मनोरंजन

ही मराठी सेलिब्रिटी जोडी अडकली लग्नबंधनात, फोटो व्हायरल

Leenal Gawade  |  May 24, 2022
क वरुन मुलांची नावे

सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक सेलिब्सनी या काळात आपली लग्न उरकून घेतली आहेत. तर काहींनी नव्याने नात्याचा खुलासा करुन चाहत्यांना धक्का देखील दिला आहे. काहीच दिवसांपूर्वी ऋता दुर्गुळे हिने प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली. आता आणखी एका सेलिब्रिटीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील अभिनेत्रीने लग्न केले असून तिने तिचे काही फोटोज शेअर केले आहे. दरम्यान, या अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी साखरपुडा केला होता. ही अभिनेत्री अन्य कोणी नसून या मालिकेत कालिंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा रायबागी आहे. 

असा पार पडला विवाहसोहळा

सेलिब्रिटींच्या लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते. ते कसे लग्न करतात? काय घालतात? यावर सगळ्यांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे सगळ्यात आधी पूजाने लग्न कसे केले ते जाणून घेऊया. पूजाचे लग्न हे फार कौटुंबिक आणि खास लोकांच्या उपस्थित झाल्याचे दिसत आहे. तिने मेंदी, हळदीचे फोटो शेअर केले आहेत. पण तिचे लग्नाचे फोटोज अजून शेअर झालेले नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे लग्न झालेले आहे. आणि लवकरच तिचे काही फोटोज चाहत्यांना नक्कीच दिसतील. पूजाचा नवरा हा देखील अभिनेता असून त्याने मालिकेत काम केले आहे. त्यामुळे ही जोडी सेलिब जोडी आहे असे म्हणायला हवे.

साखरपुड्याचे फोटो केले शेअर

पूजा सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह दिसते. तिने आपल्या सोशल मीडियावर तिच्या कामाशी निगडीत अनेक फोटो शेअर केले आहेत. काहीच महिन्यापूर्वी तिचा साखरपुडा झाला या साखरपुड्याचे फोटोही तिने शेअर केले आहे. या साखरपुड्याच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिने हाफ साडीप्रमाणे साडी नेसली आहे. जी तिला शोभून दिसत आहे. साखरपुड्याच्या फोटोमध्ये ही जोडी खूपच छान उठून दिसत आहे. त्यांच्या साखरपुडयाचा एक टिझरही आला आहे. ज्यामध्ये ही दोघे क्युट दिसत आहेत.

ऋताच्या लग्नाची प्रतिक्षा

मराठी सेलिब्रिटींमध्ये ऋता दुर्गुळे हे नाव फारच नावाजलेले आहे. तिच्या लग्नाची प्रतिक्षा खूप जणांना होती. तिचा काहीच दिवसांपूर्वी विवाहसोहळा पार पडला.ऋताच्या साखरपुड्यानंतरच तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. ही दोघं लग्न कधी कऱणार असा प्रश्न पडला होता. पण तिचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले आणि अनेकांच्या जीवात जीव आला. ऋताचे लग्नही खूपच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार प़डल्याचे दिसत आहे. तिचा लग्नातील लुक हा फ्रेश असा होता. मिनिमल मेकअपवर तिने अधिक भर दिलेला यामध्ये दिसून येतो. यासोबतच आणखी एका प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याचे लग्नही झाले ते म्हणजे विराजस कुलकर्णी- शिवानी रांगोळे यांचे लग्न झाले. त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे राणादा- अंजली पाठक म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा पार पडला. आता त्यांच्या लग्नाचा दिवस कधी उजाडेल याची अनेकांना प्रतिक्षा आहे. 

सध्या आणखी एका सेलिब्रिटी जोडीचे लग्न झाल्यामुळे सगळीकडे याची चर्चा होताना दिसत आहे. 

Read More From मनोरंजन