सध्या विविध मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच आता त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘बाबू’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. त्यात आता टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. हा एक ॲक्शनपट असून यात ‘बाबू’ची भूमिका अंकित मोहन (Ankit Mohan) साकारत आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव (Ruchira Jadhav), नेहा महाजन (Neha Mahajan) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.
अधिक वाचा – प्रभासने अमिताभ बच्चन यांचा केला पाहुणचार, बिग बींचे जिंकले मन
अंकित मोहनचा वेगळा लुक
आगरी -कोळी भागात घडणारी ही कथा आहे. गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात, राजकारणाविरोधात ‘बाबू’ त्याच्या आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे पाहायला मिळत आहे. गावात नक्की कोणत्या कारणाने आपापसात ही लढाई सुरु आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. यापूर्वी अंकित मोहन ऐतिहासिक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आला आहे, या चित्रपटात मात्र अंकित एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्टीवरून त्याने घेतलेल्या मेहनतीचा चांगलाच अंदाज येतोय. यात रुचिरा आणि नेहाची नेमकी काय भूमिका आहे, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाची कथा बाबू कृष्णा भोईर यांची असून संवाद आणि पटकथा मयूर मधुकर शिंदे यांची आहे. ॲक्शनचा जबरदस्त धमाका ‘बाबू’च्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. अंकित मोहन हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला नवे नाही. तर नुकताच अंकित बाबाही झाला आहे. आता या सर्व बदलानंतर अंकित एका वेगळ्याच लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. अंकितची ही भूमिका नक्की कशी असेल आणि या चित्रपटाची काय वेगळी धाटणी आहे याचीही उत्सुकता आता सर्वांना या फोटोवरून लागून राहिली आहे.
अधिक वाचा – ‘मी वसंतराव’ पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…
टीझर आहे वेगळा
या चित्रपटाचा टीझर नुकताच आला असून हा इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. फारच कमी कालावधीमध्ये या टीझरला अनेक लाईक्स मिळत आहेत. तसंच एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट मराठीमध्ये येत आहे. सध्या मराठीमध्ये अनेक वेगवेगळे चित्रपट येत असून पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस थिएटरमध्येही दिसून येत आहेत. तसंच वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमध्ये आता बाबू या चित्रपटाचीही भर पडली आहे. दरम्यान अंकितने आपल्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे आणि आता या चित्रपटाच्या टीझरनंतरही प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. टीझरनंतर आता या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट प्रेक्षक पाहात आहेत. अजूनही चित्रपटाची तारीख कळली नसली तरीही नक्कीच मराठीमधील हा एक वेगळा आणि चांगला चित्रपट असेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
अधिक वाचा – शर्वरी वाघला बनायचं आहे माधुरी दीक्षित, घेतेय कथ्थकचे प्रशिक्षण
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade