बॉलीवूड

बाहुबली आता बनणार आदिपुरुष, केली ग्रँड घोषणा

Leenal Gawade  |  Aug 18, 2020
बाहुबली आता बनणार आदिपुरुष, केली ग्रँड घोषणा

‘बाहुबली’सारखा मेगा हिट चित्रपट दिल्यानंतर आता बाहुबलीस्टार प्रभास एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून त्याच्या चित्रपटाचे नाव ‘आदिपुरुष’ असे आहे. चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज करत प्रभासने त्याच्या फॅन्सनाही माहिती दिली आहे. हा चित्रपट अॅक्शनी भरलेला असेल असे या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर कळते. विशेष म्हणजे ‘तानाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करुन ज्या ओम राऊतने आपला ठसा उमटवला. तो आता या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. त्यामुळे साहजिकच या प्रोजेक्टबद्दलची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. जाणून घेऊया आदिपुरुष हा चित्रपट का असणार खास.. आणि बाहुबलीनंतर हा चित्रपट ठरेल का मेगा हिट चित्रपट

बॉलीवूड कलाकार जे सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले आहेत परदेशात 

बिग बजेट चित्रपट

Instagram

साऊथचे अनेक चित्रपट हे बिग बजेट चित्रपट असतात. बाहुबली ज्यावेळी आला त्याआधीही या चित्रपटाची अशाच पद्धतीने घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ‘आदिपुरुष’साठी ही घोषणा केली जात आहे. एकूण 5 भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटाची घोषणा आणि पोस्टर रिलीज करण्यात आले असून चित्रपटावर काम करायला टिमने सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. हा चित्रपट 2022 साली रिलीज केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय हा चित्रपट एका अशाच सुपरहिरोवर आधारीत असून ‘बुराई के उपर अच्छाई का जश्न’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. 

प्रभास साकारणार आदिपुरुष

प्रभासला बाहुबलीच्या रुपात पाहिल्यानंतर अनेकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सुपरमॅन, बॅटमॅनप्रमाणे आपल्या देशाचा तो सुपरहिरो आहे. अशीच ओळख त्याची बनली होती. आता प्रभास या नव्या सुपरहिरोच्या म्हणजेच आदिपुरुषच्या रुपात पाहायला मिळणार आहे.  प्रभासचा या चित्रपटात नेमका लुक कसा असणार आहे याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. शिवाय यामधील इतर स्टारकास्टचाही उल्लेख नाही. प्रभासने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत एका नव्या प्रोजेक्टची हिंट दिली होती.

लवकरच प्रकाशित होणार प्रियांका चोप्राचे आत्मचरित्र, शेअर केली झलक

चित्रपटाला लगेचच दिला होकार

चित्रपटाची निर्मिती टी- सीरिजची असून या संदर्भात त्यांच्याकडूनही अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. फक्त या प्रोजेक्टसाठी ते अधिक उत्साही असल्याचे कळत आहे. आदिपुरुष चित्रपटाचे स्क्रिप्ट वाचल्यानंतरच त्यांनी या चित्रपटाला होकार दिला होता. त्यामुळेच या चित्रपटावर लगेचच काम सुरु करण्यात आले. सध्या कोणाकडूनही अन्य स्टारकास्टचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण हा चित्रपट एक मेगा हिट असणार आहे यात काही शंका नाही. 

शिवाय या चित्रपटाचा आनंद सगळ्यांना थिएटरमध्ये जाऊन घेता येईल याचा आनंद त्यांच्या फॅन्समध्ये अधिक आहे. आता काही काळासाठी आपल्याला चित्रपटाच्या पुढच्या घोषणांसाठी थोडावेळ थांबावे लागणार आहे. 

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उधळला, संशयिताला अटक

Read More From बॉलीवूड