मनोरंजन

‘रसभरी’ वेबसिरीज वर्षपूर्तीच्या निमित्ताने रश्मी आगडेकरने आठवले क्षण

Dipali Naphade  |  Jun 3, 2021
‘रसभरी’ वेबसिरीज वर्षपूर्तीच्या निमित्ताने रश्मी आगडेकरने आठवले क्षण

रश्मी आगडेकर (Rashmi Agdekar) आपल्या अभिनयच्या कौशल्याने सर्वांचे मन फारच कमी वेळात जिंकले आहे. वेब सिरीज ” देव डी डी २” व “इमॅच्युअर ” असो त्यांनी आपापल्या कामाने सिनेमा किंवा वेब सिरीजमध्ये आपले नाव खूप कमी वेळातच कमावले आहे. आयुष्मान खुरानासमवेत “अंधाधुन” चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होता. मागच्या वर्षी तिची रसभरी ही वेबसिरीज (Webseries) प्रदर्शित झाली होती. त्याच निमित्ताने रश्मीने काही स्वरा भास्ककरबरोबरच्या (Swara Bhaskar) काही आठवणी शेअर केल्या आहेत. या वेबसिरीजमधून रश्मीला खूपच प्रेम मिळाले.  इतकं प्रेम आपल्याला मिळेल अशी रश्मीने अजिबातच अपेक्षा केली नव्हती. रश्मी आगडेकर मुळात महाराष्ट्रीयन असल्याने “रसभरी” (Rasbhari) या मालिकेत तिने मेरठ सारख्या छोट्या शहरातल्या मुलीची भूमिका साकारली. 

रसभरीमधील भूमिका वेगळीच

एक वर्ष पूर्ण झालं असून आता लॉकडाऊनमध्ये याबद्दल रश्मीने काही आठवणी जागवल्या. यामध्ये तिच्यासह स्वरा भास्करने काम केले आहे. तिच्यासह काम करण्याचा अनुभवही रश्मीने शेअर केला. रश्मी म्हणाली, “मला खरंच अपेक्षा नव्हती की मला ह्या वेब सिरीज मधून एवढे प्रेम मिळेल, रसभरी वेब सिरीज एक सामान्य मुलीच्या अवती भवती फिरते जिला मोठ्या शहरातील म्हणजे वेस्टर्न लाईफ जगायची असते ज्यासाठी ती प्रयत्न करते आणि स्वतःच्या हक्कासाठी लढते. ” तिने पुढे सांगितले की, ” मी मेरठ उच्चारण योग्य होण्यासाठी खूप धडपड केली. मेहनतही घेतली. पण सुदैवाने आमच्या तयारीदरम्यान बोलीभाषा प्रशिक्षक होते आणि त्यानंतर माझे दिग्दर्शक निखिल भट आणि सह-अभिनेते आयुष्मान सक्सेना यांनी प्रत्येक दृश्यात मला खरोखर मदत केली. तसेच आम्ही वास्तविक स्थानांवर चित्रीकरण केल्यामुळे मला उत्तर प्रदेशच्या लोकांकडून बरीच माहिती आत्मसात करण्याची संधी मिळाली. या चित्रीकरणाच्या वेळी खूपच शिकायला मिळालं आणि त्यामुळेच ही भूमिका माझ्यासाठी वेगळी ठरली आहे.”

गायिका नीती मोहनने दिला गोंडस मुलाला जन्म, केले शेअर

स्वरा भास्करबरोबर केली स्क्रिन शेअर

रश्मी आगडेकरने या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री स्वरा भास्करसह स्क्रिन शेअर केली आहे. स्वराच्या कामाबद्दल मनापासून आदर आणि प्रेम आहे असं रश्माने यावेळी सांगितले.  “तसेच मला स्वराचे काम नेहमीच आवडते. आमचे एकत्र फक्त दोन सीन होते, परंतु तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. ती सगळ्यांशीच खूप प्रेमाने वागते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ती सिनची प्रॅक्टिस करायची. एकंदरीत, तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा खूपच चांगला होता ”.

Bigg Boss च्या नव्या सीझनमध्ये रिया चक्रवर्ती येणार असल्याची चर्चा

रश्मीने नुकताच अनुभवला कोविडचा त्रास

रश्मी नुकतीच कोविडच्या त्रासातून बाहेर आली आहे. याचा त्रास तिने एका दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केला आहे. या दरम्यान सकारात्मक राहणं खूपच गरजेचे आहे असंही रश्मीने सांगितलं. सध्याची स्थिती खूपच वाईट असून यावर मात करायची असेल तर आपण नेहमी सकारात्मक राहणं आणि योग्य काळजी घेणे गरजेचे आहे असं रश्मीने सांगितलं आहे. जास्तीत जास्त आराम करून योग्य तो औषधोपचार करून आपण यावर मात मिळविल्याचेही तिने सांगितले. यादरम्यान चित्रपट आणि संगीत या दोन्हीने आपल्याला खूपच आधार दिल्याचेही तिने म्हटलं आहे. दरम्यान आता रश्मीचे कोणते नवे प्रोजेक्ट येणार आहेत यासाठी तिचे चाहतेही उत्सुक आहेत.

नेहा पेंडसे आणि आकांशा शर्माची पर्यावरणाला पूरक जीवनशैली

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन