बॉलीवूड

अक्षय कुमारचा नवा स्टंट, बेअर ग्रिल्ससोबत करणार खतरनाक जंगलात भटकंती

Trupti Paradkar  |  Aug 31, 2020
अक्षय कुमारचा नवा स्टंट, बेअर ग्रिल्ससोबत करणार खतरनाक जंगलात भटकंती

बॉलीवूड मध्ये स्वतः स्टंट करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता अक्षय एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. अक्षय लवकरच बेअर ग्रिल्ससोबत ‘इनटू दी वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या शोमध्ये दिसणार आहे. या इंटरनॅशनल शोमध्ये अक्षय साहसवीर बेअर ग्रिल्ससोबत काही खतरनाक स्टंट करत घनदाट आणि खतरनाक जंगलात भटकंती करणार आहे. अक्षय कुमारने त्याच्या या शोचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो बेअर ग्रिल्ससोबत जंगलात भटकताना दिसत आहे. 

काय आहे या व्हिडिओमध्ये

अक्षयने शेअर केलेला हा व्हिडिओ एक मिनीटांचा असून त्यात अक्षयची धमाकेदार एंट्री दाखवण्यात आली आहे. अक्षय या शोमध्ये हॅलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत आहे. अशा हटके पद्धतीने जंगलात उतरल्यानंतर तो त्यांचा हा अॅंडवेंचर जंगल प्रवास बेअर ग्रिल्ससोबत सुरू करतो. या प्रवासात तो पाण्यावर तरंगताना, रस्शीच्या मदतीने रिव्हर क्रॉस करताना, खरतनाक जंगली जनावरांचा सामना करताना दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये एक मजेशीर गोष्टही दाखवण्यात आली आहे जी शोमध्ये पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील. बेअर ग्रिल्स या शोमध्ये अक्षयला हत्तीच्या पॉटीपासून तयार केलेली चहा पाजणार आहे. विशेष म्हणजे स्वतः बेअर ग्रिल्स अक्षयचा डोळा चुकवून ही चहा फेकून देतो आणि अक्षय मात्र मजेत पितो असं यात दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओसोबत अक्षयने शेअर केलं आहे की, “मला इनटू दी वाईल्ड विथ बेअर ग्रिल्सच्या पहिल्या काही आव्हानांचा अंदाज होता, मात्र जेव्हा मला बेअर ग्रिल्सने Elephant Poop Tea पाजली तेव्हा मात्र मी खरंच हैराण झालो. वा… काय दिवस होता.”  

कधी आणि कुठे पाहता येणार हा शो

‘इनटू दी वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’चा हा अक्षय कुमार स्पेशल एपिसोड डिस्कव्हरी वाहिनीवर 11 सप्टेंबरला प्रसारित केला जाणार आहे. वाहिनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिलेली आहे. शिवाय त्या ट्विटमध्ये त्यांनी असंही लिहीलं आहे की, आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो की, “#IntoTheWildWithBearGrylls चा हा एपिसोड वेड लावणारा आणि मजेशीर असणार आहे” यावर अक्षयने रिप्लाय देत म्हंटलं आहे की, “मी तुम्हाला वेडा वाटतो…पण वेडी माणसंच जंगलात जातात” त्यामुळे हा एपिसोड पाहणं आता नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.

अक्षय आहे या शोमध्ये सहभागी होणारा तिसरा भारतीय

अक्षय कुमार हा बॉलीवूडचा सर्वात फिट अभिनेता आहे. त्याच्या फिटनेसच्या चर्चेमुळे त्याला बॉलीवूडचा खिलाडी असंही म्हटलं जातं. अक्षय बऱ्याचदा त्याच्या चित्रपटात स्वतःच स्टंट करत असतो. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, सेटवर वेळेवर पोहचणं आणि रात्री कोणत्याही पार्टीला न जाता घरी आराम करणं हे त्याच्या फिटनेसचं रहस्य आहे. आता या शोमुळे अक्षयचा फिटनेस आणि त्याचे स्टंट प्रेश्रकांना एका वेगळ्या लेव्हलवरून पाहायला मिळणार आहेत. कारण अशा घनदाट जंगलात सफारी करणं सर्वांनाच शक्य होतं असं नाही. मगरींनी भरलेल्या नदीतून, उंच डोंगरावरून आणि खतरनाक जनावरांच्या सोबत अक्षयने केलेला हा प्रवास रोमांचक आणि थरारक तर असेलच पण त्यातून अक्षयचा फिटनेस खऱ्या अर्थाने पणाला लागणार आहे. अक्षय कुमार आधी या इंटरनॅशनल शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी सहभाग घेतला होता. अक्षय या शोमध्ये सहभागी होणारा तिसरा भारतीय आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

खतरों के खिलाडी: निया शर्मा झाली ‘मेड इन इंडिया’ची विजेती

महेश मांजरेकर यांना अंडरवर्ल्डकडून धमकी, नेमकं काय घडलं

जेव्हा बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या को – स्टारमुळे नाकारले हिट चित्रपट

Read More From बॉलीवूड