हिवाळा जवळ आला की लिपस्टिकप्रमाणेच लिपबामही तुमच्या बॅगेत आपोआप जातं. कारण या काळात लिपबामशिवाय तुमचं कामंच नाही होवू शकत. हिवाळ्यात फुटलेल्या आणि कोरड्या झालेल्या ओठांना सतत मऊ आणि मुलायम करण्यासाठी लिपबाम लागतोच. लिपबाम तुमच्या ओठांना हायड्रेट ठेवतं ज्यामुळे ते कोरडे पडत नाहीत आणि थंडीमुळे फुटतही नाहीत. पण या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कशासाठी लिपबाम वापरू शकता याचा कधी विचार केला आहे का? मेकअपसाठी आणि सुंदर दिसण्यासाठी लिपबाम बडे काम की चीझ है… त्यामुळे यापुढे तुमच्या बॅगेत सतत लिपबाम ठेवण्यास काहीच हरकत नाही. जाणून घ्या लिपबामचा वापर ओठांव्यतिरिक्त आणखी कसा करता येईल.
सौंदर्य खुलवण्यासाठी हे लिपबाम हॅक्स नक्की ट्राय करा
लिपबाममुळे तुमचे ओठ मऊ आणि हायड्रेट राहतात. थंडीपासून तुमच्या ओठांचे संरक्षण होते. मात्र याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही लिपबाम वापरू शकता. जाणून घ्या कसा कराल लिपबामचा पर्यायी वापर. तसंच घरीच करा लिप स्पा, फॉलो करा या सोप्या टिप्स
उत्तम हायलायटर
जर तुम्ही घराबाहेर असाल आणि तुमचं हायलायटर घरीच विसरला असाल तर काळजी करू नका. कारण तुम्ही तुमच्या लिपबामचा वापर चक्क हायलायटरप्रमाणे करू शकता. अशा वेळी तुम्हाला क्लिअर लुक हवा की चमकदार याचा जास्त विचार करत बसू नका. फक्त लिपबाम तुमच्या चिकबोन्स आणि हनुवटीवरून फिरवा. कारण लिपबाममुळे तुमच्या चेहऱ्यावरील हाय पॉईंट्स मस्त उठून दिसतील. जर तुम्ही लिपबामवर थोडी हायलायटर पावडर लावली तर तुम्हाला एक छान शिमर लुकपण मिळेल. यासाठी सर्वात सोप्या पद्धतीने बनवा होममेड शिमर लिप बाम
आय मेकअपसाठी
तुम्ही तुमचा आय मेकअप परफेक्ट करण्यासाठी लिपबाम वापरू शकता. कसं ? सोप्पं आहे… तुमच्या आयब्रोज सेट करण्यासाठी तुम्ही लिपबाम वापरू शकता. त्याचप्रमाणे आयशॅडो पावडर लावण्यापूर्वी बेस म्हणून तुम्ही लिपबामचा वापर करू शकता. पापण्यांना सेट करण्यासाठी मस्कारा लावण्याऐवडी पापण्यांना थोड लिपबाम लावून फक्त आयब्रशने सेट करा ट्रान्सफरंट मस्कारा लावल्याचा लुक तुम्हाला मिळू शकतो.
क्युटिकल्ससाठी
जर मेनिक्युअर करून तुम्हाला खूप दिवस झाले असतील आणि तुमच्या बोटांवर क्युटिकल्स जमा झाले असतील तर तुम्ही घरीच लिपबामने तुमच्या बोटांना मऊ करू शकता. क्युटिकल क्रिमप्रमाणे तुम्ही लिपबाम वापरू शकता. कारण यामुळे तुमच्या बोटांचे क्युटिकल्स नरम पडतील आणि कोरडेपणा कमी झाल्यामुळे तुमचे हात पु्न्हा मेनिक्युअर केल्याप्रमाणे सुंदर दिसू लागतील.
केस सेट करण्यासाठी
होय तुम्ही त्वचेप्रमाणेच केसांवरही लिपबाम वापरू शकता. जर तुम्ही बाहेर असाल आणि तुमच्या हेअर स्टाईलमधून छोटे छोटे केस बाहेर डोकावत असतील तर हेअर जेल, हेअर स्प्रेप्रमाणे तुम्ही लिपबामचा वापर केसांवर करू शकता. ज्यामुळे ते छान सेट होतील आणि तुमची समस्या दूर होईल. पण त्यासाठी तुमच्या बॅगेत तुमचं फेव्हरेट लिपबाम असायला हवं.
मेकअप करेक्टरप्रमाणे वापर
बऱ्याचदा बाहेर गेल्यावर तुमचं काजळ, मस्कारा, आय लायनर पसरतं आणि तुमची पंचाईत होते. अशा वेळी तुमच्याजवळ मेकअप रिमूव्हर नसलं तरी लिपबाम नक्कीच असू शकतं. पाण्याने स्वच्छ करायला गेला तर मेकअप आणखी खराब होऊ शकतो. त्यापेक्षा त्या जागी फक्त थोडं लिपबाम लावा आणि पुन्हा तुमचा मेकअप सेट करा.
कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, घ्या टॉप 20 लिप बामची यादी (Lip Balm For Dry Lips)
आता एवढ्या हॅक्स समजल्यावर यापुढे तुमच्या बॅगेत नेहमी लिपबाम ठेवायला मुळीच विसरू नका.