DIY सौंदर्य

या आयुर्वेदिक वस्तूंचा करा चेहऱ्यावर उपयोग, क्रिमची गरज नाही भासणार

Dipali Naphade  |  Jan 25, 2021
या आयुर्वेदिक वस्तूंचा करा चेहऱ्यावर उपयोग, क्रिमची गरज नाही भासणार

आपल्याला नेहमी आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. हंगाम कोणताही असो त्वचा मॉईस्चराईज करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी आपण पाहतो की प्रत्येक जण बाजारातील अनेक वेगवेगळे क्रिम्सचा वापर करत असतात. पण आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत (easy home remedy) सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही क्रिम अथवा कोणत्याही लोशनचा वापर करणे विसरून जाल. तुमची त्वचा यामुळे हायड्रेट राहील आणि अतिशय मुलायमही राहील. नक्की यासाठी तुम्ही कशाचा वापर करावा हे जाणून घ्या. केशर आणि मध या दोन्ही आपल्याला घरात मिळणाऱ्या वस्तू आहेत. त्यामुळे याचा वापर आपण सोप्या पद्धतीने करून घेतात. 

झोपताना लावा हा अप्रतिम फेसमास्क, मिळेल तजेलदार त्वचा

हा आहे सोपा उपाय

Freepik.com

तुम्हाला चेहऱ्यावर सतत क्रिम अथवा लोशनचा वापर करायला आवडत नसेल तर तुम्ही घरातील काही गोष्टींचा वापर करून तुम्ही सुटका मिळवू शकता. तसंच तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घेता येते.  यापैकी सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे केशर आणि दुसरी वस्तू म्हणजे मध.  या दोन्ही वस्तूंचा उपयोग करून तुम्हाला उत्तम त्वचा मिळू शकते. तुम्हाला अन्य कोणत्याही बाजारी उत्पादनांची गरज चेहऱ्यासाठी भासणार नाही. तुम्हाला या दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या आहेत.  जेणेकरून केशरातील गुण तुम्हाला मधामध्येही मिळतील. 

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

त्वचेसाठी अशा तऱ्हेने काम करते हे मिश्रण

केशरामध्ये विटामिन ए आढळते. त्वचेला तणावमुक्त ठेवण्यासाठी विटामिन्सची गरज असते. केशरामुळे त्वचा अधिक उजळण्यास मदत मिळते.  यामध्ये विटामिन ए शिवाय विटामिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम असे गुण आढळतात. त्यामुळे केशर त्वचेवर फाईन्स  लाईन्स येऊ देत नाही आणि वयासह वाढणाऱ्या सुरकुत्या थांबविण्यासाठीही याचा उपयोग होतो. चेहऱ्यावर असणारे डाग यामुळे निघण्यास मदत मिळते. तसंच मधामुळे त्वचा अधिक हायड्रेट होते आणि हे नैसर्गिक मॉईस्चराईजर आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिम अथवा लोशन लावण्यापासून मुक्ती मिळते. 

कांस्य मसाजरने मिळवा सुंदर आणि नितळ त्वचा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य