आयुष्मान खुराणा हा एक अष्टपैलू कलाकार आहे. अभिनय, संगीत, डान्स, निर्माता अशा अनेक आघाड्यांवर त्याने स्वतःचे टॅलेंट सिद्ध केले आहे. आयुषमान चित्रपटांची निवड देखील आगळीवेगळी असते. तो कायम वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरचे चित्रपट करतो. त्यामुळे त्याच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. आयुषमानचा आगामी चित्रपट ‘अनेक’ हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पण मंगळवारी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी जाहीर केले की आता अनेकच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक आता 13 मे ऐवजी 27 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. याचा अर्थ आयुषमानच्या अनेकची रणवीर सिंगच्या जयेशभाई जोरदारशी बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार नाही. दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी आपापसांत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. YRF च्या ‘जयेशभाई जोरदार’शी टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. जयेशभाई जोरदार या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. आयुषमानने सोशल मीडियावर देखील हे अपडेट शेअर केले. “देशाला एकत्र आणण्याच्या मिशनसाठी सर्व सज्ज झाले आहेत. जीतेगा कौन? हिंदुस्थान! ‘अनेक’, 27 मे 2022 रोजी सिनेमागृहात,” असे त्याने लिहिले.
निर्मात्यांनी सामोपचाराने हा निर्णय घेतला
आदित्य चोप्रा आणि YRF चे CEO अक्षय विधानी, भूषण कुमार आणि अनुभव सिन्हा यांनी अलीकडेच चर्चा केली आणि बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांमधील स्पर्धा टाळण्यासाठी अनेकच्या रिलीजची तारीख पुढे ढकलली. अनेकचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केली आहे. आयुषमान आणि अनुभव सिन्हा यांच्या टीमने यापूर्वीही ‘आर्टिकल 15’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता ते दुसऱ्यांदा ‘अनेक’मध्ये एकत्र काम करत आहेत. अनुभव सिन्हा म्हणाले की, “चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ‘अनेक’ रिलीज करताना आम्हाला आनंद होत आहे. आता प्रेक्षकांना दोन्ही चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.”
यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधान यांनी सांगितले की, “निर्माते भूषण कुमार आणि अनुभव सिन्हा यांनी ‘अनेक’ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट 27 मे रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या निर्णयामुळे प्रेक्षकांना आता ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘अनेक’ हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या वेळी पाहता येणार आहेत.या निर्णयामुळे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात मदत होईल.” अनेक हा भूषण कुमार यांच्या टी-सीरीज आणि अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला चित्रपट आहे.
‘जयेशभाई जोरदार’च्या सुरुवातीला दिसणार अनेकचे ट्रेलर
YRF ने ‘अनेक’चा ट्रेलर ‘जयेशभाई जोरदार’शी जोडण्याचा निर्णयही घेतला आहे.या निर्णयाबद्दल बोलताना निर्माते भूषण कुमार म्हणाले की, “सध्या चित्रपट व्यवसाय हा कोरोना महामारीच्या नुकसानातून सावरतो आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण एकमेकांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. “जयेशभाई जोरदार’ आणि ‘अनेक’ हे दोन्ही अतिशय उत्तम चित्रपट आहेत आणि या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे, ‘अनेक’चा ट्रेलर ‘जयेशभाई जोरदार’शी जोडण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत.” अनुभव सिन्हा म्हणाले की, “प्रेक्षकांनी दोन्ही चित्रपटांचा आनंद “स्पेस आउट पद्धतीने” घ्यावा अशी आमची इच्छा आहे. चित्रपट बनवताना खूप मेहनत आणि नियोजन करावे लागते आणि त्या तत्त्वानुसार तो अविभाजित लक्ष मिळवण्यासपात्र असतो. ‘अनेक’चे रिलीज काही दिवसांसाठी पुढे ढकलताना आम्हाला अजिबात दुःख झाले नाही उलट आनंदच झाला जेणेकरून प्रेक्षकांना आता दोन्ही चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.”
अनेक व्यतिरिक्त आयुषमान डॉक्टर जी आणि ऍक्शन हिरो या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm एक कडून मोफत लिपस्टिक
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje