महाराष्ट्राला लोककलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. या लोककलांमधून महाराष्ट्रात अनेक लोककलाकारांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या या लोककला आणि लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारा एक नवा कोरा शो आजपासून टेलीव्हिजनवर सुरू होत आहे. प्राचीन काळी अगदी दैनंदिन कामे जसं की दळण-कांडण, सडा-सारवण करताना अथवा वार्षिक सण-समारंभ, देवाची उपासना, सार्वजनिक उत्सव, जत्रा, गोंधळ अशा अनेक गोष्टी करताना या लोकनृत्य आणि लोकगीतांची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत या लोककलांना विशेष स्थान आहे. केवळ मनोरंजन न करता त्यातून लोकप्रबोधनही करणाऱ्या या लोककलांमुळे अनेकांचं आयुष्य घडलं. मात्र कालानूरुप आज ही लोकसंस्कृती लोप पावत चालली आहे. काळाच्या पडद्याआड हरवत चालेला हा समृद्ध वारसा पुन्हा जोपासण्यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
लोककलेमधून समाजप्रबोधन
एकदम कडक या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील संतांचे अंभग, बहिणाबाईंच्या ओव्या, आहिराणी काव्य, कोकणातील खेळे, दशावतार, विदर्भातील झाडीपट्टी, गोंधळ-जागरण, गण, गौळण, पोवाडा, लावणी अशा अनेक लोककलांचं दर्शन घडणार आहे. शिवाय लोककला सादर करण्यासाठी वापरली जाणारी विविध वाद्य आणि त्यांचं वैशिष्ठ्य प्रेक्षक पाहू शकणार आहेत. आजही अशी अनेक गाणी, नृत्य ,वाद्यवादनं आहेत जी आजच्या पिढीला माहित सुद्धा नाहीत. सहाजिकच या कार्यक्रमातून आजच्या पिढीला या लोककलेची ओळख नव्याने होणार आहे. महाराष्ट्राची लोककला ही निरुपणप्रधान आहे. त्यामुळे यातून केवळ मनोरंजन न होता एक चांगली शिकवणदेखील समाजाला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील लोककलाकार या कार्यक्रमामधून आपली लोककला सादर करणार आहेत.
आदर्श शिंदेचं ‘एकदम कडक’ निवेदन
लोकप्रिय गायक आदर्श शिंदे या शोमध्ये ‘एकदम कडक’ अशी भूमिका निभावणार आहे. कारण महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या ‘एकदम कडक’ या शोचं सूत्रसंचालन आदर्श करणार आहे. यापूर्वी आपण त्याला गायक आणि परिक्षकाच्या भूमिकेत पाहिलं आहे. मात्र आता या अगदी वेगळ्या भूमिकेतून आदर्शला पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. त्याचबरोबर विनोदवीर नंदकिशोर चौघुले, दिगंबर नाईक, भूषण कडू, तृप्ती खामकरदेखील या कार्यक्रमात आदर्शची साथ देणार आहेत. हा कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारित केला जाणार असून ‘पर्पल पॅच’ या कार्यक्रमाची निर्मिती करत आहे. या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन आशिष पाथरे करत आहेत.
अधिक वाचा
‘लकी’ सिनेमाचं टायटल ट्रॅक झालं रिलीज
‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतने या गोष्टीसाठी लावलाय ‘कानाला खडा’
मराठी प्रेक्षकांना मिळणार ‘करोडपती’ होण्याची संधी
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade