DIY लाईफ हॅक्स

दिवाळी फराळ टिकून ठेवण्यासाठी खरेदी करा एअर टाईट डबे

Leenal Gawade  |  Oct 25, 2021
दिवाळी फराळ असा करा स्टोअर

दिवाळीला आता फक्त आठवडा उरला आहे. अनेकांकडे फराळाची तयारीही सुरु झाली असेल. खूप जणांकडे फराळ हा दिवाळीला पुरेल इतका बनवला जातो. खूप जणांच्या किचनमध्ये फराळाचे मोठमोठे डबे भरले जातात. खूप वेळा फराळ हा काही दिवस कुरकुरीत राहतो.पण नंतर हळुहळू नरम पडू लागतो. चकली, करंजी, शंकरपाळे किंवा कोणतेही फराळाचे पदार्थ हे नरम पडले की, त्याची मजा निघून जाते. अशावेळी तुम्ही फराळ कसा ठेवावा हे जाणून घेणे गरजेेचे आहे. हल्ली बाजारात एअर टाईट डब्बे मिळतात. त्यामध्ये फराळ कसा स्टोअर करायचा ते जाणून घेऊया.  या शिवाय दिवाळी फराळ रेसिपीही वाचा म्हणजे तुमचा फराळ उत्तम होईल. या शिवाय दिवाळीच्या शुभेच्छा, पाडव्याच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही या सणाचा आनंद अधिक द्विगुणित करु शकता.

एअर टाईट डब्बे निवडताना

Instagram

दिवाळी म्हटली की, वसुबारस, लक्ष्मीपूजन आलेच. दिवाळी सणाची माहिती आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. या काळात पाहुण्यांना देण्यासाठी अनेक जण भरपूर फराळ केला जातो. हा फराळ स्टोअर करण्यासाठी हल्ली अनेक ब्रँडचे एअर टाईट डबे मिळतात. खूप जणांना प्लास्टिकचा डबा आणि एअर टाईट डब्बा हा सारखा असतो असे वाटते पण असे अजिबात नाही. या दोन्ही डब्यांमध्ये फरक आहेत.ते कोणते ते जाणून घेऊयात

  1.  एअर टाईट डबे हे एकदम घट्ट लागतात. त्यांच्यातून कोणताही पदार्थ बाहेर येत नाही. तर प्लास्टिकच्या डब्यांचे झाकण हे तुलनेने थोडे सैल असते. ते चटकन उघडते. 
  2. एअर टाईट डबे हे प्लास्टिकच्या डब्यांच्या तुलनेत महान असतात. या डब्यांचे प्लास्टिक हे देखील खूप चांगले आणि वेगळे असते. त्यामुळेच त्यामध्ये पदार्थ जास्त काळ टिकून ठेवण्याची शक्यता असते. 
  3.  एअर टाईट डबे निवडताना तुम्ही निवडलेला डबा एअरटाईट या प्रकारात येत आहे की नाही ते पाहा. गोलाकार असलेले डबे हे शक्यतो एअर टाईट असतात. त्यामधून कोणतेही लिक्वि़ड पदार्थ गळत नाही.त्यामुळे त्यांचे झाकण योग्य लागणे गरजेचे असते. ते लागले की पदार्थ गळत नाही. 
  4. एअर टाईट डब्यांचे प्लास्टिक हे दर्जेदार असते. त्यामुळे ते अधिक जाड असते हे डबे पटकन तुटत नाहीत किंवा वाकत नाहीत.पण साधे प्लास्टिकचे आकर्षक डबे चटकन मोडतात. त्यामुळे त्यामध्ये पदार्थ जास्त काळ टिकत नाहीत. 
  5. एअर टाईड डब्यातून फराळाचा वास बाहेर जात नाही. उलट त्यामध्ये फराळाचा गंध अधिक टिकून राहतो.

फराळ केल्यानंतर

instagram

फराळ केल्यानंतर तो नेमका कसा स्टोअर करायचा ते जाणून घेऊया 

  1. कोणताही फराळ केल्यानंतर तो थेट डब्यात भरु नका. तो काही काळ बाहेर तसाच ठेवून द्या. गरम गरम फराळ आत भरुन ठेवला की तो नरम पडण्याची शक्यता असते. 
  2. गरम गरम तेलातून काढलेल्या चकल्या किंवा करंजी थोड्या लांब लांब ठेवा एकमेकांवर ठेवल्यामुळे त्यातून तेल गळून इतर पदार्थ नरम पडण्याची शक्यता अधिक असते. 
  3. डब्यात एक पदार्थच ठेवा. खूप जणांना प्ला्स्टिकच्या पिशव्या करुन एकाच वेळी दोन ते तीन फराळ ठेवण्याची सवय असते अशामुळेही फराळाचा वास निघून जातो. तो नरम पडतो.

आता दिवाळीचा फराळ अधिक टिकवण्यासाठी नक्की वापरा एअर टाईट डब्बे

अधिक वाचा

बनवा खुसखुशीत चकली, फॉलो करा ही रेसिपी

तुमच्या आप्तेष्टांना द्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

भाऊबीजला ठेवा खास स्टेटस आणि शुभेच्छा!

Read More From DIY लाईफ हॅक्स