मनोरंजन

संगीता कापुरेने घरच्यांसाठी घातला खास पुरणपोळीचा घाट

Aaditi Datar  |  Apr 26, 2020
संगीता कापुरेने घरच्यांसाठी घातला खास पुरणपोळीचा घाट

कोविड 19 रोगामुळे आलेल्या जागतिक महामारीच्या काळात सोशल डिस्टन्सिंग हे आता सर्वांच्याच अंगी बाणलं आहे. बॉलीवूड आणि टेलीव्हिजन स्टार्ससुद्धा घरात आहेत आणि त्यांचा जास्तीतजास्त वेळ घरातल्या कामात घालवत आहेत. सोबतच घरच्यांसोबत वेळ घालवणे आणि आपल्या आवडत्या छंदांनाही वेळ देत आहेत. ज्यामुळे त्यांचा वेळ जास्तीत जास्त चांगला जात आहे. मुख्य म्हणजे सेलिब्रिटीज हे सर्व सोशल मीडियावर शेअर करत असल्याने आपल्याला देखील अपडेट्स मिळतच असतात. असंच ये रिश्ते है प्यार के मधील अभिनेत्री संगीता कापुरे हिने घरच्यांसाठी खास मेजवानी आयोजित केली होती.

टीव्हीवरील हिंदी मालिका ये रिश्ते है प्यार के मधील प्रसिद्ध चेहरा असलेल्या संगीता कापुरेने कोरोनातील लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबियांसाठी खास महाराष्ट्रीयन जेवणाचा घाट घातला. याबाबतचा व्हिडिओही तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात तिने घरच्यांसाठी तर पुरणपोळी बनवलीच पण स्वतःची खास रेसिपी फॅन्ससोबतही शेअर केली.

लॉकडाऊनच्या काळात संगीताही नवनवीन रेसिपीज करत असून तिने फॅन्सनाही त्यांच्या लॉकडाऊन टाईमबाबतही विचारलं

एवढंच नाहीतर घरातल्यांसोबतच संगीता कापुरेही मुक्या प्राण्यांचीही काळजी घेत आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरील कुत्रे उपाशी राहू नये म्हणून संगीता संपूर्ण काळजी घेत त्यांना खाऊ घालत आहे.

तसंच लॉकडाऊनमधल्या कंटाळवाण्या काळात मजेशीर टिकटॉक व्हिडिओजसुद्धा शेअर करत आहे.

आपल्या मालिकेतील टीमला मिस करत असल्यामुळे संगीताने त्यांच्यासोबतचे सेटवरील फोटोजही शेअर केले होते.

90 चं दशक गाजवलेल्या टीव्हीवरील अभिनेत्री

संगीता कापुरेही सध्या स्टार प्लसवरच्या ये रिश्ते है प्यार के या लोकप्रिय मालिकेत निधी राजवंशच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या या भूमिकेला फॅन्सचं भरपूर प्रेमही मिळत आहे. या मालिकेत संगीतासोबतच मराठी अभिनेत्री चैत्राली गुप्ते हीसुद्धा आहे. आशा करूया की, कोरोनाचं सावट आपल्यावरू न लवकरच हटेल आणि आपल्या आवडत्या मालिका पुन्हा एकदा सुरू होतील. ज्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांची आपल्याशी भेट होईल.

टीव्हीवरील स्टार्स… पण प्रत्यक्ष आयुष्यात राहिली प्रेमकहाणी अपूर्ण

टीव्हीवरील या जोड्यांनी केले लपूनछपून लग्न, चाहत्यांना दिला धक्का

Read More From मनोरंजन