मनोरंजन

दिया मिर्झाने शेअर केला गंगा नदीचा व्हिडिओ, दाखवला लॉकडाऊन इफेक्ट

Trupti Paradkar  |  Apr 27, 2020
दिया मिर्झाने शेअर केला गंगा नदीचा व्हिडिओ, दाखवला लॉकडाऊन इफेक्ट

कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. सुरक्षेसाठी सध्या हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अजूनही कोरोनाचा धोका कमी झालेला नसला तरी निसर्गावर या लॉकडाऊनचा नक्कीच चांगला परिणाम झालेला दिसून येत आहे. कारण लॉकडाऊनमुळे सार्वजनिक ठिकाणी सध्या माणसं गोळा होत नाही आहेत, कारखाने आणि इतर निसर्गाला प्रदूषित करणाऱ्या गोष्टी बंद करण्यात आलेल्या आहेत. ज्यामुळे सध्या प्रदूषणाला चांगलाच आळा बसला आहे. मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषण कमी झाल्यामुळे चक्क गंगा नदीच्या पात्रातून अगदी शुद्ध आणि काचेसारखं पाणी वाहू लागलं आहे. दिया मिर्झाला गंगा नदीचं हे शुद्ध पाणी पाहून फारच आनंद झाला आहे. म्हणूनच तिने तिच्या ट्विटर अकउंटवर ऋषीकेषमधील वाहत्या गंगेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांच्या सकारात्मक कंमेट्सदेखील मिळाल्या आहेत. 

दिया मिर्झाने शेअर केला गंगेचा व्हिडिओ

अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने ऋषीकेषमधील गंगा नदी दाखवली आहे. या गंगेच्या पात्रातील पाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ झालेलं आहे. हे पाणी इतकं निर्मळ झालं आहे की चक्क गंगा नदीतील तळदेखील यातून दिसत आहे. स्वच्छ काचेसारखं पाण्यामुळे तिच्या पात्रातील दगडगोटेही दिसत आहेत.  त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करत दियाने म्हटलं आहे की, “लॉकडाऊनमुळे नैसर्गिक स्त्रोताचं संवर्धन होत आहे. माणसाच्या आरोग्य आणि प्रगतीसाठी स्वच्छ पाणी फार गरजेचं आहे” वास्तविक आपण आतापर्यंत गंगेचं आणि इतर नद्यांचं इतकं निर्मळ आणि शुद्ध रूप याआधी न पाहिल्यामुळे त्यावर विश्नास ठेवणं नक्कीच कठीण जाऊ शकतं. मात्र मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे एवढा मोठा चमत्कार निसर्गात घडू लागला आहे. दियाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.काही जणांना यावर विश्वासच बसत नाही आहे. काहींनी तर यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की “दरवर्षी निसर्गासाठी असा  एक महिना लॉकडाऊन  असायला हवा” तर काहींनी “निसर्गाला माहीत आहे की माणसासोबत कसं संतुलन राखायचं”अशा प्रतिरक्रिया यावर दिल्या आहेत.

दिया मिर्झाचा बॉलीवूड प्रवास

दिया मिर्झाने रहना है तेरे दिल मै या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 2000 साली तिने मिस आशिया पॅसिफिक हा किताब जिंकला होता. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमधून दियाने काम केलं आहे. मात्र काही वर्षांपासून दिया चित्रपटसृष्टीपासून दूरावली होती. मात्र मागील वर्षीपासून पुन्हा ती काही वेबसिरिजमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. दिया मिर्झा तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत सामाजिक संदेश चाहत्यांना देत असते. आता दियाने शेअर केलेल्या व्हिडिओमधून तिचे निसर्गावरील प्रेम दिसून येत आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

अधिक वाचा –

या कारणामुळे तोडावा लागणार आहे ‘गंगुबाई काठियावाडी’चा सेट

अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री

सहानुभूती मिळवण्यासाठी रश्मी ‘वूमन कार्ड’ खेळत असल्याचा अरहान खानचा आरोप

Read More From मनोरंजन