूड

‘मिस्टर इंडिया’ मधलं प्रसिद्ध गाणं होणार ‘या’ अभिनेत्रीवर चित्रित

Aaditi Datar  |  Feb 24, 2020
‘मिस्टर इंडिया’ मधलं प्रसिद्ध गाणं होणार ‘या’ अभिनेत्रीवर चित्रित

बॉलीवूडची चांदनी अभिनेत्री श्रीदेवी हिला जाऊन दोन वर्ष झाली. पण आजही तिच्याभोवतीचं वलय कमी झालेलं नाही. सतत काही ना काही कारणाने श्रीदेवीचा विषय चर्चिला जातोच. आता श्रीदेवी पुन्हा चर्चेत येण्याचं निमित्त आहे मि. इंडियाचा लवकरच येणारा रिमेक. तसंच एका आगामी हिंदी चित्रपटात तिच्या गाण्याचं होणारं पुर्नचित्रीकरण.

अभिनेत्री श्रीदेवीचे टॉप 10 चित्रपट, ज्यामुळे ती झाली सुपरस्टार

या अभिनेत्रीवर होणार चित्रित

अभिनेत्री अदिती गोवित्रीकरच्या आगामी हिंदी चित्रपटात श्रीदेवीच्या मि. इंडिया चित्रपटातलं एक गाणं चित्रित करण्यात येणार आहे. अदिती फक्त एक अभिनेत्री नाही तर एक सायकोलॉजिस्ट सुद्धा आहे आणि तिने अनेक बॉलीवूड सेलेब्रिजना डिप्रेशनसारख्या मानसिक आजारातून बाहेर पडण्यास मदत केली आहे. तसंच तिने आत्तापर्यंत दे दना दन, पहेली, भेजा फ्राय आणि मराठी चित्रपट “स्माईल प्लिज” मध्ये विविध भूमिका केल्या आहेत. आता तिला संधी मिळाली आहे ती श्रीदेवीच्या गाण्यात दिसण्याची.

अशा अभिनेत्री ज्यांनी केलं विवाहित माणसांवर प्रेम

अदिती गोवित्रीकरच्या आगामी ‘कोई जाने ना’ या कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर स्टारर चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. याच चित्रपटात श्रीदेवीचं गाणं दिसणार आहे. या गाण्याबद्दल अदितीने सांगितलं की,चित्रपटाची सुरूवात माझ्यावर चित्रित केलेल्या मिस्टर इंडियातील “जिंदगी की यही रीत है” या गाण्यापासून होते. या चित्रपटात अदिती दोन सुंदर मुलांच्या आईची भूमिका करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमीन हाजी हे करत असून त्यांची आणि माझी मैत्री खूप आधीपासून आहे आणि त्यांच्यासोबत एका चित्रपटात काम करण्याचे अनुभव खूप छान होता”.

एवढंच नाहीतर ‘कोई जाने ना’ या चित्रपटाव्यतिरिक्त अभिनेत्री अदिती गोवित्रीकर किकू शारदा आणि हितेन तेजवानी सोबतच्या ग्रे स्टोरीज” या वेबफिल्ममध्येही दिसणार आहे.

अमीन हाजीचा पहिला प्रयत्न

अमीन हाजी यांचा हा पहिला दिग्दर्शक म्हणून सिनेमा आहे. हाजी यांनी अभिनेता म्हणून आमिर खानच्या लगानमध्ये बागाची भूमिका केली होती आणि वीर सिंग ही मंगल पांडे चित्रपटात केली होती. तसंच शाहरूख खानचा स्वदेस आणि मिमोह चक्रवर्तीचा हाँटेड-3D चित्रपटात लिहीला होता. कोई जाने ना या चित्रपटात पहिल्यांदाच कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर ही जोडी दिसणार आहे. हा चित्रपट एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. त्यामुळे त्याच्या कथेबाबत उत्सुकता आहे.

कार्तिकसोबत बोल्ड सीन्स देण्यास माझी काहीच हरकत नाही

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

Read More From बॉलीवूड