अमृता खानविलकर हे नाव कोणालाच नवं नाही. अगदी मराठी मालिका, चित्रपट ते हिंदी चित्रपटापर्यंत आणि रियालिटी शो मध्ये अमृताने नाव गाजवलं आहे. मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. आता अमृता नव्याने प्रेमात पडली आहे. थांबा..थांबा काहीही विचार करण्याआधी आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत. अमृता तिच्या फिटनेसबाबत नेहमीच उत्साही असल्याचं दिसून आलं आहे. आपल्या चित्रपटासाठी वजन कमी करणं असो अथवा नियमित व्यायाम असो अमृता नेहमीच आपल्या फिटनेसबाबत पोस्ट शेअर करत असते. आता अमृता पुन्हा एकदा नव्याने योगाच्या प्रेमात पडली असल्याचे दिसून येत आहे. अमृता पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर एक चमक आली आहे असंही या तिच्या नव्या फोटोंमधून दिसून येत आहे.
जूनमध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या
मानसिक शांततेसाठी महत्त्वाचे
अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या फिटनेससाठी आणि मानसिक शांततेसाठी योगा करतात. आता यामध्ये अमृताचेही नाव समाविष्ट झाले आहे. अमृताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती योगा करताना दिसून येत आहे. मानसिक शांततेसाठी हे गरजेचे आहे असंही कॅप्शनमध्ये अमृताने म्हटलं आहे. अमृता या फोटोंमध्ये अत्यंत फिट आणि सुंदर दिसत आहे. त्यामुळे या फोटोला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाल्याचे दिसून येत आहे. या मनोरंजन क्षेत्रात राहायचं तर अत्यंत फिट राहायला पाहिजे आणि मुळात सध्याच्या कोरोना काळात तर आपल्यालाच आपली काळजी नीट घ्यायला हवी. त्यामुळे आता अमृताचे चाहते तिला असं फिट पाहून नक्कीच आनंदी असतील. याशिवाय तिच्या या फिटनेस प्रेमामुळे अनेकांना प्रेरणाही मिळेल असं वाटत आहे. योगा नेहमीच मानसिक शांती आणि शरीराला योग्य फिटनेस देते. त्यामुळे अनेकांनी अमृताकडून प्रेरणा घेऊन योगा करायला आता काहीच हरकत नाही.
सई- आदित्यचे दिवस बदलले, चाळीत राहून करणार उत्कर्ष
योगा सरावाचे फोटो व्हायरल
अमृताने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेले योगा सरावाचे तिचे फोटो अत्यंत मनमोहक आणि सुंदर आहेत. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तसंच कोणतीच गोष्ट सोपी नसते. तर यामुळे तुम्ही अधिक भक्कम होता असंही एका कॅप्शनमध्ये अमृताने म्हटलं आहे. अमृताच्या या फोटोंनी नक्कीच तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अमृताने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमधून काम केले आहे. गेले एक दशक रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. दिवसेंदिवस अमृता अधिक फिट आणि सुंदर दिसू लागली आहे असाही एक सूर आता दिसून येत आहे. अमृता नेहमीच सकारात्मक पोस्ट शेअर करत असते. त्यामुळेच तिचे असंख्य चाहते आणि फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर अमृताचा नवरा हिमांशूदेखील योगा फॉलो करतो. या दोघांमधील केमिस्ट्री पण नेहमीच सोशल मीडियावर दिसून येते. आता अमृताचा नवा प्रोजेक्ट कोणता असणार आणि अमृता कोणत्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे याचीही तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. पण अजूनही अमृताने याबाबत मात्र कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. पण लवकरच काहीतरी नवं ऐकायला मिळेल अशी आशा तिच्या चाहत्यांना नक्कीच आहे.
अजय देवगण आणि काजोलने जुहूमध्ये खरेदी केला करोंडोंचा आलिशान बंगला
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje