मनोरंजन

…तर आत्महत्या करेन, प्रसिद्ध अभिनेत्री झाली सोशल मीडियावर व्यक्त

Dipali Naphade  |  Jul 3, 2020
…तर आत्महत्या करेन, प्रसिद्ध अभिनेत्री झाली सोशल मीडियावर व्यक्त

सध्या अनेक जण नैराश्याने घेरले गेले आहेत. त्यातही सेलिब्रिटींची संख्या यामध्ये आता जास्त दिसून येत आहे. ‘खतरों के खिलाडी’ मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री राणी चटर्जीनेदेखील आपले नैराश्याबाबत मनोगत आता सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. राणी चटर्जीला तिच्या फेसबुक अकाऊंटवर अतिशय वाईट पद्धतीने एक माणूस त्रास देत असल्याचे सांगत आता आपण या त्रासाला कंटाळलो आहोत असंही तिने सांगितलं आहे. याचा परिणाम आपण नैराश्यात गेलो असून कोणत्याही क्षणी आत्महत्या करू शकतो असा इशाराही तिने दिला आहे. 

इश्कबाज’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण

राणी चटर्जीने व्यक्त केल्या भावना

सोशल मीडिया हे सध्या उपयुक्त साधन समजले जाते. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीनेही आता आपल्या पर्सनल अकाऊंटवरून आपल्याला होत असलेल्या त्रासाला वाचा फोडली आहे. राणीने आपल्या मनातील गोष्ट शेअर करत लिहिले, ‘#depression मी खूप जास्त निराश झाले आहे. नेहमीच सकारात्मक राहण्यासाठी आणि मनाने कणखर राहण्यासाठी मी सांगत आले आहे. पण आता मलाच ते जमत नाहीये. एक माणूस माहीत नाही गेल्या कित्येक वर्षापासून माझ्याबाबत घाणेरड्या गोष्टी फेसबुकवर लिहित आहे. बऱ्याचदा मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत बऱ्याच लोकांशी बोलले पण प्रत्येकाने दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. पण मीदेखील माणूस  आहे. मी जाडी आहे,  मी म्हातारी आहे पण हा माणूस माझ्याबद्दल इतक्या घाण गोष्टी लिहितो आणि इतर लोकही मला या लिहिलेल्या गोष्टी शेअर करतात. आता माझ्याकडून याकडे दुर्लक्ष होत नाहीये. गेल्या कित्येक वर्षापासून या गोष्टीमुळे मी हैराण झाले आहे. सतत माझ्या मनावर यामुळे तणाव असतो. याच्यामुळे मला जीव द्यावा लागेल. यामुळे मी खूपच नैराश्यात गेले आहे. Mumbai Police यांना माझी विनंती आहे, जर मी स्वतःला काही करून घेतले तर त्यासाठी जबाबदार धनंजय सिंंह ही व्यक्ती असेल. मी सायबर सेलमध्येही याबाबत तक्रार याआधी केली आहे. त्याने माझं नाव लिहिलं नसलं तरीही ते माझ्यासाठीच लिहिलं आहे मला माहीत आहे. मी प्रचंड हताश झाले असून आता माझ्यात हिंमत नाही. यामुळे मी नक्कीच आता आत्महत्या करेन. कारण आता हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. #suicide’ 

अभिनेत्री अमृता रावचा गणेशोत्सवाबाबत ‘हा’ सल्ला पर्यावरणासाठी आहे मोलाचा

आत्महत्येला प्रवृत्त करत असल्याचा आरोप

राणी चटर्जीने त्या माणसाच्या नावासह तो आपल्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करत असल्याचा आरोपही लावला आहे. आपल्या जीवाचं जर काही बरं वाईट करून घेतलं तर त्यासाठी त्याने त्या माणसालाच जबाबदार धरावं असंही म्हटलं आहे. आतापर्यंत मनोरंजन क्षेत्राच्या अनेक बाजू समोर आल्या आहेत. या सगळ्या झगमगाटात अनेक सेलिब्रिटींना वेगवेगळ्या गोष्टींना आणि नैराश्याला सामोरं जावं लागतं. त्यासाठी बऱ्याचदा त्यांना पुढे येऊन बोलण्याशिवाय पर्यायही नसतो. त्यामुळे आता राणीने याबाबत बोलायचं ठरवलं असून आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. आता यावर मुंबई पोलीस नक्की काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच या व्यक्तीला ताब्यात घेऊन नक्की असं का करत आहे याचा जाबही विचारला जाईल का याकडेही आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता बरेच जण नैराश्याबद्दल बोलण्यासाठी पुढे येत आहेत. 

बॉलीवूडच्या ‘मास्टरजी’ सरोज खान यांचे निधन

Read More From मनोरंजन