हिवाळ्यात त्वचा मॉईस्चराईझ करण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत असतील. मात्र तरिही कामाच्या गडबडीत अथवा कंटाळा आल्याने मॉईस्चराईझर लावण्याची टाळाटाळ केली जाते. खरंतर हिवाळा सुरु होण्यापूर्वीच तुमच्या डेली स्किन केअरमध्ये विंटर केअर मॉईस्चराईझचा वापर सुरू करायला हवा. कारण नेहमीप्रमाणे साध्या फेस क्रिमने त्वचेला मॉईस्चराईझ करणं आणि हिवाळ्यात खास कोल्ड क्रिमने त्वचा मॉईस्चराईझ करणं यात फरक आहे. यासाठीच जाणून घ्या जेव्हा तुम्ही त्वचेला मॉईस्चराईझ करत नाही तेव्हा तुमच्या त्वचेवर नेमका काय परिणाम होतो.
त्वचेवरील लवकर सुरकुत्या वाढतात-
त्वचा मॉईस्चराईझ न करण्याचा हा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. कारण तरूणवयात याचा परिणाम पटकन जाणवत नसला तरी मध्यमवयाच्या आधीच यामुळे तुम्हाला सुरकुत्या दिसू लागतात. कारण त्वचा कोरडी झाल्यामुळे ती लवकर सैल पडते, कोलेजीनच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि त्वचेला आतून दाह जाणवू लागतो. याचाच परिणाम पुढे त्वचेवर सुरकुत्या पडण्यावर होतो. त्यामुळे जर लवकर एजिंगचे हे मार्क्स नको असतील तर नियमित त्वचा मॉईस्चराईझ करा.
कमी वयात एजिंग मार्क्स दिसतात –
चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं म्हणजेच त्वचेवर एजिंगचे मार्क्स दिसू लागणं. मात्र जर तुम्हाला आधीच सुरकुत्या असतील तर तुम्ही त्वचेची नियमित काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही नियमित त्वचा मॉईस्चराईझ केली नाही तर कोरडे पणामुळे तुमचा त्वचा निस्तेज दिसू लागतो. फाईन लाईन्स, डार्क सर्कल्स यामुळे तुम्ही लवकर वयस्कर दिसू लागता.
Shutterstock
तुमचा स्किन टोन डल होतो –
हिवाळ्यातील कोरडे आणि दमट वातावरण तुमच्या त्वचेमधील आर्द्रता खेचून घेते. ज्याचा परिणाम तुमची त्वचा हिहायड्रेट होते. अशा कोरड्या आणि निस्तेज त्चेवर त्वचेचं इनफेक्शन पटकन होण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर या वातावरणामुळे तुमच्या त्वचेवरील चमकदारपणा कमी होतो.
त्वचेवर पिंपल्स येतात –
मॉईस्चराईझ न केल्यामुळे त्वचेवर पिंपल्सदेखील येऊ शकता. समजा तुमची त्वचा तेलकट अथवा कॉम्बिनेशन प्रकारची असेल तर त्वचा चिकट दिसू नये यासाठी तुम्ही मॉईस्चराईझर वापरण्याची टाळाटाळ करता. मात्र असं करू नका त्याऐवजी अॅक्ने प्रोन अथवा ऑईल फ्री मॉईस्चराईझर वापरा. ज्यामुळे तुमची त्वचा पिंपल्स फ्री आणि मऊ राहील.
तुमचा मेकअप चांगला होत नाही –
हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली तर त्याचा परिणाम तुमच्या मेकअपवर होतो. थोडक्यात जर तुम्ही मेकअप आधी तुमची त्वचा मॉईस्चराईझ केलेली नसेल तर तुम्ही कितीही चांगला मेकअप केला तरी तो नक्कीच चांगला दिसत नाही. कोरड्या त्वचेमुळे, सुरकुत्या आणि फाईन लाईन्समुळे तुमच्या मेकअप बेसवर क्रॅक निर्माण होतात. यासाठीच नियमित त्वचेला मॉईस्चराईझ करण्यास विसरू नका.
Shutterstock
त्वचेला खाज येते –
हिवाळ्यात त्वचा कोरडी झाल्यामुळे तुमच्या त्वचेला खाज येते आणि त्वचा खाजवल्यामुळे त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. जर तुम्हाला त्वचेवर अशी खाज दिवसभर येत राहीली तर कोणत्याही कामात तुमचे मन लागत नाही. यासाठी नियमित त्वचेची काळजी घ्या आणि मॉईस्चराईझर लावण्यास टाळाटाळ करू नका.
त्वचेला नियमित मॉईस्चराईझ करण्यासाठी वापरा मायग्लॅमचे हे ग्लो इरिडिसेंट ब्राईटनिंग मॉईस्चराईझिंग क्रिम आणि मिळवा मऊ आणि मुलायम त्वचा, ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या कमी होतील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
सुरकुत्या घालविण्यासाठी असा करा चेहऱ्याला मसाज
हिवाळ्यात मधुमेहींनी त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक
चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी शिळ्या पोळीपासून तयार करा फेस स्क्रब