कप साँग गर्ल अशी ओळख निर्माण करून बॉलीवूड आणि वेबसिरीजमध्ये आपला जम बसवलेली मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) ही सगळ्यांच्याच ओळखीची झाली आहे. सोशल मीडियावर मिथिला पालकरचे अनेक चाहते आहेत. आपल्या सुंदर दिसण्याने आणि सरळ साध्या अभिनयाने मिथिलाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. पण मिथिला केवळ अभिनयातच नाही, तर आपल्या फॅशनसाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर मिथिलाचे फोटो पाहून तुम्हाला याचा नक्कीच अंदाज येऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी सामान्य मुलींपासून कोणीही मिथिलासारखी फॅशन कॅरी करू शकतं आणि हेच मिथिलाचेही वैशिष्ट्य आहे. अगदी सहज सोपी आणि तितकीच आकर्षक अशी फॅशन नेहमी मिथिला करते. मिथिला पालकरची ही फॅशन तुम्हीही करू शकता आणि अधिक आकर्षक दिसू शकता. मिथिलाचे असेच काही लुक आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हीही एखाद्या कार्यक्रमासाठी अथवा कोणत्याही घरातील वेगळ्या सणासाठी मिथिलासारखी फॅशन स्टाईल नक्कीच करू शकता. पारंपरिक असो अथवा आधुनिक या दोन्ही लुकमध्ये मिथिला कमाल दिसते. तिचे हे लुक तुम्ही अगदी सहज रिक्रिएट करू शकता.
जॉर्जेट अनारकली सूट
मिथिला पालकर अनेक वेबसिरीजमधून आपल्या समोर आली आहे. तर मिथिलाचा फॅशन सेन्स पाहिला तर पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही लुकमध्ये मिथिलाचे सौंदर्य खुलून येते. मिथिलाने घातलेला हा जॉर्जेट अनारकली सूट तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला नक्कीच घालू शकता. गडद निळ्या रंगाच्या या अनारकलीवर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. डिझाईनर फ्लोरल बूटी वर्क अनाकरलीमध्ये मिथिला खूपच सुंदर दिसत आहेत. तुमचाही बांधा मिथिलासारखा असेल तर तुम्हाला ही स्टाईल कॅरी करायला काहीच हरकत नाही. तसंच या अनारकलीसह सोन्याचे कानातले आणि लहानशी टिकली लावली की, तुमचा साधा आणि आकर्षक एथनिक लुक तयार आहे.
पांढऱ्या टॉपसह लाँग पँट
पार्टी लुकसाठी मिथिलाची ही फॅशन परफेक्ट पर्याय आहे. या फोटोमध्ये मिथिला खूपच स्टायलिश दिसून येत आहे. प्लंजिंग नेकलाईन व्हाईट टॉपसह मिथिलाने लाँग पँट घातली आहे. मॅचिंग आऊटफिटसह तिने घातलेली गोल्डन चैन अतिशय सुंदर दिसते आहे. वेव्ही आणि कुरळ्या केसांमुळे तिचा लुक अधिक उठावदार दिसतो आहे. तुम्हीही असा लुक एखाद्या पार्टीसाठी नक्कीच करू शकता.
‘रंग माझा वेगळा’ मधील सासू हर्षदा खानविलकरची हटके साडी स्टाईल
पारंपरिक लेहंगा लुक
कोणत्याही मैत्रिणीच्या लग्नाच्या सोहळ्याला जर तुम्हाला साडी नेसणं जमणार नसेल तर तुम्ही मिथिलासारखा असा लेहंगा लुक नक्कीच करू शकता. संगीत अथवा हळदीच्या कार्यक्रमाला आजकाल साडीपेक्षा असा पारंपरिक लेहंगा लुक अधिक उठावदार दिसतो. पण त्याबरोबर अति मेकअपची गरज नाही. अगदी मिनिमल मेकअप आणि साध्या दागिन्यांचा वापर करून तुम्ही हा लुक करू शकता. यासह जाड दागिन्यांची अजिबातच गरज भासत नाही. उलट जितके कमी दागिने तितका तुमचा हा लुक अधिक आकर्षक दिसेल. मिथिलाने तर या लेहंग्यावर केवळ कानातले घातले आहेत. त्यामुळे तिचा लुक अधिक खुलून दिसत आहे. तसंच लेहंगा कॅरी करणंही तिला सोपं जात आहे. साडी सांभाळण्यापेक्षा हा लुक अधिक सोयीस्कर ठरतो.
वेस्टर्न आऊटफिट
मिथिला पालकरच्या वॉर्डरोबमध्ये तुम्हाला पारंपरिक कपड्यांसह वेस्टर्न आऊटफिटचेही मस्त कलेक्शन दिसून येईल. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहता तुम्हाला हा अंदाज नक्कीच येईल. गडद गोल्डन रंगाच्या या कपड्यांमध्ये मिथिला अप्रतिम पोझ देताना दिसून येत आहे. आपल्या या लुकसह लाईट मेकअप आणि अगदी पातळ चैन आणि कानातले घालून मिथिलाने हा लुक पूर्ण केला आहे. तुम्हीही अशा स्वरूपाचा लुक एखाद्या कॉर्पोरेट पार्टीसाठी अथवा मित्रमैत्रिणींच्या पार्टीसाठी नक्कीच करू शकता.
स्ट्राईप्स साड्यांची चलती, करा फॅशन आणि दिसा आकर्षक
सलवार कुरता
मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची सुरूवात करणाऱ्या मिथिला पालकरचा फॅशन सेन्स खूपच चांगला आहे. मुळात ती आपला लुक खूपच साधा ठेवते. त्यामुळेच तिचे अनेक चाहते आहेत. गुलाबी रंगाच्या या सलवार आणि कुरत्यामध्येही ती तितकीच खुलून दिसत आहे. यासह घातलेले स्ट्रेट इअररिंग्ज अधिक सुंदर दिसत आहेत. यावर केस मोकळे ठेऊन अत्यंत लाईट मेकअप केल्यास, तुमच्या घरातील पूजा अथवा कोणत्याही ठिकाणी पूजेसारख्या कार्यक्रमाला तुम्हाला हा लुक करून जाता येऊ शकते.
अमृता खानविलकरचे हे मेकअप लुक नक्की करा ट्राय
कॅज्युअल आऊटफिट
फॅशन सेन्ससह वेगवेगळे प्रयोग करणं मिथिलाला नक्कीच आवडत असावं. कॅज्युअल फॅशन करताना मिथिलाने पांढरा शर्ट हा क्रॉप टॉप आणि स्ट्रेट कट स्कर्टसह टीमअप केला आहे. आपल्या या कुल लुकसह तिने चेन स्ट्रॅप बॅग कॅरी केली असून मोकळे केस आणि या ट्रेंडी आऊटफिटमध्ये मिथिला अत्यंत सुंदर दिसत आहे. तुम्हीही बाहेर जाताना हा लुक नक्कीच करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक