‘इश्कजादे’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत अभिनेता अर्जुन कपूरने आता बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. अर्जुनला बॉलीवूडमध्ये येऊन नुकतीच आता नऊ वर्ष झाली आहे. या काळात त्याने अनेक हिट चित्रपट देत त्याचं स्वतःच करिअर घडवलं आहे. अर्जूनने कमी वयातच बॉलीवूडमध्ये नाव कमावलं असलं तरी त्याची रिअल लाईफ स्टोरीदेखील इश्कजादेपेक्षा नक्कीच कमी नाही. त्याच्यापेक्षा मोठ्या वयाने खूप मोठ्या असलेल्या घटस्फोटित मलायका अरोराशी असलेल्या त्याच्या रिलेशनशिपमुळेही तो सतत चर्चेत असतो. आता मात्र तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि मलायका अरोरानंतर अर्जून कपूरनेही बांद्रा येथे एक आलिशान स्काय व्हिला खरेदी केला आहे. ज्याची किंमत करोडोंच्या घरात आहे.
कसा आहे अर्जुनचा स्काय व्हिला
अर्जुन कपूरने बांद्रामधला स्कायव्हिला हा ’81 ऑरिएट’ नावाच्या बिंल्डिंगचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. हा एक इंटरनॅशनली डिझाईनचा टॉवर आहे. ज्यामधून तुम्ही वरळी सी लिंक, अरेबियन समुद्र आणि मुंबईचा झगमगाट स्काय व्हिवने पाहू शकता. शिवाय या व्हिलामध्ये खास स्विमिंग पूल आणि मिनी गोल्फ एरिआपण असणार आहे. या व्हिला 4212 स्वेअर फुट कारपेट एरिआचा असून तो जगप्रसिद्ध डिझानर एचबीए यांनी डिझाईन केला आहे. या प्रोजेक्टमध्ये एकूण 81 स्कायव्हिला असून या सर्व व्हिलाजची प्राथमिक किंमत कमीत कमी 20 कोटींपासून सुरू होते. आतापर्यंत या प्रोजेक्टमध्ये सोनाली सिन्हा आणि मलायका अरोराने व्हिलाज खरेदी केले होते. आता अर्जुन कपूरनेही यातील एक व्हिला खरेदी केला आहे.अर्जुनच्या मते तो नात्यात नेहमी एक रिसपेक्टफुल बाउंड्री ठेवतो. ज्यामुळे तो इतरांचा नातेसंबंधामध्ये योग्य आदर करू शकतो. शिवाय त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फार बोलायला आवडत नाही. त्याच्या मते प्रत्येक जोडीदाराची एक मर्यादा असते, शिवाय प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा असू शकतो. अर्जुन कपूर आणि मलायका याचं नातं आता खूपच घट्ट झालं आहे. सोशल मीडियावर ते एकमेकांच्या पोस्टवर कंमेट शेअर करत असतात. त्याचप्रमामणे वेकेशन आणि डिनर डेटवरही बऱ्याचदा एकत्र जाताना दिसतात. सहाजिकच त्यांचे नाते आता जगासमोर उघड झालं आहे. सोशल मीडियावर याबाबत त्यांनी मोकळेपणाने खुलासाही केला आहे. अशातच अर्जुनने मलायका पाठोपाठ बांद्रामध्ये स्कायव्हिला खरेदी केल्यामुळे ते आता सख्खे शेजारीदेखील झाले आहेत.
अर्जुन कपूरचे आगामी चित्रपट
अर्जुन कपूरचा नुकताच ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सरदार का ग्रॅंडसन’ हे चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भूत पुलिसमधून तो लवकरच चाहत्यांसमोर एका वेगळ्या अवतारात येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतमी आणि जावेद जाफरी असणार आहेत. आगामी चित्रपट ‘एक विलन 2’ मध्येही तो असणार आहे. हा चित्रपट मोहित सुरी दिग्दर्शित करत आहे. या वर्षी फेब्रुवारी पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहिम आणि दिशा पाटनी मुख्य भूमिकेत असणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या कारणामुळे अमिषा पटेल झाली इंडस्ट्रीमधून बाहेर
‘भाभीजी घर पे है’ मालिका सोडली की नाही यावर नेहा पेंडसेची प्रतिक्रिया
ऑडिशन न देताच तापसी पन्नूने मिळवला होता तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje