बिग बॉस

ब्रेकअपच्या चर्चा असताना आसिमच्या गर्लफ्रेंडचा ब्रायडल लुक वायरल

Leenal Gawade  |  Apr 26, 2020
ब्रेकअपच्या चर्चा असताना आसिमच्या गर्लफ्रेंडचा ब्रायडल लुक वायरल

बिग बॉस 13 घरातील स्पर्धक हिमांशी खन्ना आणि आसिम रियाज यांच्या रिलेशनशीपची चर्चा शो दरम्यान जोरदार सुरु होती. अनेकांनी त्यांचे प्रेम या शोच्या माध्यमातून पाहिले होते. पण शो संपला तशी त्यांच्या प्रेमाची कहाणीही विरळच होत गेली आणि अचानक एक दिवस बातमी आली ती या दोघांच्या ब्रेकअपची. या दोघांच्या नात्यामध्ये फूट निर्माण झाली असून हे दोघे वेगळे झाले आहेत हे आता आतापर्यंत सुरु असताना अचानक आसिमने असे काही केले आहे की, या दोघांमध्ये सगळं सुरळीत सुरु आहे असेच वाटत आहे. हिमांशी खुरानाने नुकत्या पोस्ट केलेल्या ब्रायडल फोटोमुळे आता वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात कनिका कपूरला मिळाली भलतीच प्रसिद्धी

स्वत:ला नाही थांबू शकला आसिम

Instagram

आता या दोघांचे प्रकरण पुन्हा सुरु झाले आहे असे म्हणायला  हिमांशीने पोस्ट केलेला फोटो कारणीभूत आहे. ब्रायडल लुकमधील एक फोटो हिमांशीने तिच्या पेजवर पोस्ट केला आहे. तिच्या चाहत्यांकडून या फोटोसाठी तिला भरभरुन प्रेम मिळाले. पण हिमांशीआणि आसिमच्या फॅनक्लबला तेव्हा आनंद झाला. जेव्हा असिमने हिमांशीच्या फोटोवर कमेंट केली. हिमांशीच्या या फोटोने आसिमला कमेंट करायला भाग पाडले अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत. आता हिमांशी या फोटोमध्ये खास दिसतेय कारण तिने पंजाबी नवरीचा गेटअप केला आहे. ती पंजाबी सूटमध्ये दिसत आहे. केशरी रंगाचा वर्क केलेला हा डिझायनर कुडता त्यावरील वर्क आणि तिचे दागिने तिला फारच शोभून दिसत आहे. आता आसिमने तिच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर आता सगळं काही ठीक आहे असेच दिसत आहे. 

अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री

त्या एका ट्विटमुळे झाला गोंधळ

हिमांशी आणि आसिममध्ये दुरावा आला असे सांगणारे एक ट्विट हिमांशीनेच केले होते. त्या एका ट्विटमुळे या दोघांचे नाते धोक्यात आले होते. त्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला हे अगदी नक्की झाले होते. कारण आसिमनेही अशाच प्रकारे एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, चुकी तिची होती म्हणून तुम्ही तिच्यावर रागवाल. मग ती रडायला लागेल. तुम्ही तिची समजूत काढाल. त्यानंतर सगळी चुकी की फक्त तुमची असेल. यावर आदित्य सिंहने देखील कमेंट केली होती आणि त्याला हिमांशीनेही रिप्लाय दिला होता. त्यामुळे या दोघांमध्ये कधी काय बिनसलं असेल तरी ते सगळं नीट झालं आहे असं म्हणायला हवं. 

अभिनेता इरफान खानवर दुःखाचा डोंगर, आईचे अंतिम दर्शन घेणं झाले नाही शक्य

रिकामे उद्योग

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या लिंकअपच्या आणि काहींच्या ब्रेकअपच्या चर्चा सतत समोर येत आहेत. काहीही कारण नसताना सोशल मीडियावर अनेकांचे रिलेशनशीप तुटल्याची जाहीर घोषणा केली जात आहे. तर काही जणांचे नाते जोडले जात आहेत. पण गॉसिप करणाऱ्यांना हे माहीत नाही की, वो सेलिब्रिटी है सब जानते है. प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी ते कितीतरी वेळा अशा अफवा स्वत: पसरवतात. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी त्यांना विसरु नये म्हणून त्याचे हे उद्योग सुरुच असतात. मध्यंतरी मिका- चाहतच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. पण प्रत्यक्षात त्यांनी तो सगळा घाट त्यांच्या नव्या अल्बमसाठी केला होता. हे लक्षात आल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. 

असो, आसिम आणि हिमांशीमध्ये सध्या तरी सगळं आलबेल आहे. हे आम्ही नाही त्यांचे सोशल मीडियावरील फोटो सांगत आहेत.

Read More From बिग बॉस